वाढदिवस निमंत्रण पत्र मराठी Birthday Invitation Letter In Marathi

वाढदिवस निमंत्रण पत्र मराठी Birthday Invitation Letter In Marathi. परीक्षेमध्ये व्याकरण या विभागामध्ये मित्रास/मैत्रिणीस वाढदिवसाचे निमंत्रण देणारे पत्र लिहा हा प्रश्न नेहमी विचारला जातो.

आज आपण या पोस्टमध्ये वाढदिवसाचे मित्रास/मैत्रिणीस  निमंत्रण देणारे पत्रांचे काही नमुने पाहणार आहोत.

पत्र नुमना १:

तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्राला/मैत्रिणीला आमंत्रण देणारे पत्र लिहा.

वाढदिवसानिमित्त मित्राला आमंत्रण देणारे पत्र

दिनांक २० मे, २०२१.  

प्रति,

संदेश महेश राणे,

विजय अपार्टमेंट,

राणे वसाहत,

सोलापूर ४०८०४.

[email protected]

प्रिय संदेश,

सप्रेम नमस्कार,

एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी तुला पत्र पाठवत आहे. पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे तुला तर माहीतच आहे तुझ्याशिवाय माझा वाढदिवस साजरी होणे अशक्य आहे, म्हणून वाटल सर्वात प्रथम माझ्या वाढदिवसाची आनंदाची बातमी तुला द्यावी. मित्रा यावर्षी माझा वाढदिवस आम्ही निसर्गाच्या सानिध्यात करण्याचे ठरवले आहे, जवळच असलेल्या “निसर्ग” रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट मेजवानीचे आयोजन सुद्धा केले आहे. किती सुंदर असेल ना निसर्गरम्य वातावरणात वाढदिवस साजरी करणं! चारी बाजूंनी वृक्षवल्ली, फुले, पाखरे, झाडे-झुडपे, पाण्याची तलाव, व झरे या सर्वांसोबत वेळ घालवायला किती मज्जा येईल ना मित्रा! माझे आई-बाबा सुद्धा खूप खुश आहेत, कारण त्यांना माझा हा निर्णय खूप मनापासून आवडला आहे, त्यांनी सुद्धा मी निसर्गप्रेमी असल्याचं ओळखून माझं कौतुक केल आहे. मी वाढदिवसाचे निमंत्रण माझ्या सर्व नातेवाईकांना तसेच वर्ग मित्र-मैत्रिणींना सुद्धा दिल आहे, त्यामुळे तर वाढदिवसाला खरी गंमत येणार आहे. नव्या जुन्या आठवणी, हसणं, खेळणं, गंमत जंमत यांची खूप छान मैफिल असेल आणि तू तर या सोहळ्याचा खरा आनंद आहेस मित्रा. त्यामुळे तू माझ्या वाढदिवसाला आलाच पाहिजे. तुझी आतुरतेने वाट पाहत आहे.

कळावे,

तुझा मित्र

संकेत

वाढदिवस निमंत्रण पत्र मराठी Birthday Invitation Letter In Marathi

पत्र नुमना २:

मैत्रीणीस वाढदिवसाचे निमंत्रण देणारे पत्र

दिनांक २० मे, २०२१.  

प्रति,

वंदना विनोद म्हात्रे,

संध्या अपार्टमेंट,

काटे नगर,

सोलापूर ६०९०४.

[email protected]

प्रिय वंदना,

चांगले आठवडाभर अगोदर पत्र लिहित आहे, कारण पत्र लिहिण्यास कारणच तसे आहे. ओळख पाहू काय कारण असेल, अगं वेडी पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे आणि तुला तर माहीतच आहे तू जर माझ्या वाढदिवसाला नसेल तर वाढदिवस साजरी करायला काहीच अर्थ उरत नाही, म्हणून दरवर्षीप्रमाणे मी तुला माझ्या वाढदिवसाची आठवण करून देत आहे. पाठीमागच्या वर्षीप्रमाणे अगदी यावर्षी सुद्धा आनंदात वाढदिवस साजरी करण्याचे ठरवले आहे. मी आपल्या शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणींना सुद्धा वाढदिवसाचे निमंत्रण दिले आहे, त्या सर्वांनी वाढदिवसाला येण्याची तयारी दर्शवली आहे. या वेळेस आम्ही वाढदिवस घरात साजरी न करता घरापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या “पूजा गार्डन” मध्ये साजरी करण्याचे ठरवले आहे. आम्ही वाढदिवसाची संपूर्ण तयारी दोन दिवस अगोदरच करणार आहोत. वाढदिवसाला फटाके, सजावट यावर खर्च न करता बागेच्या आजूबाजूला फुटपाथवर घरी राहणाऱ्या लोकांना कपडे, गरजेच्या वस्तू व अन्नदान देऊन वाढदिवस साजरी करणार आहोत. माझ्या या अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरी करण्याच्या विचाराला आई-बाबांनी संमती दिली आहे, त्यांनी माझ्या चांगल्या विचारांचे खूप कौतुक केले आहे. तुला पुन्हा एकदा सांगते की तू माझ्या घरी वाढदिवसाअगोदर दोन दिवस हवी आहेस. तुझी आतुरतेने वाट पाहत आहे.

कळावे,

तुझी मैत्रीण

सुजाता

लेखकाचे मनोगत:

वर्षातून एकदा येणारा वाढदिवसाचा दिवस हा खूप आनंदाचा असतो, त्यादिवशी असणारी रोषणाई, सजावट, स्वादिष्ट जेवणाची मेजवानी मित्र-मैत्रिणी यांचा सहवास हे सर्व अगदी मनाला आनंद देणारे असते. वाढदिवस म्हणजे जणू दुसरी दिवाळीच होय. मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांनी दिलेल्या आकर्षक भेटवस्तू त्यांनी भरवलेला आईस केकचा घास, हे सर्व काही अगदी वर्षभर लक्षात राहतं. आपल्या वाढदिवसाला आपले जवळचे जिवलग मित्र मैत्रिणी नसतील तर वाढदिवस साजरी करायला काहीच मज्जा येत नाही.

Leave a Comment