मी झाड झालो तर निबंध {2024} Mi zad zalo tar Marathi nibandh

Mi zad zalo tar marathi nibandh/ if i become a tree in marathi.

मी झाड झालो तर या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान सजीव गोष्ट असल्याचा अभिमान मला असेल. निसर्गाची पर्यावरणाची शोभा वाढवण्याचे महत्त्वाचं काम माझ्याकडे असेल. मी झाड झालो तर निरनिराळे रंगबिरंगी पक्षी माझ्या कडे आकर्षित होतील.

मला लागलेली  रंगीबेरंगी फुले, फळे, हिरवी पाने पाहून सर्व पक्षी माझ्या आश्रयाला येतील. मी झाड झालो तर निसर्गातील सर्व सजीवांना थंडगार सावली देण्याचं काम मी करेन. मी झाड झालो तर वन्यप्राणी, पक्षी जसे माकडे, खारुताई, सुतारपक्षी, पोपट माझ्या फांद्यावर येऊन बसतील.

Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh
Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh

आकाशात घिरट्या घालून बसलेले पक्षी माझ्या झुपकेदार पानांच्या डोलीत क्षणभर विश्रांती घेतील, सुंदर फळांचा आस्वाद घेतील. बागेतील चिमणा चिमणी माझ्या फांद्यावर सुंदर घरटे बनवतील आणि चिमुकल्यांना घरट्यामध्ये ठेवून दूर अन्नाच्या शोधात निघून जातील आणि पुन्हा संध्याकाळ होण्याच्या अगोदर आपल्या घरट्यात येऊन चोचीने पिलाला घास भरवतील.

मी झाड झालो तर हे सर्व सुंदर दृश्य हृदयाला घाव घालणारे माय लेकरांचं नातं मला पहायला मिळेल. मी झाड झालो तर कोकिळा माझ्या हिरव्यागार पानांच्या डोलीत येऊन गोड गाणे गाईल आणि कोकिळेने गायलेल सुंदर गाणं मला खूप जवळून ऐकता येईल व अनुभवता येईल. मी झाड झालो तर निसर्गातील सूक्ष्म हालचाली मला जवळून पाहता येतील. मानवाकडून होणार्‍या वन्यप्राण्यांच्या हत्यांचा एकमेव साक्षीदार मी असणार आहे. मी झाड झालो तर न बोलताही सर्वकाही अनुभवण्याचे भाग्य मला लाभले.

Mi zad zalo tar marathi nibandh.

माणूस असताना जी माझी धावपळ होती ती सर्व संपून जाईल. कुठे प्रवासाला जाण्याची वेळ येणार नाही सारखे सारखे घड्याळ पहावे लागणार नाही. स्वार्थी मित्र भेटणार नाहीत, कुणाकडून फसवणूक होण्याची भीती नसेल. आईची बाबाची कट कट व ओरड संपून जाईल. अभ्यासाचं टेन्शन नसेल, परीक्षेचे टेन्शन नसेल. मी झाड झालो तर पक्ष्यांसारखे प्रामाणिक मित्र मला भेटतील त्यांच्या रोजच्या भटकंतीची चर्चा मला ऐकायला मिळेल. मी झाड झालो तर उन्हाळ्यातील कडक ऊन मला अनुभवता येईल.

सकाळच्या कोवळ्या उन्हात आनंद घेता येईल. उगवत्या आणि मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य पाहता येईल. आकाशात निर्माण होणारे सात रंगाचे इंद्रधनुष्य सर्वात प्रथम मला पाहता येईल, थंडीतील थंडगार हवा अनुभवता येईल, पावसाळ्यातील पावसामध्ये अंघोळ करता येईल. मी झाड झालो तर शेजारच्या माझ्या बांधवांची कत्तल होताना पाहून मला खूप रडायला येईल.

Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh
mi zad zalo tar marathi nibandh

मी झाड झालो तर मला नेहमी माणसाची भीती असेल कारण माणूस माझे मित्र वन्यप्राणी, पक्षी, पाखरे आणि माझे झाड बांधव यांची हत्या करून यांना माझ्यापासून दूर घेऊन जाईल. मी झाड झालो तर पर्यावरणाचे संतुलन टिकवण्याचा महत्त्वाचे काम मी करेन. सजीवांना शुद्ध हवा देण्याचे काम मी करेन.

पर्यावरणातील सजीवाला हानिकारक अशा विषारी वायूंचे शोषण करून सजीवांना चांगले आरोग्य प्रदान करण्याचे काम मी करेन. मी झाड झालो तर लहान मुले माझ्या फांद्यांना झोका बांधून उंच उंच आभाळाला भिडणार्‍या झोक्याचा आनंद घेतील. मी झाड झालो तर मधमाशा माझ्या फांद्यांना आपले घर बनवतील आणि निरनिराळया रंगबिरंगी फुलातील मध गोळा करून साठवतील.

मी झाड झालो तर आकाशातील वीज वाऱ्यांचा मारा सहन करून स्वत:ला अधिक मजबूत बनवेन. मी झाड झालो तर दूरच्या प्रवासाला निघालेले प्रवासी माझ्या शीतल छायेत क्षणभर विश्रांती घेतील आणि भोजन करतील. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आलेली शाळेतील मुले माझ्या छायेत खेळतील बागडती नाचतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून एकत्र भोजन करतील.

मी झाड झालो तर मनात फक्त एकच भीती नेहमी असेल कि, एक दिवस मानव इतर वन्यप्राण्यांसारखी माझी सुद्धा हत्या करणार हे नक्की!

हेही वाचा:

100+राजघराण्यातील मुलांची नावे Royal Marathi Names For Boy

घरांची मराठी नावे मॉडर्न, धार्मिक House Names in Marathi

सर्व प्रकारच्या माशांची मराठी नावे Fish Names in Marathi

हॉटेलची दर्जेदार मराठी नावे Hotel Names in Marathi Ideas

गणपतीची 108 नावे मराठी शुभ फल देणारी 108 Ganpati Names in Marathi

सूचना: मित्रांनो जर तुम्हाला Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.

Leave a Comment