आंबा झाड संपूर्ण माहिती व निबंध Mango Tree Information in Marathi

Mango tree information in Marathi

Mango tree information in Marathi, information about mango tree in Marathi, mango in Marathi, essay on amba in Marathi, my favourite fruit mango essay in Marathi, majha avadta fal in Marathi Mango, 5, 10, 20 lines on mango tree in Marathi, my favourite tree essay in Marathi.

आंबा आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. सर्व फळांमध्ये आंबा हे फळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. आंबा हे फळ चवीने अगदी गोड असल्यामुळे आंब्याचा रस आवडीने बनवला जातो. लहानांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत आंबा सर्वांना खायला आवडतो.

आंब्याच्या अनेक झाडांच्या समूहाला आमराई असे म्हणतात. महाराष्ट्रमध्ये आंब्याची ओळख कोकणचा राजा अशी आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये आंब्याच्या झाडांना आंबे येतात, पण सध्याच्या काळात आंब्याचा ज्यूस वर्षभर मार्केटमध्ये सुंदर पॅकेटमध्ये व बॉटलमध्ये पिण्यासाठी उपलब्ध असतो. आंब्याच्या झाडाला आंबे येण्याअगोदर एक सुगंधी मोहर येतो.

Mango tree information in Marathi

आंब्याच्या फळापासून मॅंगो पल्प, मॅंगो कुल्फी, मॅंगो ज्यूस, मॅंगो बर्फी, मॅंगो आईस्क्रीम, मॅंगो केक असे अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. भारतामध्ये जवळपास आंब्याच्या तेराशे प्रजाती आढळतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या पंचवीस ते तीस जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असल्यामुळे त्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते.

आंब्यामध्ये अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. आंबा हे फळ मार्केटमध्ये लोकप्रिय फळ असल्यामुळे अनेक कंपन्यांनी आंब्याचा ज्यूस वर्षभर ग्राहकांना देता यावा म्हणून अनेक प्रकारचे आंब्याच्या रसाचे प्रोडक्स मार्केटमध्ये आणले आहेत.

Mango tree information in Marathi

आंबा हे झाड उंच व भरपूर सावली देणारे झाड आहे. आंबा हे झाड सर्वसाधारणपणे 15 मीटर पर्यंत उंच आढळते, कधीकधी ते वीस ते तीस मीटरपर्यंत उंच आढळते. भारतामध्ये आंब्याच्या तोतापुरी, निलम, हापूस, पायरी, रत्ना, सिंधू ,वनराज, केशर अशा विविध जाती आढळतात. कच्चा आंब्यापासून चविष्ट असे लोणचे बनवले जाते.

ग्रामीण भागामध्ये कच्च्या आंब्यापासून लोणचे बनवले जाते व ते वर्षभर खाण्यासाठी पुरावे म्हणून मातीच्या मटक्या मध्ये साठवून ठेवले जाते. शहरी भागांमध्ये हेच लोणचे आपल्याला वेगवेगळ्या पॅकेटमध्ये आढळते. आंब्याच्या रसाचे व पानांचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. आंब्याचा रस शरीराला आवश्यक अ जीवनसत्व पुरवतो, त्याचबरोबर शरीराची कांती सुधारते. व्यापारीदृष्ट्या व भरघोस उत्पन्नाच्या दृष्टीने आंबा हे फळ उत्पादकांसाठी व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते व मोठ्या प्रमाणात आंब्याची उत्पादन केले जाते. सध्या अनेक चवीच्या पदार्थांमध्ये आंब्याचा फ्लेवर आढळतो.

Mango tree information in Marathi

आंबा हे शरीराच्या दृष्टीने आरोग्यदायी फळ आहे व शक्तिवर्धक फळ आहे. सध्या वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी हा फळ लागवडीकडे वळला आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने आंबा लागवड ही फायदेशीर ठरू लागली आहे.

सध्या शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आंब्याच्या बागेमध्ये आंतरपीक घेत आहेत त्यामध्ये भाजीपाला व दररोजच्या भाजीसाठी लागणारी मंडई पिकवू लागला आहे व शेतीमध्ये दुहेरी उत्पन्न मिळू लागला आहे.

सध्या आंब्याची लागवड पारंपारिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने केली जाऊ लागली आहे, त्यामुळे शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येणे शक्य झाले आहे.

आंबा हे फळ आपल्या संस्कृतीमध्ये लोकप्रिय असल्यामुळे आंबा या फळावर अनेक लोकगीते आढळतात. आंबा हे फळ सोनेरी रसदार फळ आहे त्यामुळे पाहता क्षणी आंबा हे फळ खाण्याचा मोह सर्वांना होतो, त्यामुळे या फळाला स्वर्गीय फळ असे देखील म्हटले जाते. आहारामध्ये शरीराच्या वजन वाढीसाठी आंब्याचा रस व दूध एकत्र करून ग्रहण केला जातो.

सूचना: “Mango tree information in Marathi” या लेखामध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment