माझी आजी निबंध मनाला स्पर्श करणारा Majhi Aaji Nibandh in Marathi

Majhi Aaji Nibandh in Marathi, Essay on my grandmother in Marathi. शाळेतील मुलांना उतार्या्साठी तसेच परीक्षेसाठी अतिशय सुंदर निबंध माझी आजी मराठी मध्ये.

आई नंतरचे दुसरे रूप म्हणजे आपली आजी आहे. आजी म्हटलं की आपल्या हक्काचं कोणीतरी असतं अगदी मनातलं अगदी आपल्या हृदयातल कोणीतरी खास असत. आजी म्हणजे गोड आठवणींचा ठेवा आहे. आजी म्हणजे खर प्रेमाचं प्रतीक आहे.

माझ्या जवळ माझी आजी आहे म्हणून मी खूप भाग्यवान आहे, आजी आपल्या आयष्यात असण म्हणजे एक दुर्मिळ मौल्यवान हिरा आपल्या जवळ असल्यासारख आहे, कारण आता फार थोड्या लोकाकांकडे आजी उरली आहे, आणि ज्यांच्याकडे आजी आहे त्यांना तर आजीची खरी किमंत च अजून कळाली नाही.

आजी म्हणजे आपली खरी मैत्री आहे, जिच्याजवळ आपण आपल्या मनातलं गुपित बोलून दाखवतो, आजी म्हणजे एक सुखद प्रेमाचा झरा आहे, आजी  म्हणजे आपल्या लहानपणीची मैत्रीण आहे, आजी आपलं सर्व काही आहे. आई पेक्षा जास्त प्रेम करणारी, वडिलांपेक्षा जास्त काळजी घेणारी आपली दुसरी कोणी नसून माझी आजी आहे. खरच माझी आजी खूप ग्रेट आहे.

माझी आजी माझ्यासाठी छान छान गोष्टीचे पुस्तक आहे. माझी आजी ही खूप स्वभावाने चांगली आहे. ती माझा खूप लाड करते व माझ्यावर खूप प्रेम करते. माझी आजी मला लहानपणी दररोज शाळेत जात असताना काही पैसे नाहीतर गोड खाऊ देते.

आजी आपल्या घासतील घास खास आपल्यासाठी बाजूला काढून ठेवते. बाहेर गावी कुठे पाहुण्यांकडे फिरायला गेले कुठे, कुठे तिच्या लेकीकडे गेले तर माझ्यासाठी माझी आजी येताना गोड खाऊ घेऊन येते. संध्याकाळी वेळ मिळाल्यावर ती मला बाहेर फिरवयास घेऊन जाते.

Majhi Aaji Nibandh in Marathi

Majhi Aaji Nibandh in Marathi
Majhi Aaji Nibandh in Marathi, Essay on my grandmother in Marathi.

माझी आजी मला दररोज संध्याकाळी झोपताना काही गोष्टी व विरपूरषांच्या अनुभवलेल्या कथा सांगते ती माझी खूप काळजी घेते. माझी आजी खूप छान गाणी गाते. ती दररोज झोपताना अति सुंदर काव्य गाते. त्यातून मला ही काही गोष्टी शिकवते.

माझ्या आजीच्या हातांचा स्पर्श म्हणजे जणू औषधच आहे. जेव्हा ती माझ्या डोक्याला हात लावते तेव्हा माझी डोके दु:खी कुठल्या कुठे पळून जाते. माझ्या आजीच्या हातच्या जेवणाची चव खूप निराळी आहे, जेव्हा ती एखादा नवीन पदार्थ बनवते तेव्हा त्या पदार्थाला एक वेगळीच चव येते ती चव अगदी हॉटेल मधील पदार्थपेक्षा खूप छान असते.

माझी आजी मला आई समान आहे. रामायणातील, महाभारतातील, कथा माझी आजी मला ऐकवते. माझी आजी मी लहान असताना तिच्या हाताने घास भरवते. आई माझ्यावर ओरडल्यावर माझी आजी मला प्रेमाने जवळ घेते. माझी आजी मी लहान असताना मला रोज अंघोळ घालते. स्वच्छ धुतलेले कपडे घालून मला सुंदर बनवते. माझी आजी मला रोज शाळेत सोडण्यास नेण्यास येते.

रोज संध्याकाळी घराच्या अंगणात ती माझ्याशी गप्पा मारत बसते, शाळेतून घरी परत आल्यावर न चुकता माझा अभ्यास घेते. मी पुढे काय कराव काय करू नये हे सर्व निर्णय घेण्यास ती मला मदत करते.

Majhi Aaji Nibandh in Marathi
Majhi Aaji Nibandh in Marathi, Essay on my grandmother in Marathi.

माझ्यावरती आई सारखे प्रेम करणारी दुसरी व्यक्ति ती म्हणजे माझी आजी लहानापासून मोठे झाले तरी काळजी करते. माझ्या आजीचे वय झाले आहे तरी ती खूप काम करते. दिवसभर तिचे हात कामामध्ये व्यस्त असतात. माझी आजी शेतातली सर्व कामे करते. दिवसभर उन्हामध्ये पिके लावत असते आणि खतपाणी घालत असते.

सकाळी उठल्यावरती अंघोळ करून देवाची पुजा करते व नंतरच इतर कामांना हात लावते. तिला देवाची पुजा करण्याची खूप आवड आहे. माझी आजी खूप मेहनती आहे देवपूजा झाल्यावर ती स्वयंपाक करते. आम्हाला छान छान पदार्थ खाऊ घालते. माझी आजी माझ्यावरती खूप प्रेम करते. एक दिवस मी आजारी पडले होते तेव्हा माझ्या आजीने माझी खूप काळजी घेतली होती.

माझी आजी मला रोज देवाच्या ओव्या शिकवते. संध्याकाळी देवाला दिवा लावून शोल्क म्हणते, शुभम करोती शिकवते. दररोज रात्रीचे आम्हाला रामायण महाभारताचे पाठ सांगते. रात्री गोष्टी सांगताना मायेचा हात डोक्यावरुन फिरवते, त्यावेळी कधी झोप लागून जाते हे कळतं सुद्धा नाही.

माझी आजी मला चांगले मार्गदर्शन करते माझी आजी माझी चांगली मैत्रीण आहे, म्हणून सर्व काही माझ्या मनातले मी तिला सांगते आणि ती मला मदत करते. मी पण तिच्यावरती खूप प्रेम करते, आई नंतर तीच आहे जी माझ्यावर मनापासून प्रेम करते.

सूचना: जर तुम्हाला Majhi Aaji Nibandh in Marathi, Essay on my grandmother in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.

Leave a Comment