सिंहाची अद्भुत माहिती Lion Information in Marathi

Lion Information in Marathi. sinhachi mahiti. Lion in Marathi. सिंहाची माहिती.

जंगलाचा राजा अशी सिंहाची ओळख आहे, जंगलातील सर्व प्राणी सिंहाला घाबरतात. सिंह शौर्याचे, शक्तीचे प्रतिक आहे. सिंह प्राणी मांसाहारी आहे. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे सिंहाची शिकार करणे पसंत करत होते, कारण त्यावेळी सिंहाची शिकार करणे शौर्याचे प्रतिक मानले जात होते. त्याकाळी राजदरबारी सिंह सुद्धा पाळले जात असत. अनेक काल्पनिक कथा, कादंबऱ्या, कविता, गोष्टी, व काव्यरचना इत्यादी साहित्यामध्ये सिंहाचे वर्णन आढळते.

Lion Information in Marathi
Lion Information in Marathi. sinhachi mahiti. Lion in Marathi. सिंहाची माहिती.

खाद्य:

सिंह हा हरीण, काळवीट, रानडुक्कर, चितळ, रानम्हैस, व गोगलगाय इत्यादी प्राण्यांची शिकार करतो व आपले पोट भरतो. सिंह दिवसाला 18 पौंड इतके मांस खातो.

प्रजाती:

जगामध्ये आफ्रिकन आणि आशियाई हे दोन प्रकारचे सिंह आढळतात. पूर्वी अस्तित्वात असलेले युरोपीयन सिंह आणि बारबेरी सिंह आता संपुष्टात आले आहेत.

शारीरिक रचना:

सिंहाच्या शरीराचे वजन 150 ते 250 किलोपर्यंत असते. पांढऱ्या रंगाचा सिन्हा दक्षिण आफ्रिकेत आढळतो. आतापर्यंत जगातील सर्वात जास्त वजनी सिंह हा 375 किलो होता.

ऐतिहासिक महत्व:

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांना लोप पावत चाललेल्या प्राण्यांच्या यादीत टाकण्यात आले व त्यांचे जतन संवर्धन करण्यासाठी शासनाद्वारे पावले उचलण्यात आली. देशातील गुजरात राज्यातील “गीर” हे सिंहांसाठी वनक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जुनागढच्या नवाबाने सिंहांची शिकार करण्यावर पूर्णता बंदी आणली होती.

Lion Information in Marathi. sinhachi mahiti

वैशिष्ट्य:

सिंह दिवसातून वीस तास झोप घेतो. भारतीय राष्ट्र चिन्हावर चार दिशेला तोंड करून उभे असलेल्या सिंहांचे चित्र आढळते. सिंहाच्या पिल्लाला छावा असे म्हणतात. सिंह गर्जना करतो. सिंहाची गर्जना चारी बाजूला पसरते. सिंह हे शौर्याचे प्रतिक आहे, त्यामुळे सिंहाचे चित्र अनेक प्राचीन नाणी, शिल्पे, व मूर्ती इत्यादी मध्ये आढळते.

सिंहाला निष्ठा आणि स्थिरतेचे प्रतीक सुद्धा म्हणले जाते. एका नरसिंहाची गर्जना पाच मैलापर्यंत जाऊ शकते. नर सिंह व मादी सिहं मध्ये नर सिंह समुहाचे संरक्षण करतात तर मादी सिंह शिकार करतात. दक्षिण आफ्रिकेत पांढऱ्या रंगाचा सिंह पाहण्यास मिळतो.

शरीराचे वजन जास्त असल्यामुळे सिंहाला शिकार करणे अवघड जाते, त्यामुळे त्याला शिकार करण्यासाठी चार वेळा प्रयत्न करावे लागतात, तेव्हा एखादी शिकार त्याच्या हाती लागते. मादी सिंह एकावेळी 2 ते 3 किंवा 6 पिल्लांना जन्म देते. जन्मलेल्या सिंहाचे वजन कमीत कमी दीड किलोपर्यंत भरते. जन्मलेल्या पिलांचे डोळे 3 ते 11 दिवसात उघडतात. आतापर्यंत जगातील सर्वात जास्त वजनी सिंह हा 375 किलो होता.

सिंहावरील संकट:

वाढत्या आधुनिकीकरणामुळे जंगल, वृक्ष यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, त्यामुळे सिंहासारख्या जंगली प्राण्यांना राहण्यास योग्य ठिकाण राहिले नाही, त्यामुळे सिंहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सिंहाची देखभाल करण्यासाठी, त्यांचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राणिसंग्रहालये उभारली गेली आहेत.

शास्त्रीय नाव:

पॅंथेरा लिओ

Note: If you like the information shared in this post “Lion Information in Marathi. sinhachi mahiti. Lion in Marathi.” please share with your friends on social media.

Leave a Comment