अभिनंदन पत्र लेखन मराठी Abhinandan Patra Lekhan In Marathi

अभिनंदन पत्र लेखन मराठी Congratulation Letter in the Marathi

अभिनंदन पत्र लेखन हे अनौपचारिक पत्र लेखना मध्ये येते. अभिनंदन करणारे पत्र लेखन लिहणे हे अगदी सोपे असते, अशा प्रकारचे पत्रलेखन आपण आपल्या भाषेमध्ये लिहू शकतो. अभिनंदन करणारे पत्र लेखन यामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव अभिनंदन करणारे पत्र लेखन लिहा असा प्रश्न विचारला जातो, अशा प्रकारच्या पत्र लेखनामध्ये पत्र नमुना एकच असतो, बदलते ती फक्त वाक्यरचना.

उदाहरणार्थ:

तुमच्या मित्राचा/मैत्रिणीचा चित्रकला/वकृत्व/निबंध लेखन/ क्रीडा स्पर्धेत आंतरशालेय/राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आला, त्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.

अशा प्रकारचे अभिनंदन करणारे पत्र लिहा असा प्रश्न विचारला जातो. इयत्ता दहावी व इयत्ता नववीच्या मराठी विषयाच्या पेपर मध्ये व्याकरण विभागामध्ये अभिनंदन करणारे पत्र लिहा हा प्रश्न हमखास विचारला जातो.

. तुमच्या मित्राचा राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

दिनांक २१/०३/२०२१

प्रति,

राहुल म्हात्रे,

सरस्वती विद्यालय,

मोती नगर,

पुणे.

प्रिय राहुल,

स. नमस्कार,

राहुल तुझे मनापासून अभिनंदन आज वर्तमानपत्रामध्ये तुझा फोटो पाहिला आणि मन आनंदित झाले. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तू राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुला मिळालेले हे यश खरच खूप कौतुकास्पद आहे. तुझ्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे. तुझ्या यशाची बातमी मी माझ्या आई बाबांना दिली आहे, त्यांनी ही तुझं खूप कौतुक केलं आहे आणि तुला त्यांनी भावी यशासाठी अनेक आशीर्वाद दिले आहेत, अशीच तुझ्या शालेय जीवनात उत्तम कामगिरी करत जा. तुझ्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा.

कळावे,

तुझा मित्र

सचिन

अभिनंदन पत्र लेखन मराठी Abhinandan Patra Lekhan In Marathi

२. आंतरशालेय निबंध स्पर्धेत तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा प्रथम क्रमांक आला आहे मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

दिनांक २१/०३/२०२१

प्रति,

तुषार साळवे,

रुद्र विद्यालय,

मोती नगर,

सातारा ४४८७६

[email protected]

प्रिय तुषार,

स. नमस्कार,

आज सकाळी “सकाळ” वर्तमानपत्रामध्ये तुझा आंतरशालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याची बातमी वाचली. मित्रा तुझे खूप अभिनंदन! तुझे अक्षर खूप छान आहे. तुझ्या अहवांतर वाचनाचे ते यश आहे. तुझी राहणी खूप साधी आहे मित्रा पण तुझे विचार खूप मोठे आहेत, त्यामुळेच तर तू सहजपणे कोणत्याही लेखन स्पर्धेत प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांक मिळवतोस.

कळावे

तुझा मित्र

सागर

३. तुमच्या मित्राचा राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

दिनांक २१/०३/२०२१

प्रति,

केतन काटे,

हनुमान विद्यालय,

खादी रोड,

जळगाव ४४६७७९

[email protected]

प्रिय मित्र,

पहाटे “पुण्य नगरी” पेपर मध्ये तुझ्या यशाची बातमी वाचली आणि माझा आनंद द्विगुणित झाला. तू वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलास ऐकून आनंद झाला मित्रा. हार्दिक अभिनंदन मित्रा! असेच उत्तुंग यश मिळवत जा. तुझे शब्द, तुझी वाणी खूप प्रभावी आहे, हे मी अगदी सुरुवातीपासूनच जाणतो मित्रा त्यामुळेच तर हे सर्व तुला शक्य झाले आहे.

कळावे,

तुझा मित्र

अजिंक्य

अभिनंदन पत्र लेखन मराठी Abhinandan Patra Lekhan In Marathi

Leave a Comment