{BEST} सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar Marathi Nibandh

surya ugavala nahi tar marathi nibandh, सूर्य उगवला नाही तर..!, if sun will not rise essay in marathi.

सकाळी सकाळी आईची हाक कानावर पडते. बाळा उठ सूर्योदय झाला, बघ बाहेर शाळेत जायचे ना तुला? तेव्हा असे वाटते की का हा सूर्य रोज रोज उगवतो, त्याच्यामुळे माझी दररोज झोप मोड होते, पण जर का सूर्य नाही उगवला तर किती मज्जा येईल ना! सकाळी सकाळी मला आईचे बोलणे एकावे लागणार नाही. मी मनसोक्तपने झोपेन. शाळेत जायची चिंता, आईची किटकिट ऐकावी लागणार नाही. सूर्य नाही उगवला तर शाळेला सुट्टी मिळेल.

Surya Ugavala Nahi tar Marathi Nibandh

सर्व माझ्यासारख्या मुलांसाठी तो आनंदाचा क्षण असेल. तसेच सूर्य नाही उगवला तर बाबांचे ऑफिस बंद राहील व तेही घरी राहतील आणि आईलाही पहाटे पहाटे उठून स्वयंपाक करण्याची गरज पडणार नाही. मी दिवसभर त्या दोघांसमवेत खेळत बसेल. मी माझ्या सर्व मित्रांना घरी बोलवेन व त्यांच्यासोबत दिवसभर खेळ, गप्पा गोष्टी मज्जाच मज्जा ना! पण जर का खरच सूर्य नाही उगवला तर कधी रात्र संपणारच नाही ना! संपूर्ण जग अंधारात आणि त्यात मला अंधाराची भीती 24 तास घरातच बसून राहावे लागेल.

घरातून बाहेर पडता येणार नाही. संपूर्ण जग ठप्प होईल सकाळी-सकाळी हळूच डोंगरा पाठीमागून डोकावून पाहणाऱ्या रवीराजाचे मनमोहक सुंदर रूप नजरेस पडणार नाही. सुर्यास्तावेळीचे ते केसरी रंगाने उजळलेले आकाश, ते विलोभनीय दृश्य अनुभवता येणार नाही. सर्व शाळा, कॉलेज, ऑफिस, कार्यालय सर्व काही बंद राहील. काही दिवस मज्जा येईल पण नंतर नंतर याचा त्रास होऊ लागेल. घरात बसून बसून कंटाळा येईल कोणालाही कामे नसतील, पैशाची ताना तान होईल.

Surya Ugavala Nahi tar Marathi Nibandh

दोन वेळचे जेवण मिळणे सुद्धा शक्य होणार नाही, आणि पिण्यासाठी पाणी ते तरी कसे मिळणार, का म्हणून कारण पाणी मिळवण्यासाठी पाऊस लागतो आणि पाऊस कशामुळे पडतो बाष्पीभवनामुळे आणि बाष्पीभवन होण्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे सूर्यप्रकाश.

आपल्याला अन्न मिळते ते वनस्पतीपासून आणि वनस्पती अन्न तयार करतात ते सूर्यप्रकाशाच्या मदतीने. जर सूर्यच नसेल तर त्या तरी अन्न कसे तयार करणार आणि त्यांना अन्न नाही मिळाले तर आपल्याला तरी कसे मिळेल अन्न. थोडक्यात पृथ्वीची गती परिस्थिती सर्वच काही बदलेल. सूर्य आहे तर हे सुंदर जग आहे, हा सुंदर निसर्ग आहे, हे नदी नाले डोंगर दऱ्या आहेत, यामुळे तर आपल्या संस्कृतीत सुर्याला देवता मानतात. त्याची पूजा करतात.

सूर्य आहे तरच आपली सजीवसृष्टी आहे. त्याच्या शिवाय आपले अस्तित्व धोक्यात येईल. खरंच सूर्य उगवला नाही तर इतके वाईट आणि भयानक दुष्परिणाम होतील याचा तर मी कधी विचारच नव्हता केला. नको रे देवा! सूर्यदेवताचे दररोज दर्शन झालेच पाहिजे. तो आहे तर मी आहे आणि संपूर्ण सृष्टी आहे, आणि राहिला प्रश्न माझ्या सकाळी उठण्याचा ते मी घेईल बघून कारण त्यासाठी मी संपूर्ण सृष्टीचे अस्तित्व नाही ना आणू शकत धोक्यात!

सूर्य देवता तूच आहेस जीवनाचा आधार, तुझ्याशीवाय शक्य नाही सजीव सृष्टीचा उद्धार!

सूचना: जर तुम्हाला “surya ugavala nahi tar marathi nibandh, सूर्य उगवला नाही तर..!, if sun will not rise essay in marathi” हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment