तक्रार पत्र लेखन मराठी महापालिकेस Complaint Letter in Marathi

तक्रार पत्र लेखन मराठी 9वी, १०वी. Complaint Letter in Marathi. complaint letter to municipal corporation in marathi.

तक्रार पत्र लेखन हे औपचारिक पत्र लेखनामध्ये मोडते, या पत्र लेखनामध्ये तक्रार पत्र हे शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, कंपनी/ट्रस्टचे व्यवस्थापक, अधीक्षक, पोलीस निरीक्षक, नगरपालिका, संघटना अध्यक्ष, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, कृषी अधिकारी, शासकीय व निमशासकीय अशा अनेक अधिकारी व विभागांना पाठवले जाते.

complaint letter in Marathi

आपण राहतो त्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी आपणास एखाद्या गोष्टीची असुविधा किंवा त्रास होत असेल तर आपण संबंधित विभागातील अधिकाऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार पत्र लिहू शकतो, असे तक्रार पत्र लेखन परीक्षेमध्ये हमखास विचारले जाते.

आज आपण या पोस्टमध्ये तक्रार पत्र लेखनाचे काही नमुने पाहणार आहोत.

पत्र नमूना १:

तुमच्या भागात पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्या कारणाने  महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.

दिनांक २० मार्च, २०२१,

प्रति,

आरोग्याधिकारी,

आरोग्य विभाग,

सातारा नगरपालिका,

सातारा ४०४३००.

[email protected]

विषय: पिण्याचे अशुद्ध पाणीपुरवठाच्या तक्रारी बाबत

महोदय,

मी गणेश विजय सातपुते, मल्हार पेठ परिसरात राहणारा नागरिक आहे, गेल्या दोन आठवड्यापासून मल्हार पेठ परिसरात अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे, त्यामुळे मल्हार पेठ परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. महिला-पुरुष व लहान बालके यांची प्रकृती खालावली आहे. अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक काविळ, अतिसार यांसारख्या रोगांना बळी पडू लागले आहेत. कृपया आपण या समस्येकडे लक्ष देऊन पाणी पुरवठा करणार्‍या विभागाला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना द्याव्यात.

आपला विश्वासू,

गणेश विजय सातपुते,

संस्कृती निवास,

मल्हार पेठ,

सातारा ४०४३००.

[email protected]

तक्रार पत्र लेखन मराठी Complaint Letter in Marathi

पत्र नमूना २: तुमच्या भागात घंटा गाडी नियमित येत नसल्या कारणाने  महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.

दिनांक २२ एप्रिल, २०२१,

प्रति,

आरोग्याधिकारी,

आरोग्य विभाग,

सोलापूर नगरपालिका,

सोलापूर ४९९३००.

[email protected]

विषय: घंटा गाडी (कचरा गाडी) संबंधित तक्रार…

महोदय,

मी सुरेश सुहास पोळ, गुरुवार पेठ परिसरात राहणारा नागरिक आहे, गेल्या एक  महिन्यापासून गुरुवार पेठेच्या मुख्य भागात घाणीचे साम्राज्य साठलेले आहे. त्या ठिकाणी कचऱ्याची गाडी नियमित येत नाही, त्यामुळे वरचेवर नागरिक कचरा आणून कचरापेटीत टाकत आहेत पण कचरा पेटी पूर्ण भरून खाली कचरा सांडत आहे, त्यामुळे गुरुवार पेठेतील मुख्य भाग अगदी कचरामय झाला आहे.

घंटा गाडी नियमित येत नसल्यामुळे कचरा पेटीत आणखीनच भर पडत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आले आहे, अनेक प्रकारचे डास, मच्छर यांची उत्पती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे, परिणामी रोगराई वाढीस लागून परिसरातील लोक आजारी पडू लागले आहेत, तरी कृपया आपण या समस्येकडे लक्ष देऊन साफसफाई विभागाला सूचना द्याव्यात ही विनंती.

आपला विश्वासू,

सुरेश सुहास पोळ,

विद्या अपार्टमेंट,

गुरुवार पेठ,

सोलापूर ४९९३००.

[email protected]

Leave a Comment