डॉ बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi. Dr Babasaheb Ambedkar Yanchi Mahiti Marathi Madhe, Dr Babasaheb Ambedkar Yancha Vishe Mahiti Sanga, Dr Babasaheb Ambedkar Mahiti In Marathi. Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi.

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi

माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे, अन्यायग्रस्त असलेल्या समाजाला ताठ मानेने जगायला शिकवणारे, समाजातील अनेक वर्षे लोकशाहीपासून खऱ्या मानव अधिकारापासून वंचित असलेल्या समाजाला शिक्षित करणारे, त्यांना आपले मूलभूत हक्क मिळवून देणारे महामानव, भारतीय कायदेपंडित, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्यांचे आधारस्तंभ होते.

संपूर्ण नाव: डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर.

जन्म: 14 एप्रिल 1891

जन्मस्थान: महू, इंदोर, मध्यप्रदेश

वडिलांचे संपूर्ण नाव: रामजी मालोजी सकपाळ

आईचे नाव: भिमाबाई रामजी सकपाळ

पहिल्या पत्नीचे नाव संपूर्ण नाव: रमाबाई भिमराव आंबेडकर

दुसऱ्या पत्नीचे नाव: सविता भीमराव आंबेडकर

मृत्यू/महापरिनिर्वाण दिवस: 6 डिसेंबर 1956

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर समाज सुधारक होते. वर्षानुवर्षे उच्चवर्णीय समाजाकडून मिळणार्‍या हीन वागणुकीमुळे दलित समाज दुबळा अर्थहीन बनला होता. समाजातील माणसांमध्ये जातिभेद करणाऱ्या राक्षसी वृत्तीचा जन्म झाला होता. माणसाला माणूस म्हणून न वागवता त्याला पशूप्रमाणे वागणूक दिली जात होती. अगदी नैसर्गिक साधन संपत्ती बाळगणे नव्हे तर स्पर्श करायला सुद्धा अधिकार नव्हता. अमृताप्रमाणे मानले जाणारे पाणी पिण्यास सुद्धा अधिकार नव्हता.

दीनदुबळ्या मागासलेल्या वर्गावर अमानुष मारहाण केली जात होती. प्राण्यांना जेवढी किंमत होती तेवढी किंमत माणसाला दिली जात नव्हती. स्वतःला थोर समजणारे, देव समजणारे अगदी राक्षसासारखे वागत होते, आणि गोरगरिबांच्या मुखातील घास हिरावून घेत होते. अशातच एका तेजस्वी महापुरुषांचा जन्म झाला आणि लाखो करोडो जिवांचा उद्धार झाला.

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला आपले मूलभूत अधिकार मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. या जन्मी तरी त्यांचे उपकार फेडणे अशक्य आहे. आजचे वैभव, ऐश्वर्य, थाटमाट रोषणाई, गाडी बंगला, सोने-नाणे आम्हास पाहायला मिळत आहे ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच.

“क्रांतिवीर महापुरुष जन्मा आले धरतीवर, भिमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर!”

आज संपूर्ण जगभर भारत निर्माता, संविधान निर्माता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे. आज आपण पाहतो, बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित समाजाचे उद्धाराकरिता कार्य केले पण हा समज चुकीचा आहे मला अशा लोकांना सांगू वाटते की अशा लोकांचे ज्ञान कमी आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासलेल्या लोकांसाठी जरी कार्य केले असले तरी त्यांनी सोबत सर्व जाती-धर्मातील महिलांना नवा शिक्षणाचा मार्ग दाखवला. महिलांच्या, कामगारांच्या  उद्धारासाठी घटनेत अनेक तरतुदी निर्माण केल्या आणि भारताचे महान संविधान निर्माण केले. सर्वसामान्यांना आपले मूलभूत हक्क मिळवून दिले.

डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे जनक असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेबांचे महान कार्य लक्षात घेता भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. आज देशातच नव्हे तर परदेशातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असंख्य पुतळे आपणास पहायला मिळतात. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेबांची ओळख आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार:

आयुष्य मोठे असण्यापेक्षा ते महान असायला हवे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यानंतर कोणताही मनुष्य डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही.

मी अशा धर्माला मानतो जो धर्म स्वातंत्र्य, समानता, आणि बंधुभाव जोपासण्याचे कार्य करतो.

सर्वात अगोदर आणि सर्वात शेवटी आपण भारतीय आहोत.

मी कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवर ठरवतो.

बुद्धीचा विकास हे मानवाचे अंतिम लक्ष असायला हवे.

जोपर्यंत तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत कायद्याने तुम्हाला दिलेले स्वातंत्र्य काही कामाचे नाही.

Dr Babasaheb Ambedkar Books in Marathi/डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके:

१) शूद्र पूर्वी कोण होते

२) पाली शब्दकोश

३) राज्य आणि अल्पसंख्यांक

४) जातिभेद निर्मूलन

५) माझी आत्मकथा

६) रानडे गांधी आणि जीना

७) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

८) रुपयाची समस्या त्याचे मूळ व त्यावरील उपाय

९) अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले

१०) डॉक्टर आंबेडकर 22 प्रतिज्ञा

११) दलितांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा पुणे करार संपूर्ण इतिहास

१२) भाषावर प्रांतरचना

Dr Babasaheb Ambedkar Mahiti In Marathi

महाड चवदार तळे सत्याग्रह: 20 मार्च, 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी आपल्या हातामध्ये घेऊन चाखलं आणि असंख्य अस्पृश्य बांधवांना चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी खुलं केलं. चवदार तळ्याचे पाणी हातामध्ये घेण्याअगोदर बाबासाहेब म्हणाले होते हे पाणी पिऊन आम्ही अमर होणार नाही पण हे पाणी पिल्यानंतर आम्ही पण माणसे आहोत हे सिद्ध होणार आहे.

बाबासाहेबांनी महाड सत्याग्रह करून जातीभेद करणाऱ्या लोकांच्या विरोधात आपल पहिल पाऊल टाकलं आणि अन्यायी वृत्तीच्या लोकांच्या विरोधात आवाज उठविला. चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा अधिकार ईसाई, मुसलमान, पारशी या लोकांना होता परंतु हा अधिकार दलित समाजाला नव्हता तो अधिकार महाड सत्याग्रह करून बाबासाहेबांनी मिळवून दिला.

काळाराम मंदिर प्रवेश/सत्याग्रह:

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी केलेल्या सत्याग्रहपैकी काळाराम मंदिर सत्याग्रह हा एक लढा होता. 2 मार्च 1930 रोजी महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला.

दलितांच्या मूलभूत हक्कासाठी न्यायासाठी केलेला हा प्रखर लढा होता. नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश बाबासाहेबांनी जातीभेद करणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या मानवी मनाला केलेले आव्हान होते. बाबासाहेबांना माहीत होते केवळ काळाराम मंदिर प्रवेश करून आपले प्रश्न सुटणार नाहीत पण काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह जातीव्यवस्था मानणार्‍या आणि जाती व्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना केलेले एक आव्हान होते.

संविधान: कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील संविधानावर अवलंबून असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे. शोषित पीडित लोकांना, महिलांना, बालकांना, कामगारांना आपले अधिकार व न्याय देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या रुपाने केले आहे.

26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान संपूर्ण लिहून झाले. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आणि भारत एक गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. हा दिवस संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतभर साजरी करण्यात येऊ लागला. संविधान पूर्णपणे लिहून तयार होण्यास 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले.

शिक्षण:

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण दापोली आणि सातारा या ठिकाणी झाले.

1907 साली बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाले त्यानंतर एलफिस्टन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी मिळवली. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली.

1896 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे निधन झाले. 1913 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील आजारपणामुळे निधन पावले.

समाजाच्या उद्धारासाठी रात्रंदिवस संघर्ष करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी, आपल्या संसारासाठी बाबासाहेबांच्या पत्नीने माता रमाईने आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं आणि 1935 रोजी या जगाचा निरोप घेतला. 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी येवले या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. 21 धर्माचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी बौद्ध धर्माची निवड केली आणि 1956 रोजी नागपूर येथे लाखो दलितांना सोबत घेऊन हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश केला.

डॉक्टर बाबासाहेबांनी शोषित वर्गाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मुंबई मध्ये सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. औरंगाबाद याठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. 1952 रोजी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी प्रदान केली.

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi. dr babasaheb ambedkar yanchi mahiti marathi madhe, dr babasaheb ambedkar yancha vishe mahiti sanga, dr babasaheb ambedkar mahiti in marathi. dr babasaheb ambedkar bhashan Marathi.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ

मध्यप्रदेशातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आई वडिलांचे नाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भिमाबाई सकपाळ तर वडिलांचे नाव रामजी सकपाळ असे होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव

रत्नागिरी जिल्ह्य़ातील आंबावडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे.

Leave a Comment