माझी बहिण निबंध {2024} Essay on My Sister in Marathi.

Essay on My Sister in Marathi/mazi bahin nibandh in marathi.

माझी ताई माझ्या आईचं दुसर रूप आहे. माझ्या जीवनातील आई इतकीच दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी “ताई” होय. माझी ताई माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. माझी ताई स्वभावाने शांत, प्रेमळ, दयाळू, आणि मनमिळावू आहे. मी लहान असताना नेहमी माझ्या सोबत असणारी माझी ताई माझा खुप लाड करते, माझी खूप काळजी घेते. माझी ताई माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. माझ्या ताईचे नाव रेशमा आहे.

ताई मी शाळेतून घरी आल्यावर माझा रोज अभ्यास घेते. माझ्याकडून पाढे इंग्रजीतील अवघड शब्दार्थ पाठ करून घेते. बाबांनी घरामध्ये आणलेला खाऊ ताई मला तिच्या वाट्याचा खाऊ सुद्धा प्रेमाने देते. शाळेतून घरी आल्यावर ताई माझ्यासोबत कबड्डी, खो-खो, क्रिकेट इत्यादी मैदानी खेळ खेळते. ताई आई कामावरून आल्यावर आईला स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवताना मदत करते. आई कामावर गेल्यानंतर घरातील लादी पुसणे, कपडे धुणे, भांडी घासणे, व झाडू मारणे ही सर्व कामे करते.

Essay on My Sister in Marathi

Essay on My Sister in Marathi
Essay on My Sister in Marathi

माझी ताई मी शाळेला जाण्यापूर्वी माझे दप्तर भरते माझी पाण्याची बॉटल भरते माझी वेणी घालते, माझा डब्बा भरते, आणि मला शाळेपर्यंत सोडवायला येते, आणि संध्याकाळी शाळा सुटल्यावर मला घरी न्यायला येते. माझी ताई माझ्या वाढदिवसादिवशी खूप आनंदी असते. माझा वाढदिवस जवळ येताच वाढदिवसाच्या तयारीला लागते आणि माझ्या वाढदिवसा दिवशी मला नवीन कपडे, आईस केक, चॉकलेट खरेदी करते.

माझी बहीण शाळेतून घरी आल्यावर स्वयंपाकाचे वेळी छान छान स्वादिष्ट पदार्थ बनवायला शिकवते. माझी ताई रात्री झोपताना मला छान छान परींच्या कथा, तेनालीरामाच्या गोष्टी, भुतांच्या गोष्टी, बिरबलाच्या गोष्टी, वेताळाच्या गोष्टी, इत्यादी सर्व गोष्टी सांगते व माझे मनोरंजन करते. माझी ताई शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास मला प्रोत्साहन देते.

 Essay on My Sister in Marathi
Essay on My Sister in Marathi

नृत्यस्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या सर्व शालेय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मला मानसिक रित्या आणि शारिरिक रित्या तयार करते. मी एखाद्या स्पर्धेत भाग घेतल्यास माझी संपूर्ण तयारी घरीच करून घेते. माझी ताई मला मनापासून खूप आवडते. माझी ताई माझ्यासाठी एक नवा आदर्श आहे. आई-बाबांना माझ्या ताईचा खूप अभिमान आहे. आई-बाबांनी सांगितलेले प्रत्येक काम माझी ताई करते. माझी ताई आई-बाबांना उलटसुलट प्रश्न विचारत नाही.

ताई आई-बाबांकडे कोणत्याही प्रकारचा हट्ट करत नाही. माझ्या ताईला पाळीव प्राणी पाळायला खूप आवडतात. ताईच्या सांगण्यावरून माझ्या बाबांनी घरामध्ये लहान कुत्र्याचे पिल्लू आणले आहे. माझ्या आईने त्या लहान कुत्र्याच्या पिल्लाचे नाव मोती ठेवल आहे. घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर मी व माझी ताई आम्ही दोघे जण मोती ला घेऊन बाहेर फिरायला जातो. रविवारी माझ्या शाळेला सुट्टी असते.

सुट्टीदिवशी मी माझ्या ताई सोबत शेतामध्ये जाते. मी व माझी ताई शेतामध्ये रविवारच्या दिवशी खूप मजा करतो. आंब्याच्या झाडाला झोका बांधून ताई मला झोक्यावर बसवून झोका देते आणि माझे मनोरंजन करते आणि संध्याकाळी शेतातून घरी येतांना आम्ही दोघेजण भाजीपाला घेऊन येतो.

शेतामध्ये गेल्यावर ताई माझ्यासाठी चिंचेच्या झाडावरून गोड आंबट चिंचा काढून देते. आंब्याच्या झाडावरुन कैरी तोडून देते. माझी ताई माझ्यावर खूप जीव लावते. मी रुसल्यावर माझी समजूत काढते. आई ओरडल्यावर मला जवळ घेते, आणि मला हसवण्याचा प्रयत्न करते. माझी ताई मला कधीच एकटे सोडत नाही, नेहमी माझ्यासोबत असते. माझी ताई आई-बाबांकडून माझ्यासाठी खायला पैसे घेते. ताई वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवते.

आमचे सर्व नातेवाईक माझ्या ताईचे खूप कौतुक करतात. माझी ताई सर्वगुणसंपन्न आहे. माझी ताई रोज सकाळी दारासमोर सुंदर रांगोळी काढते. संध्याकाळ झाल्यावर देवासमोर दिवा लावते आणि देवाची मनापासून पूजा करते. माझी ताई सोमवारची शंकराचे वृत्त करते. गुरुवारचे महालक्ष्मीचे वृत्त करते, उपवास करते. दिवाळी, रक्षाबंधन, गौरीपूजन, गणपती स्थापना, व घटस्थापना या सणा दिवशी माझी ताई स्वादिष्ट पुरणपोळीचा स्वयंपाक करते आणि रंगबेरंगी साडी नेसते. माझी ताई साडी मध्ये खूप सुंदर दिसते. अशी माझी ताई सर्वगुणसंपन्न आहे.

सूचना: जर तुम्हाला Essay on My Sister in Marathi हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment