Topics
Mi Pakshi Zalo Tar Nibandh Marathi/if i become a bird essay in Marathi.
मी पक्षी झालो तर हा विचार मनात येताच सर्वात प्रथम आठवत ते पांढरे शुभ्र आकाश, उंच पर्वत, उंच उंच मोठी झाडे, आणि थंडगार जोरात वाहणारा वारा, मी पक्षी झालो तर हे सर्व अनुभवयास मिळणार ही कल्पनाच जणू मनाला आनंद देऊन जाते. खरच किती मज्जा येईल ना जर मी पक्षी झालो तर!
दूरच्या प्रवासाला निघून जाईन पांढर्या शुभ्र आकाशामध्ये आनंदाने उडत प्रवास करेन, जिथे कोणीही मला ओरडणारे नसेल तिथे फक्त मीच माझ्या मनाचा मालक असेन. मी पक्षी झालो तर उंच झाडाच्या फांदीवर जाऊन हे सर्व जग वरुन पाहिन आणि सर्वात मीच मोठा असल्याचा अभिमान जवळ ठेवीन. मी पक्षी झालो तर लवकर उठून अंघोळ करण्याचा त्रास नसेल.
लवकर उठून शाळेत जाण्याचा त्रास नसेल, सरांनी शाळेत सांगितलेला अभ्यास करण्याचा त्रास नसेल, ना परीक्षेच टेंशन असेल ना करिअर च टेंशन असेल ! मी पक्षी झालो तर रोजची आईची आणि बाबाची कट कट थांबेल “उठ अभ्यास कर परीक्षा जवळ आली आहे” हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार नाही. घरातील किरकोळ कामे करायला कोणीच सांगणार नाही.
जिकडे तिकडे फक्त स्वातंत्र्य असेल फक्त स्वातंत्र्य. मी पक्षी झालो तर निसर्गातील सौंदर्य सर्वात प्रथम मला माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी टिपता येईल. थंड वार्याची झुळूक, पावसाळ्यातील पावसाच्या रिमझिम धारा माझ्या इवल्याश्या सुंदर पंखावर अनुभवता येतील.
मी पक्षी झालो तर उंच झाडाच्या फांदीला माझं सुंदर घरटे सर्वात पहिले बांधेल. समुद्राच्या पाण्यावरुन आकाशात विहार करेन आणि वाऱ्याच्या थंडगार स्पर्शाने न्हाऊन निघेन. मी पक्षी झालो तर रात्री आकाशातील लखलखते तारे अगदी जवळून उंच झाडाच्या फांदीवरून पाहीन. मी पक्षी झालो तर मला इतर पक्षांची भाषा समजेल ते माझे पक्षी बांधव मला काय म्हणतायेत, एकमेकांशी काय चर्चा करत आहेत हे सर्व समजेल.
Mi Pakshi Zalo Tar Nibandh Marathi
रंगबेरंगी फुलांवर उडणारी फुलपाखरे माझ्याशी मैत्री करतील. झाडांवरील मधमाशा मला गोड मध खायला देतील आणि गुण गुण करत माझं मनोरंजन करतील. मी पक्षी झालो तर बहरलेल्या वसंत ऋतूतील सुंदर दृश्य मला पाहायला मिळतील. आंब्याच्या झाडाला, चिंचेच्या झाडाला, व इतर सुंदर गोड फळांच्या झाडाला आलेला मोहर अनुभवता येईल व त्याचा सुगंध घेता येईल.
माझे पक्षी बांधव यांच्याबरोबर आकाशामध्ये विहार करता येईल आणि आकाशामध्ये उंच उडत असतानाही जमिनीवरील हालचाली मला पाहता येतील. माझी शिकार करणे माणसाला सहज शक्य होणार नाही. माझी शिकार करणारा जवळ येताच मी उंच झाडाच्या झुपकेदार पानांमध्ये जाऊन लपेण आणि स्वतःचं संरक्षण करेन. मी पक्षी झालो तर प्रत्येक वेली वरील रंगबेरंगी फुलांचा सुगंध मला घेता येईल.
निरनिराळ्या झाडांवरील गोड फळे मनसोक्तपणे खाता येतील. आंबा चिकू, पेरू, पपई, अननस, संत्री, सफरचंद ही सर्व गोड फळे मला चाखता येतील. मी पक्षी झालो तर वादळ वार्याच्या सोबतीने मानवाला आव्हान देईन. मी पक्षी झालो तर निसर्गातील मोठ्या डोंगरावर जाऊन बसेल. उंच पर्वतावर जाऊन संपूर्ण जग पाहिन. मला कशाचीही भीती राहणार नाही. कशाचीही चिंता राहणार नाही. मला घरातून बाहेर पडायला कोणीही अडवणार नाही.
मला कशाचेही बंधन नसेल कोणताही अडथळा नसेल. अगदी मनसोक्तपणे आकाशात उंच झेप घेईन आणि दूरच्या प्रवासाला निघून जाईन. मी पक्षी झालो तर सकाळी पहाटे लवकर उठेन आणि सारं शिवार जाग करेन. माझा गोड सुंदर आवाज ऐकून सारे पक्षी जागे होतील. रोज एक नवे शिवार मी पाहेन.
रोज एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन शिवारातील प्रत्येक सजीवाशी मैत्री करीन. रानामध्ये काम करणाऱ्या शेतमजुराशी, शेतकऱ्याशी मी मैत्री करेन. जगातील सर्व ऐतिहासिक, आश्चर्यकारक ठिकाणांना मला भेट देता येईल. उंचावरून वाहणारे धबधबे जवळून पाहता येतील. आकाशामध्ये उंच उडून थकवा आल्यास पुन्हा गोड फळे असलेल्या झाडावर जाऊन बसेन आणि गोड फळे खाईन. झर्याचे थंड पाणी पिईन, झाडाच्या उंच फांदीवर जाऊन मनसोक्तपणे झोका घेईल.
हेही वाचा:
100+राजघराण्यातील मुलांची नावे Royal Marathi Names For Boy
घरांची मराठी नावे मॉडर्न, धार्मिक House Names in Marathi
सर्व प्रकारच्या माशांची मराठी नावे Fish Names in Marathi
हॉटेलची दर्जेदार मराठी नावे Hotel Names in Marathi Ideas
गणपतीची 108 नावे मराठी शुभ फल देणारी 108 Ganpati Names in Marathi
सूचना: जर तुम्हाला Mi Pakshi Zalo Tar Nibandh Marathi हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.