जल प्रदूषण मराठी माहिती उद्दिष्ट Jal Pradushan Vishleshan in Marathi

जल प्रदूषण मराठी माहिती उद्दिष्ट, Jal Pradushan Vishleshan in Marathi, जल प्रदूषण मराठी प्रकल्प माहिती प्रस्तावना, jal pradushan in Marathi nibandh, jal pradushan in marathi essay, jal pradushan par nibandh Marathi, jal pradushan information in Marathi, water pollution project for college pdf download in Marathi, pradushan ek samasya, water pollution in Marathi, जल प्रदूषण उद्दिष्टे.

Jal Pradushan Vishleshan in Marathi

एक असा काळ होता जेव्हा नदीला एखाद्या देवी सारखे पुजले  जात होते, मात्र आज आपण पाहतो की देवी समान मातेच्या गर्भात जगभरातील घाण टाकून तिला दुषित केले आहे. हेच नाही तर सुंदर सरोवरे, तळी, समुद्र, महासागर (Lakes, ponds, seas, oceans) या निसर्गाच्या ठेव्याला विकासाच्या नावाखाली प्रदूषित करून सोडले आहे.

जलप्रदूषणची आज एक वैश्विक समस्या (Global Problem) बनली आहे, आणि मानवाला आता हळूहळू या समस्येचे दुष्परिणाम (Bad Effects) जाणवू लागले आहेत.  जलप्रदूषण होण्यामागे असंख्य कारणे आहेत.  विसाव्या दशकात औद्योगिक विकासाला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने जलप्रदूषण (Water pollution) होण्यास चालना मिळाली.  

कारखान्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी (Sewage) जसेच्या तसे नदीपात्रात व समुद्रात सोडण्यात येऊ लागले. यामुळे प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काही वेळेस समुद्रात खनिज तेल (mineral oil) निर्मिती करत असताना काही जहाजच पलटतात, यामुळे समुद्राच्या पाण्यावर एक खनिज तेलाचा थर तयार होतो.

यामुळे पाण्याखालील जीवनास खूप मोठा त्रास होतो, व मोठमोठ्या शहरातील सांडपाणी मलमूत्र (Sewage, excrement) हे मोठ्या प्रमाणावर नदीत सोडले जातात, या सर्व कारणांमुळे जल प्रदूषण वाढत चालले आहे. हे तर झाले भूपृष्ठावरील जलप्रदूषण आपण काही काळापासून भूजल प्रदूषण ही वाढू लागले आहे.

Jal Pradushan Vishleshan in Marathi

शेतात रासायनिक खते, विषारी कीटकनाशके, (Chemical fertilizers, toxic pesticides) यांच्या होणाऱ्या अतिवापरामुळे मातीत मिसळललेले हे हानीकारक पदार्थ भुजला पर्यंत पोहचतात व यातूनच भूजल प्रदूषण (Water pollution) होते. असे जल पिण्यास योग्य राहत नाही. हे घातक आणि अपायकारक ठरू शकते, या दूषित झालेल्या पाण्यामधून दुर्गंधी (Stinky) येऊ लागते, ते बघण्यासही घाणेरडे वाटते, असे पाणी पिण्याच्या व वापरण्याच्या दृष्टीने योग्य राहत नाही.

जल प्रदूषण ही आज एक समस्या बनली आहे. सर्वांनी एकत्र येऊन या समस्येला तोंड देणे गरजेचे आहे. आज अनेक ठिकाणी या दूषित पाण्यामुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. दूषित पाण्यामुळे कावीळ, विषमज्वर, पोटाचे विकार, त्वचेचे विकार (Jaundice, typhoid fever, stomach disorders, skin disorders) अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रासायनिक युक्त पदार्थांचा समावेश असलेले पाणी पिल्याने किडनीचे त्रास होऊ शकतात.

Jal Pradushan Vishleshan in Marathi

हे सर्व रोखायचे असेल तर पर्याय एकच, प्रदूषण थांबवा! निसर्ग वाचवा! स्वतःचा जीव वाचवा! (Stop the pollution! Save nature! Save your own life!) यासाठी शासनाने योग्य ती खबरदारी घेऊन तातडीने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी (Implementation) केली पाहिजे. प्रक्रिया न करता दूषित पाणी नदीत व महासागरात सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली पाहिजे.

शहरातील सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर करावा. mineral oil मुळे होणाऱ्या प्रदूषणावर योग्य त्या उपाययोजना आखाव्या. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करावा, त्यामुळे भूजल प्रदूषित होणार नाही. लक्षात ठेवा जल है तो कल है, या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी या समस्येवर मात करायला हवी.

प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून water pollution कसे कमी करता येईल यासाठी प्रयत्नशील असावे. मंदिरात गेल्यावर फुले, नारळ हे नदीत अर्पण करू नका, गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी न करता घरगुती विसर्जन करावे.

शासनाने गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी राबवलेल्या “नमामि गंगे” या प्रकल्प सारखे प्रकल्प संपूर्ण देशभर राबवले जावेत. जलप्रदूषणाला लवकर आळा नाही घालण्यात आला तर आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते, चला तर मग एक निर्धार करूया! पर्यावरण पूरक वर्तन करूया! आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कटिबद्ध राहुया.

सूचना: जर तुम्हाला “जल प्रदूषण मराठी माहिती उद्दिष्ट, Jal Pradushan Vishleshan in Marathi” या पोस्ट मध्ये दिलेली जल प्रदूषणविषयी माहीती जनजागृतीच्या उद्देशाने योग्य वाटल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेयर करा जेणेकरून जल प्रदूषण होण्यास काही प्रमाणात रोखता येईल.

Leave a Comment