नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये Job application letter in Marathi

नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये Job application letter in Marathi

नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये Job application letter in Marathi

शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना वेध लागतात ते नोकरीचे. जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत आपला सर्व शैक्षणिक खर्च, वैयक्तिक खर्च हे सर्व आपले आई-वडील पाहत असतात, पण जेव्हा शिक्षण पूर्ण होते तेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलांना नोकरीच्या शोधात घराच्या बाहेर पडावे लागते. नोकरी हे एक उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.

प्राथमिक  गरजांची पूर्तता करण्यासाठी नोकरी अत्यावश्‍यक आहे. वाढती स्पर्धा, बेरोजगारी यामुळे नोकरी सहजासहजी मिळत नाही. नोकरी शोधण्यासाठी आपण वर्तमानपत्रांमध्ये नोकरी विषयक जाहिराती वाचतो. ऑनलाइन संकेतस्थळावर आपली शैक्षणिक माहिती (बायोडाटा) अपलोड करतो.

मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या ओळखीने नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतो. तसेच प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊन नोकरीचा शोध घेतो, असे अनेक प्रयत्न आपण नोकरी मिळवण्यासाठी करत असतो.

काही तरुण पदवी पूर्ण होताच प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) केंद्रीय लोकसेवा आयोग (यू.पी.एस.सी.) या परीक्षेची तयारी करतात. सध्याच्या काळात शासकीय नोकरी ही मानाची नोकरी मानले जाते, पण वाढत्या स्पर्धेमुळे शासकीय नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे, पण ते अशक्य सुद्धा नाही.

नोकरीसाठी अर्ज लिहिताना तो स्वतःच्या हस्ताक्षरातच लिहिला जावा.

 नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये Job application letter in Marathi

पत्र नमूना १: लिपिक या पदासाठी शिक्षण संस्थेस अर्ज.

विजय कुमार,

प्रेम नगर,

गांधी रोड,

सोलापुर १४.

दिनांक ०८/०५/२०२१

प्रति,

मा. अध्यक्ष,

जाणाई विद्यालय,

सोलापूर.

विषय: लिपिक पदासाठी अर्ज

अर्जदार: विजय सुरेश कुमार

संदर्भ: पुढारी वर्तमानपत्र जाहिरात दिनांक: ०४/०५/२०२१  

आदरणीय सर/मॅडम,

सादर नमस्कार वि. वि. आज सकाळी “पुढारी” वर्तमानपत्रामध्ये आपल्या विद्यालयाची नोकरी संदर्भात जाहिरात वाचली. जाहिरातीमध्ये लिपिक या पदासाठी बारावी पास उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, असा उल्लेख आढळला. त्यामुळे मी लिपिक या पदासाठी आपल्या संस्थेकडे अर्ज करत आहे. मी माझे शिक्षण बारावी वाणिज्य शाखेतून पूर्ण केले आहे. मला इयत्ता बारावी मध्ये एकूण 75 टक्के गुण मिळाले आहेत. इयत्ता बारावी मध्ये शिकत असताना मी सोबत संगणकाचा बेसिक कोर्स (एम.एस.सी.आय.टी.) सुद्धा पूर्ण केला आहे, तसेच मराठी टंकलेखन (30 शब्द प्रतिमिनिट) व इंग्रजी टंकलेखन (40 शब्द प्रतिमिनिट) हे दोन टंकलेखनाचे कोर्स सुद्धा यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मला पुढील शिक्षण घेता येत नाही, त्यामुळे सध्या मला उदरनिर्वाहासाठी नोकरी करणे गरजेचे आहे.

तरी माझा अर्ज स्वीकारावा ही नम्र विनंती. अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे पाठवत आहे.

वैयक्तिक माहिती:

नाव: विजय सुरेश कुमार

जन्मतारीख: ०१/०२/१९९९

शैक्षणिक पात्रता: इयत्ता १२ उत्तीर्ण

इतर शैक्षणिक पात्रता: मराठी टंकलेखन (30 शब्द प्रतिमिनिट)

इंग्रजी टंकलेखन (40 शब्द प्रतिमिनिट)

एम.एस.सी.आय.टी. संगणक बेसिक कोर्से

अनुभव: असेल तर  

सोबत:

१) एस. एस. सी. परीक्षेचे प्रमाणपत्र

२) एच. एस. सी. परीक्षेचे प्रमाणपत्र

३) एम. एस. सी. आय. टी. परीक्षेचे प्रमाणपत्र ४) मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षेचे प्रमाणपत्र

आपला विश्वासू,

स्वाक्षरी

विजय कुमार

If you find this article “नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये Job application letter in Marathi” helpful please share with your friends.

Leave a Comment