रोपांची मागणी करणारे पत्र Ropanchi Magni Karnare Patra In Marathi
औपचारिक पत्र लेखन यामध्ये मागणी करणारे पत्र लेखन हा एक पत्र लेखनाचा प्रकार येतो, त्यामध्ये शैक्षणिक संस्थान करिता/शाळेकरिता रोपांची/वृक्षांची मागणी करणारे पत्र लेखन, शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लेखन, शाळेच्या क्रीडा विभागात करिता क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लेखन, अशा विविध विषयांवर मागणी करणारे पत्र लिहा असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो.
या प्रश्नामध्ये शाळेचा प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहा किंवा पुस्तकांची मागणी करिता शाळेचा प्रतिनिधी ग्रंथपाल या नात्याने पत्र लिहा असा प्रश्न विचारला जातो. मागणी पत्र लिहिताना पत्रामध्ये प्रतिनिधीचे नाव, शाळेचे नाव व पत्ता यांचा उल्लेख करावा. मागणी पत्र हे कार्यालयीन व व्यवसायिक पत्र व्यवहारामध्ये मोडते.
प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीचा वापर पत्र लिहिताना करण्यात यावा. प्रश्नामध्ये दिलेला पत्ता प्रति च्या रकाण्यात लिहिण्यात यावा. कोणत्या नात्याने पत्र लिहा असे प्रश्नामध्ये नमूद केले आहे त्याचा उल्लेख पत्रामध्ये केलेला असावा.
पत्र नमूना १:
निसर्ग उद्यान ट्रस्ट, आर. के. रोड, सातारा ४० विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
दिनांक ६ फेब्रुवारी २०२१,
प्रति महाव्यवस्थापक,
निसर्ग उद्यान ट्रस्ट,
आर. के. रोड,
सातारा ४०.
विषय: शाळेसाठी रोपांची मागणी करणे बाबत.
महोदय,
मी वि. दा. माने शाळेचा प्रतिनिधी शाहू विद्यालय, नाशिक, आपणास वृक्षारोपणासाठी काही निवडक रोपांची मागणी करण्यासाठी पत्र पाठवत आहे. आज सकाळी “दैनिक” वर्तमानपत्रामध्ये आपल्या निसर्ग उद्यान ट्रस्टची जाहिरात वाचली, त्यामध्ये वृक्षारोपणासाठी मोफत रोपांचे वाटप हा मजकूर वाचला. आपण शैक्षणिक संस्थाकरिता देऊ केलेली ही मदत व आपले सामाजिक कार्य खूप कौतुकास्पद आहे. आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक यांच्या संमतीने आम्ही सर्व विद्यार्थ्यांनानी वृक्षरोपणाचे कार्य हाती घेतले आहे व आम्ही सर्वजण मिळून शाळेच्या मोकळ्या मैदानामध्ये वृक्ष लागवड करण्याचे योजले आहे, त्याकरिता आम्हास काही फूल झाडांची व फळझाडांच्या आवश्यकता आहे, आपण ती सर्व रोपे आम्हास पाठवावीत ही नम्र विनंती.
सोबत निवडक रोपांची यादी पाठवत आहे.
फूल व फळ झाडांची यादी:
नारळ, आंबा, चिंच, गुलमोहर, अशोक, सदाफुली, चाफा, गुलाब, व जास्वंद इत्यादि.
कळावे,
आपला विश्वासू
वि. दा. माने
Ropanchi Magni Karnare Patra In Marathi
पत्र नमूना २: जागतिक पर्यावरण दिनानिम्मीत संध्या रोपवाटिका यांच्यामार्फत मोफत रोपांचे वाटप विद्यार्थी प्रतिनिधि या नात्याने व्यवस्थापकास रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
दिनांक ६ फेब्रुवारी २०२१,
प्रति व्यवस्थापक,
संध्या रोपवाटिका,
गणेश रोड,
सोलापूर ३०.
विषय: शालेय वृक्षारोपण योजने करिता रोपांची मागणी करणे बाबत.
महोदय,
मी के. र. क्षीरसागर शाळेचा प्रतिनिधी समृद्धी विद्यालय, सोलापूर. आज सकाळी “पुढारी” वर्तमान पत्रामध्ये आपली जागतिक दिनानिम्मीत मोफत रोपांचे वाटप ही जाहिरात वाचली, त्यानिमित्ताने शाळेच्या मोकळ्या आवारात रोपांची लागवड करण्याकरिता रोपांची मागणी करीत आहोत.
रोपांची यादी:
लिंब, पिंपरण, पिंपळ, वड, जांभूळ, व नारळ इत्यादि.
कळावे,
आपला विश्वासू
के. र. क्षीरसागर