Tiger Information in Marathi, Essay on tiger in Marathi, maza avadta prani wagh nibandh.
वाघ हा जंगलाचा राजा आहे. वाघ अतिशय हिंस्र प्राणी आहे. जंगलातील प्रत्येक प्राणी वाघाला घाबरून राहतो. वाघ समोर दिसताच प्रत्येक प्राण्याचा थरकाप उडतो. सर्व प्राण्यात शिकारी मध्ये पटाईत प्राणी हा वाघ आहे. वाघ हा प्राणी मांसाहारी आहे.वाघाला दोन कान, चार पाय, आणि एक शेपूट आहे. वाघाचा रंग पिवळा आणि तपकिरी रंगाचे मिश्रण आहे आणि त्याच्या शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे आहेत. वाघाचे दात अतिशय टोकदार आहेत.
शिकार जवळ येताच तो आपल्या तीक्ष्ण दातांमध्ये शिकार मजबूतपणे पकडून ठेवतो. वाघ प्राणी अतिशय चपळ आहे तो जलद गतीने धावून शिकार पकडतो. वाघाला इंग्रजीत टाइगर असे म्हणतात. वाघ 50 ते 65 किलोमीटर प्रतितास वेगाने धावतो. वाघ नेपाळ, भारत, कोरिया, बांगलादेश विभागामध्ये आढळतो.
शिकार समोर दिसताच तो दबा धरुन बसतो आणि शिकार आपल्या पंज्याच्या अंतरावर येताच झडप घालून शिकार करतो.वाघ सध्या खूप दुर्मिळ होत चालला आहे. सध्या जंगलामध्ये वाघाची कत्तल होऊ लागली आहे आणि तस्करी मुळे वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.वाघ हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पशु आहे. वाघाच्या चामड्यापासून अनेक शोच्या वस्तू बनवल्या जातात.
आपल्या देशामध्ये तसेच परदेशांमध्ये वाघाच्या अनेक प्रजाती आढळतात.परदेशातील अनेक श्रीमंत लोक आवडीने वाघपाळतात.वाघ पाळने हा काही श्रीमंत लोकांचा छंद आहे. वाघाची तस्करी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे वाघ सध्या नाहीसे होऊ लागले आहेत. वाघ अतिशय शक्तिशाली ताकतवर प्राणी आहे.
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी तसेच पर्यावरणातील अन्नसाखळीवर नियंत्रण कायम ठेवण्यासाठी वाघ पर्यावरण पूरक प्राणी आहे. वाघ हा एक मांजर प्रजातीचाजीव आहे. वाघाची डरकाळी ही काळजाचा थरकाप उडवणारी आहे. कधीकधी वाघ माणसांवर सुद्धा हल्ला करतो. जंगलामध्ये फिरावयास गेलेल्या पर्यटकांवर सुद्धा वाघ हल्ले करतात.
Tiger Information in Marathi
वाघ जिभेने पाणी पिणारा प्राणी आहे, म्हणून तो मांसाहारी आहे. प्रत्येक वर्षी आपल्या भारत देशामध्ये वाघ बचाओ आंदोलन भरवले जाते. वाघ संरक्षण-संवर्धन करण्याविषयी कार्यक्रम राबवले जातात. वाघ वाचवणे त्यांची हानी थांबवणे ही काळाची गरज आहे. छान छान गोष्टी या पुस्तकांमध्ये, तसेच शालेय पुस्तकांमध्ये, काल्पनिक कथांमध्ये सुद्धा वाघाचे वर्णन केले गेले आहे.
पूर्वीचीकाळी राजा महाराजा वाघाची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जात असत. भारत देशातील अनेक प्राणी संग्रहालयामध्ये वाघ सध्या आढळतात. प्राणीसंग्रालय मध्ये वाघांचे संगोपन केले जाते त्यांना त्यांचे अन्न पाणी निवारा प्राणी संग्रहालयामध्ये दिला जातो. वाघ दिसण्यास रुबाबदार आहे. वाघाची चाल काळजाचा थरकाप उडवते आणि वाघाची डरकाळी अंगाला घाम फोडते.
एखादी शिकार हाती सापडताच वाघ शिकार जीव सोडेपर्यंत वाघ हातून सोडत नाही. वाघ मोठी जनावरे जसे हरिण, ससा, जंगली म्हैस, जंगली डुक्कर, काळविटांची शिकार करतो. वाघाचे वजन साधारणपणे 300 ते 350 किलो पर्यंत आढळते. वाघाची लांबी तेरा फुटापर्यंत आढळते.वाघ65 किलोमीटर प्रतितास गतीने धावतो.
वारंवार होणाऱ्या जंगल तोडीमुळे वाघांची संख्या कमी होऊ लागले आहे. जंगल तोडीमुळे वाघांची उपासमार होऊ लागली आहे. प्रत्येक वर्षी 29 जुलै रोजी विश्व वाघ दिवस म्हणून भारत देशामध्ये साजरी केला जातो, त्या दिवशी वाघ संरक्षणावर घोषणा दिल्या जातात आणि वाघ वाचवण्यासाठी नवीन धोरणे आखली जातात. वाघ जंगलामध्ये गुहेत राहतो. वाघ जंगलामध्ये एकटे राहणे पसंत करतो. वाघ पाण्यामध्ये माणसासारखा पोहू शकतो. वाघ आपल्या देशाची शान आहे. वाघ आपल्या देशासाठी शौर्याचे प्रतिक आहे.
सूचना: जर तुम्हाला हा “Tiger Information in Marathi” लेख माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेयर करा.