व्हायब्स शब्दाचा अर्थ व उपयोग Vibes Meaning in Marathi

Vibes Meaning in Marathi, Good vibes meaning in Marathi, Bad vibes meaning in Marathi.

मित्रांनो vibes हा इंग्रजी शब्द आपण बर्‍याच वेळा इंग्रजी बोलणार्‍या लोकांच्या संभाषणामध्ये ऐकतो, तसेच vibes हा इंग्रजी शब्द पुस्तकामध्ये, वाचनामध्ये पाहतो पण सहसा आपणास या शब्दाचा अर्थ लवकर समजत नाही.

Vibes या इंग्रजी शब्दाचा उपयोग भावनात्मक संकेत (emotional signal) स्पष्ट करण्यासाठी केला जातो. मग ते भावनात्मक संकेत (विचार) वाईट(negative) असू शकतात किंवा चांगले (Positive) असू शकतात.

व्याख्या(definition): एखाद्या ठिकाणाला, व्यक्तीला, आणि परिस्थितीला पाहिल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर गाणे ऐकल्यानंतर सरळ ती गोष्ट तुमच्या मनस्थिती वर परिणाम करते याला vibes असे म्हणतात.

Vibes या इंग्रजी शब्दाचा उच्चार वाइब्स असा होतो.

Vibes Meaning in Marathi

Good vibes meaning in Marathi:

Good vibes म्हणजे Positive feelings, सकारात्मक भावनात्मक संकेत, चांगले विचार.

उदाहरणार्थ:

1) We have good vibes about this new business.

आम्हाला या नवीन व्यवसायाबद्दल मनात चांगले विचार, भावना येऊ लागल्या आहेत, आम्ही नक्कीच या व्यवसायामध्ये चांगली प्रगति करू असा या वाक्याचा अर्थ होतो.

2) I love listening the prayer of god because it gives me good vibes.

मला देवाची प्रार्थना ऐकायला आवडते, कारण देवाची प्रार्थना ऐकल्यामुळे माझ्या मनात चांगले विचार (positive feelings)  येतात. मला एक सकारात्मक ऊर्जा मिळते.

3) I have good vibes about this beautiful scene.

मला ह्या सुंदर दृश्याकडे पाहून चांगले आनंदी वाटत आहे. मनात positive feelings येत आहेत.

4) I have good vibes about this deal.

ह्या व्यवहाराकडे पाहून माझ्या मनात चांगले विचार (positive feelings) येत आहेत. यातून आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू.

5)  I want to watch that movie because it has good vibes.

मला ती फिल्म पहायची आहे कारण मला ती फिल्म पाहिल्यानंतर एक चांगली प्रेरणा, उत्साह, आणि आनंद मिळतो. (मनात सकारात्मक विचार (positive feelings) येतात.)

6) Yes sir, I can sing this song because I have good vibes about this song.

होय सर, मी हे गीत गाऊ शकतो कारण माझ्या या गीताविषयी चांगल्या भावना आहेत.

7) I have good vibes about this project.

मला ह्या उपक्रमाबद्दल सकारात्मक वाटत आहे. या उपक्रमामधून नक्कीच काहीतरी उत्तम घडेल.

Bad vibes meaning in Marathi:

Bad vibes म्हणजे negative feelings, नकारात्मक भावनात्मक संकेत, वाईट विचार.

1) I didn’t like that person – he had bad vibes या वाक्याचा अर्थ मला तो व्यक्ति आवडला नाही मला त्या व्यक्ती बद्दल मनात वाईट भावनात्मक संकेत(विचार) येत होते.

2) जर तुम्ही एखादे गाणे गात असाल आणि कोणीतरी तुम्हाला म्हटले “Dig the vibe” तर याचा अर्थ असा होतो की त्याला तुमचे गाणे खूप आवडले, तुमचे गाणे खूप ऊर्जा देणारे उत्साह निर्माण करणारे आहे असा त्याचा अर्थ होतो.

3) I don’t want to visit that house because it has bad vibes.

मला त्या घरी जायचे नाही कारण मला त्या घरामुळे नकारात्मक विचार (negative feelings) येतात.

4) Sorry, sir but I have bad vibes about this work.

सर मला माफ करा, कारण मला हे काम पाहिल्यानंतर उत्साही वाटत नाही, चांगले वाटत नाही. या कामाबद्दल मनात (negative feelings) येत आहेत.

5) I have bad vibes about this man. या माणसाबद्दल माझ्या मनात नकारात्मक विचार आहेत.

6) I have bad vibes about this song. मला हे गाणे ऐकायला आवडत नाही.

7) I got bad vibes about this place. मला ह्या जागेकडे, ठिकाणाकडे आल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर चांगले वाटत नाही, bad feelings येतात.

8)  I don’t want to do that work because it has bad vibes.

मला ते काम करायचं नाही कारण मला त्या कामाविषयी चांगल वाटत नाही. (मनात नकारात्मक विचार (negative feelings) येतात.)

9) Sorry sir, I can’t sing this song because I have bad vibes about this song.

सर मला माफ करा, मी हे गीत नाही गाऊ शकत कारण माझ्या या गीताविषयी चांगल्या भावना नाहीत.

Vibes या शब्दाचे इंग्रजी समानार्थी शब्द:

Warning – सूचना

sign – चिन्ह

Feelings – भावना

clue – संकेत

Vibes या शब्दाचे इंग्रजी विरुद्धर्थी शब्द:

calm – शांत

peace – शांती

quietness – शांतता

If you find this post “Vibes Meaning in Marathi” helpful please share with your friends on social media.

Leave a Comment