क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लेखन Krida Sahitya Magni Patra In Marathi

क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लेखन Krida Sahitya Magni Patra In Marathi

पत्र नमूना: १

प्रश्न: अर्जुन स्पोर्ट्स, विजय नगर, जळगाव क्रीडा साहित्य मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण. सवलत: शैक्षणिक संस्था करिता विशेष सवलत.

तुमच्या शाळेच्या विभागासाठी आवश्यक असणाऱ्या क्रीडा साहित्याची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणी करणारे पत्र लिहा.

दिनांक ०६/०३/२०२१,

प्रति,

अर्जुन स्पोर्ट्स,

अशोक नगर,

जळगाव.

विषय: शाळेच्या क्रीडा विभागासाठी क्रीडा साहित्याची मागणी करणेबाबत.

मा. महोदय,

स.न.वि.वि.

मी अनंत जोशी, वसुंधरा विद्यालय जळगाव, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र पाठवत आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या शाळेतील क्रीडा विभागात आधुनिक क्रीडा साहित्याची भर घालत आहोत, त्याकरिता आम्ही आपणास शाळेच्या क्रीडा विभाग प्रमुख यांच्या संमतीने काही निवडक गरजेच्या क्रीडा साहित्याची मागणी करत आहोत. आशा करतो आपल्याकडे खाली दिलेल्या क्रीडा साहित्याच्या यादी मध्ये समाविष्ट असलेले सर्व क्रीडा साहित्य उपलब्ध असेल व आपण तातडीने सर्व शाळेच्या पत्त्यावर पाठवाल. आपण त्वरित साहित्याची एकूण देयक रक्कम व बँक खाते नंबर शाळेच्या ईमेल आयडीवर पाठवावा म्हणजे देयक रक्कम पाठवण्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात येईल.

क्रीडा साहित्याची यादी

हॉकी स्टिक ०४ नग

बास्केट बॉल ०४ नग

फुट बॉल ०४ नग

कळावे,

आपला विश्वासू

अनंत जोशी

क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लेखन Krida Sahitya Magni Patra In Marathi

पत्र नमूना: २

प्रश्न: अनिकेत स्पोर्ट्स,  जयंत नगर, लातूर. येथे सर्व प्रकारचे आवश्यक क्रीडा साहित्य मिळेल. सवलत: शाळेकरिता खास सूट.

तुमच्या शाळेच्या क्रीडा विभागासाठी आवश्यक क्रीडा साहित्याची क्रीडा प्रमुख नात्याने मागणी करणारे पत्र लिहा

दिनांक ०७/०४/२०२१,

प्रति,

अनिकेत स्पोर्ट्स,

जयंत नगर,

लातूर ४०.

विषय: क्रीडा साहित्याची मागणी करणेबाबत.

मा. महोदय,स.न.वि.वि.मी संकेत कुंभार  क्रीडा विभाग प्रमुख, अर्थव विद्यालय लातूर, आपणास पत्र पाठवत आहे. आमच्या शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिम्मीत विविध खेळांचे आयोजन केले आहे, त्याकरिता आम्हास काही क्रीडा साहित्याची आवश्यकता आहे तरी आपण खाली दिलेल्या यादीप्रमाणे क्रीडा साहित्य शाळेच्या पत्यावर पाठवावे. साहित्याची एकूण देयक रक्कम व बँक खाते नंबर इत्यादि माहिती शाळेच्या ईमेल वर पाठवावी.

क्रीडा साहित्याची यादी:

क्रिकेट स्टिक: ०६ नग

क्रिकेट बॉल: ०६ नग

स्पोर्ट शूज: ०६ नग

कळावे,

आपला विश्वासू

संकेत कुंभार

Leave a Comment