जाहिरात लेखन शिका सोप्या भाषेत Jahirat Lekhan in Marathi

Jahirat Lekhan in Marathi. जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी. मित्रांनो जाहिरात ही आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे, जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक, चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो. त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरात करणे ही एक कला आहे.

देशातील तसेच परदेशातील अनेक कंपन्या आपले उत्पादन बाजारामध्ये जास्तीत विकले जावे या हेतूने प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम फक्त जाहिरात करण्याकरिता खर्च करते. काही कंपन्या जाहिरात कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरिता कॉंट्रॅक्ट साईन करते. जाहिरातींचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे, आजच्या युगात जाहिरात ही डिजिटल झाली आहे.

संगणकाच्या मदतीने जाहिरात डिजिटल बनवली जात आहे, जाहिरातीमध्ये ऑडिओ, विडियोचा वापर करून वस्तूंचा प्रत्यक्ष वापर दखवला जात आहे. त्यामुळे जाहिरात अधिक आकर्षक होऊ लागली आहे. तसेच जाहिरात ही फेसबूक, व्हाटसप्प, लिंकडेन, टेलेग्राम, व यूट्यूब सारख्या सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न उत्पादक कंपन्या करत आहेत. जाहिरात डिजिटल झाल्यामुळे कंपनीला प्रत्यक्ष ग्राहक शोधण्याची गरज पडत नाही, कारण जाहिरात ही डायरेक्ट ग्राहकाच्या मोबाइल वर पोहचली जात आहे.

जाहिरात लेखन ही एक सृजनशील कला आहे त्यामुळे यावर प्रभुत्व मिळवणे ही आजच्या काळाची गरज आहे, आपण बाजरामध्ये, भाजी मंडई मध्ये पाहतो भाजी विक्रेता हा ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता मोठ्या आवाजात विनोदी भाषेचा वापर करून ओरडत असतो, ही सुद्धा एक जाहिरातच आहे. व्यवसायामध्ये जाहिरातील अधिक महत्व दिले जात आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये जाहिरात लेखन हा प्रश्न हमखास विचारला जातो. त्यादृष्टीने या लेखामध्ये दिलेली माहिती जाहिरात लेखन करताना उपयुक्त ठरेल.

Jahirat Lekhan in Marathi जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी

जाहिरात लेखन करताना जाहिरातीची भाषा लक्षात घेणे महत्वाचे आहे, ती खालील मुद्यांना अनुसरून असावी.

जाहिरातीची भाषा:

उत्पादनाची गुणवत्ता निर्माण करणारी: उत्पादन किती प्रभावी आहे, किती गुणकारी आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा.  

कमी शब्दात जास्त आशय निर्माण करणारी: कमी शब्दांचा वापर करून जास्त अर्थ किंवा जो संदेश द्यायचा आहे तो भाषते समाविष्ट करण्यात यावा.  

प्रभावी शब्द रचना असावी: भाषेमध्ये वाक्यरचना ही परिणामकारक असावी, सरळ आणि उत्पादनाचे प्रतिबिंब दाखवणारी असावी.

उत्पादन(वस्तु) मिळण्याचे ठिकाण यांचा स्पष्ट उल्लेख असावा: उत्पादन ज्या ठिकाणी ग्राहकाला विकत मिळेल त्या ठिकाणाचा पत्र व्यवहाराचा पत्ता, ईमेल, व फोन नंबर इत्यादि माहिती देण्यात यावी.

अलंकारिक, काव्यमय शब्दांचा वापर वाक्यरचनेत असावा: उदाहरणार्थ: नमक कम ही खाऐ, पर अच्छा खाऐ! ….हे वापरा आणि आयुष्यभर तरुण रहा.

उत्पादनाची किंमत, सवलत यांचा स्पष्ट उल्लेख असावा: उत्पादनाचे वजन, विक्रीची किंमत, व उत्पादनावर असणारी चालू ऑफर यांचा उल्लेख करण्यात यावा.  

उत्पादनाची गरज निर्माण करणारी असावी: ग्राहकाने हे उत्पादन का विकत घ्यावे, इतर उत्पादनाच्या तुलनेत हे का फायदेशीर आहे याचे स्पष्टीकरण थोडक्यात असावे.

सूचना: जाहिरात ही पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये. जाहिरातीमध्ये चित्र काढू नये. चित्र, नक्षी वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. जाहिराती सभोवती एक साधी चौकट पुरेशी आहे.

जाहिरातीची प्रसिद्ध माध्यमे:

इंटरनेट (Google, Bing, yahoo,) सोशल मीडिया (Facebook, Whatsapp, Linkedin, Youtube) मासिके, वर्तपत्रे (सकाळ, पुढारी, लोकमत, पुण्य नगरी), आकाशवाणी (Radio) दूरदर्शन (Television) फलक (Hoardings)

प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात?

  1. वरील जाहिरातीचे अधिक आकर्षक व प्रभावी स्वरूपात पुनर्लेखन करा.
  2. शब्दावरून जाहिरात लेखन करणे.

उदहारणार्थ: दूध, शुद्ध देसी, भरपूर कॅल्शियमची मात्रा, ग्राहक समाधान. (जे शब्द प्रश्नात दिले आहेत त्यांचा वापर जाहिरातीमध्ये करण्यात यावा)

Jahirat Lekhan in Marathi 9th 10th
Jahirat Lekhan in Marathi. जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी.

3. Ready made जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. (म्हणजे त्या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न विचारले जातात.)

उदाहरणार्थ:

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

Jahirat Lekhan in Marathi 9th 10th
Jahirat Lekhan in Marathi. जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी.
  1. व्यायामशाळेचे व्यवस्थापक:- सुरेश माने

2. व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ:- आरोग्य हेच खरे धन आहे.

3. व्यायामशाळेचे नाव:- हनुमान व्यायामशाळा

4. जाहिरातीतून मिळणारा संदेश:- आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे.

अशा प्रकारे जाहिरात लेखनावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात.

आपणास जर “Jahirat Lekhan in Marathi. जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी. जाहिरात लेखन मराठी.” या लेखामध्ये दिलेली माहिती अभ्यासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण वाटत असल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment