गणपती वरून मुलांची नावे, Ganpati Varun Mulanchi Nave.
अनंत, अमित, अवनीश, अविघ्न, एकदंत, कपिल, कवीश, कीर्ति, गजनान, गणेश, गणपति, चतुर्भुज, तरुण, दूर्जा, देवेन्द्र, नंदन, श्वरम, पीतांबर, पुरुष, प्रथमेश, प्रमोद, नाथ, भालचन्द्र, भूपति, मंगल, मनोमय, मुक्ति, यश, रुद्र, लंबोदर, वरद, विनायक, राज, राजेन्द्र, विघ्नेश, विद्याधर, विनायक, विश्वजीत, वीर,शशि,शांभवी,शुभम, श्वेता, सिद्धांत, सिद्धिविनायक, सुमुख, सुरेश्वरम, स्वरुप, शुभन, अनवीत, विश्वराज, कीर्ती, रधव, श्री, श्रीनय, धार्मिक, तनुष, चिन्मय, कविश, इत्यादि.
आणखी वाचा:
दोन अक्षरी मुलींची नावे मराठी अर्थासहित
श वरून मुलांची नावे Marathi Boy Names Starting with Sha
उ वरून मुलींची नावे Baby Girl Names Starting With U in Marathi
राजघराण्यातील मुलांची नावे Royal Names For Boy
माता पार्वती व पिता महादेव यांचे पुत्र श्री गणेश हे सर्व देवी देवतांमध्ये सर्वात अगोदर पूजले जाणारे व नवसाला पावणारे श्री गणेश हे सर्वांचे लाडके आहेत. लहान थोर सर्वांना श्री गणेशाची सुंदर मूर्ती आवडते. कोणतेही शुभ कार्य हाती घेण्यापूर्वी श्री गणेश देवाचे नमन केले जाते, त्या कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते. आपल्या भारतीय संस्कृति मध्ये श्री गणेशाचे स्थान सर्व ठिकाणी अढळ आहे.
गणपती वरून मुलांची नावे
श्री गणेश नवसाला पावणारे असल्यामुळे ते त्याच्या सर्व भक्ताची सर्व इच्छा लगेच पूर्ण करतात. कामाची सुरुवात करण्यापासून ते कामाचा शेवट करण्यापर्यंत श्री गणेशाचे स्मरण केले जाते. श्री गणेश उत्सवाच्या वेळी श्री गणेशाची सुंदर मूर्ती घरोघरी स्थापित केली जाते तसेच श्री गणेशाची सुंदर मूर्ती सार्वजनिक ठिकणी सुद्धा स्थापित केली जाते.
श्री गणेश उत्सवामध्ये श्री गणेशाची रोज सकाळी संध्याकाळी आरती केली जाते. गणपती समोर सांस्कृतिक कार्यक्रम भरवले जातात, तसेच समाजप्रबोधन केले जाते, आणि 11 व्या दिवशी श्री गणेशाचे वाद्यांच्या गजरात, श्री गणेशाच्या जयजयकाराच्या घोषणा देत विधिवत विसर्जन केले जाते.
श्री गणेशाची उत्पती ही माता पार्वतीच्या शरीराच्या मळापासून झाली आहे. श्री गणेशाची उत्पती माता पार्वतीने स्व:त अंघोळीच्या वेळी स्वत:च्या शरीराच्या मळापासून केली आहे.
माता पार्वती अंघोळ करत असताना श्री गणेश जन्मास आले, त्यावेळी माता पार्वतीने आपल्या पुत्रास श्री गणेशास सांगितले कि हे बाळ मी अंघोळ करत असताना कोणी जर येत असेल तर त्याला माझी अंघोळ होईपर्यंत तिथेच थांबवून ठेव,
मातेने असे सांगितल्यानंतर श्री गणेश मातेच्या रक्षणाकरिता प्रवेशद्वारा जवळ थांबले, त्यावेळी अचानक पिता महादेव आले आणि प्रवेश द्वाराजवळ येताच श्री गणेशाने महादेवास अडवले व सांगितले कि माझी माता आतमध्ये अंघोळ करत आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही अशी माझ्या मातेची आज्ञा आहे,
श्री गणेशाचा हट्ट पाहून महादेव क्रोधित झाले, महादेवाला आपला क्रोध अनावर झाला आणि महादेव व श्री गणेश या दोघांमध्ये भयंकर मोठे युद्ध सुरू झाले शेवटी महादेवाने आपल्या त्रिशूळाने श्री गणेशाचे शिर उडवले.
माता पार्वती अंघोळ करून आल्यावर हे दृश्य पाहताच रडू लागली आणि तिने महादेवाला सर्व हकिकत सांगितली. पार्वती श्री गणेशाला पुन्हा जीवंत करण्याची महादेवाकडे प्रार्थना करू लागली. महादेवाने यावर उपाय सुचवत श्री गणेशाला हत्तीचे तोंड बसवले आणि श्री गणेशाला पुन्हा जीवंत केले, आणि श्री गणेशाला अनेक आशीर्वाद दिले.
मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये श्री गणेशाच्या नावावरून मुलांची काही निवडक नावे पाहणार आहोत, या पोस्टमध्ये दिलेल्या नावांमधून तुम्ही एखादे सुंदर नाव आपल्या बळासाठी निवडू शकता. सर्वप्रथम आपण आपल्या बाळासाठी श्री गणेशाचे नाव ठेवणे पसंत करत आहात हेच मोठ पुण्याच काम आहे
यावरून आपली श्री गणेशावरची आस्था, भक्ति दिसून येते, या निर्णयाबद्दल मी आपला आभारी आहे. मित्रांनो श्री गणेशाच्या प्रत्येक नावात यश, कीर्ती, वैभव, शुभता, मंगलता, लपली आहे, त्यामुळे श्री गणेशाच्या नावावरून आपल्या मुलास नाव देणे अतिशय लाभकारक, मंगलकारक, व शुभ ठरेल.
सूचना: मित्रांनो जर तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेली “गणपती वरून मुलांची नावे Ganpati Varun Mulanchi Nave” आवडली असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेअर करा.