वेळेचे महत्व सुंदर मराठी निबंध {2024} Veleche Mahatva Marathi Essay

Veleche Mahatva Marathi Essay/Importance of time essay in Marathi/Essay on time in Marathi

वेळ हाच पैसा म्हणतात ते काही खोटं नाही कारण आपण पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो. पण वेळ कधीच विकत घेऊ शकत नाही. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही हे वैश्विक सत्य आहे. माणूस त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो पण वेळेचा हिशोब कधीच ठेवत नाही. वेळ म्हणजे त्याला सहज मिळालेली संपत्ती वाटते.

वेळेचे महत्त्व काय असते हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका सेकंदाने हरलेल्या खेळाडूला विचारा तो आपल्याला सांगेल की एका सेकंदाचे महत्व काय असते तसेच एका मिनिटासाठी ट्रेन मिस केलेल्या ऑफिस कर्मचाऱ्याला विचारा, तसेच एका सेकंदासाठी अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा, वेळेचे महत्त्व काय असते ते.

Veleche Mahatva Marathi Essay

जी व्यक्ती ज्या वेळेत जे काम करायला पाहिजे ते जर त्या व्यक्तीने केले नाही तर त्याला ती वेळ निघून गेल्यावर त्या वेळेची किंमत कळते. परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आपण पाहतो पण वर्षभर वाया घालवलेल्या वेळेचा पश्चाताप मुलांना त्यावेळी होतो कारण अचानक सर्व विषयांचा अभ्यास करणे खूप अवघड होऊन बसते.

माणसाने प्रत्येक काम वेळेवर केल्यास त्याला यश मिळवणे खूप सोपे होऊन जाते. माणसाला त्याच्या आयुष्यात पैसा सहजपणे मिळेल पण निघून गेली वेळ सहजपणे मिळणार नाही. गरज पडल्यास तुम्ही एखाद्याकडून पैसा उसना घेऊ शकता आणि तुमच्याकडे पैसा आल्यास तुम्ही त्याला परत देऊ शकता पण गरज पडल्यास तुम्ही त्याच्याकडून वेळ उसनी घेऊ शकत नाही.

veleche mahatva marathi essay
veleche mahatva marathi essay

तुम्ही भविष्यासाठी पैसा साठवू शकता, धान्य साठवू शकता, घर बांधू शकता, पण वेळ साठवू शकत नाही किंवा गेलेली वेळ परत आणू शकत नाही इतके वेळेचे महत्त्व आपल्याला आयुष्यात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच समाजातील तरुण वर्गाने आपल्याला आयुष्यातील वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे, थोडासुद्धा वेळ वाया घालवला नाही पाहिजे. स्वावलंबी होऊन आपली काम वेळेवर केले पाहिजे. सकाळी उठल्यावर व्यायाम करणे, वेळेवर जेवण करणे, वेळेवर शाळेत जाणे इत्यादी कामे वेळेवर केली पाहिजेत.

युवकांनी आपल्या वैयक्तिक जीवनात वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे. नोकरी उद्योग धंदा करणार्‍या तरुणांनी आपले कार्यालयीन काम वेळेवर पार पाडले पाहिजे, वेळेबाबत जागरूक राहणारा माणूस त्याच्या आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही, त्याला त्यात यश मिळवणे खूप सोपे जाते. आळशी वृत्तीच्या लोकांना वेळेचे महत्त्व अजिबात कळत नाही त्यामुळे अशी मंडळी थोड्याच काळात रस्त्यावर येतात. घड्याळाचे पुढे गेलेले काटे तुम्ही परत हाताने मागे घेऊ शकता पण तीच गेलीली वेळ तुम्ही परत घेऊ शकत नाही.

veleche mahatva marathi essay
veleche mahatva marathi essay

यशाच्या पाठीमागचे खरे कारण हे वेळ आहे. जगातील यशस्वी लोकांनी वेळेचे महत्व जाणले आहे ते त्यांचे प्रत्येक काम ठरलेल्या वेळी करतात म्हणून ती मंडळी आज यशाच्या शिखरावर आहेत. बॉलीवुड मधील हीरो अक्षय कुमार हा सकाळी पहाटे चार वाजता उठतो आणि व्यायाम करतो आणि दिवसाच्या कामाचे नियोजन सकाळी पहाटे करतो, म्हणून तो आज एक यशस्वी हीरो बनला आहे.

त्याचबरोबर मोठ मोठ उद्योगपती हे सुद्धा आपल्या आयुष्यात वेळेबाबत अतिशय जागरूक असतात, ते आपल्या वैयक्तिक जीवनात चालणे, वाचन, महत्वाच्या भेटी अशा कामांना अतिशय महत्व देतात म्हणून ते आज यशस्वी उद्योगपती बनले आहेत. वेळ प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे बद्दल घडवत असते. व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकाला निसर्गाकडून समान वेळ मिळते पण इथे प्रश्न हा आहे की कोण त्या वेळेचा कसा उपयोग करतो हे त्या व्यक्तिवर अवलंबून आहे.

मित्रांनो अजून ही वेळ गेलेली आहे, कारण आजचा दिवस हा आपल्यासाठी एक नवी संधी घेऊन आलेला आहे. त्यामुळे गेलेल्या दहा हजार दिवसांपेक्षा आजचा दिवस हा तुमच्यासाठी एक नवा जन्म आहे एक नवी संधी आहे त्यामुळे वाया गेलेल्या वेळेचा, दिवसांचा जास्त विचार न करता पुन्हा कामाला लागा आणि यश मिळेपर्यंत थांबू नका.

सूचना: जर तुम्हाला Veleche Mahatva Marathi Essay हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.🙏

हेही वाचा:

Leave a Comment