घोड्या बद्दल महत्वाची माहिती Horse Information in Marathi

Horse Information in Marathi, माझा आवडता प्राणी घोडा, my favourite animal horse essay in Marathi, ghoda vishay mahiti marathi madhe, घोड्या बद्दल महत्वाची माहिती.

गतीचा प्रतीक असलेला व ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने न थकता धावणारा प्राणी म्हणजे घोडा. प्राचीन काळापासूनच माणसाचे आणि घोड्याचे जवळचे नाते राहिले आहे. प्रवासापासून ते युद्ध लागण्यापर्यंत प्राचीन काळापासूनच घोडा याचा वापर होत आला आहे. तसेच सजीव सृष्टी वरील सुंदर प्राण्यांमध्ये घोड्याची गणना केली जाते.

Horse Information in Marathi
Horse Information in Marathi

पृष्ठवंशी सस्तन प्राण्यांमधील इक्व्स या जात कुळातील घोडा हा प्राणी आहे, तसेच त्याचे शास्त्रीय नाव इक्व्स फेरस असे आहे, त्याची शरीररचना ही विशिष्ट प्रकारची असते. मजबूत लांब धावण्यात मदत करतील असे चार पाय, सतर्क असणारे लांब कान, गोंडस डौलदार असे शेपूट त्याच्या शरीरावरती बहुतांशी मानेवरती आणि शेपटावरती जास्त केस असतात, त्याच्या रंगांमध्ये विविध जाती नुसार विविधता आढळते.

तरी पूर्णपणे काळे किंवा पांढरे घोडे अतिशय लोकप्रिय आहेत. सरासरी घोड्याचे आयुष्यमान हे 25 ते 30 वर्षे असते, पण काही त्यापेक्षाही जास्त जगू शकतात. नर आणि मादीचा विचार करता नर हा शरीराने मजबूत व मादीपेक्षा जास्त सुंदर असतो.

विविध प्रदेशांमध्ये घोड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहण्यास मिळतात, त्यातील काही प्रमुख खालीलप्रमाणे अरबी घोडे, धुरवीय घोडा, सकेनडिनेव्हियन घोडा, भारतीय घोडा, मंगोलियन घोडा, अमेरिकन घोडा, इत्यादी. भारतात या घोड्याच्या विविध प्रजाती पाहण्यास मिळतात. जसे की सिंधी घोडा, मारवाडी घोडा, पंजाबी घोडा, भीमथडी तट्टू, पहाडी तट्टू, इत्यादी.

मंगोलिया या देशात घोड्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या देशात जगातील सर्वात जास्त घोडे म्हणजे सुमारे तीस लाख घोडे आहेत. असे म्हटले जायचे की एका मंगोलियन व्यक्तीचे अर्धे आयुष्य हे घोड्यावर बसून जायचे. प्राचीन काळी घोड्यावर सेना म्हणजे पंखाविना पक्षी असे मानले जायचे.

Horse Information in Marathi

कोणत्याही सेनेचा घोडा हा अविभाज्य घटक असे. त्यामुळे युद्धात व देशाच्या संरक्षणात घोड्यांचे योगदान असे. त्यामुळेच तर आज अनेक देशांच्या सेनामध्ये घोड्यांचे खास बटालियन असते. घोडे एकनिष्ठ व कृतज्ञ असल्यामुळेच काही घोड्यांनी  आपले नाव इतिहासात अजरामर केले आहे. जगविख्यात महाराणा प्रताप आणि त्यांचा शूरवीर घोडा चेतक यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांना माहीतच आहे.

एका लेखकाने चेतकचे वर्णन करताना म्हटले आहे कि, “रण बीच चौकडी भर-भरकर, चेतक बन गया निराला था। राणा प्रताप के घोडे से पड गया हवा को पाला था। भारतीय इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या सेनेतील पराक्रमी घोडदळाचे वर्णन इतिहासात आढळते.

प्राचीन काळापासूनच घोड्याच्या मदतीने खेळले जाणारे खेळ अतिशय लोकप्रिय आहेत, जसे की घोड्यांच्या शर्यती, हॉकी, पोलो, इत्यादी आज जगभरातून घोड्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच तर दरवर्षी मोठ-मोठाले घोड्यांचा लिलाव असणारे बाजार जगभरात भरतात.

भारतीय संस्कृतीत, लग्नसमारंभात नवरदेवाची घोड्यावरून वरात काढणे महत्त्वाचे असते. अशा प्रकारे चतुर, पराक्रमी, वाऱ्यासारखा चपळ, वेगवान, आकर्षक, एकनिष्ठ, कृतज्ञ प्राणी घोडा आणि माणूस यांचे जवळचे संबंध आपल्याला पाहण्यास मिळतात. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात घोड्यावर स्वार होण्याची हौस असते आणि घोड्यावरुन स्वार होऊन एक वेगळाच अनुभव मिळतो.

सुचना: मित्रांनो जर तुम्हाला “Horse Information in Marathi, घोड्या बद्दल महत्वाची माहिती, my favourite animal horse essay in Marathi” या पोस्टमध्ये दिलेली घोडयाविषयी माहिती, माहितीपूर्ण वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेअर करा.  

Leave a Comment