दिवाळी वर अगदी सुंदर निबंध विद्यार्थ्यांसाठी Essay on Diwali in Marathi

Essay on Diwali in Marathi, Diwali nibandh in Marathi, Majha avadta san Diwali, maza avadta san short essay in Marathi, 10 lines on Diwali in Marathi for class 3,4,5,6,7,8,9,

माझा आवडता सण दिवाळी आहे, मला सगळेच सण आवडतात पण दिवाळी हा सण मला खूप जास्त आवडतो. दिवाळी जवळ आली की खूप कामे असतात, पण त्यामध्ये वेगळीच मजा असते.

दिवाळीच्या सुट्टी दिवशी आई वेगवेगळे पदार्थ बनवते जसे की शंकरपाळी, चिवडा, चकली, लाडू, शेव, अनारसे अजून खूप काही, फराळ बनवताना मी आईला मदत करते. आईसोबत मी सर्व घर स्वच्छ करू लागते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन घरातील सगळे लक्ष्मीची पूजा करतात.

Essay on Diwali in Marathi
Essay on Diwali in Marathi

घरामध्ये फुलांनी पूर्ण घर सजविले जाते. वेगवेगळ्या रंगाची लाइटिंग केली जाते. दारोदारी पणत्या लावल्या जातात. घर खूप सुंदर दिसते घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते, मनमोहक दृश्य तयार होते.

सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे फटाके, वेगळे वेगळे फटाके घेतले जातात जसे की पाऊस, लवंगी फटाके, चिमणी बॉक्स, लक्ष्मी बॉम्ब लहान मुले खूप फटाके वाजवतात, त्यांना खूप आनंद होतो सारखे एकटे तिकडे पळतात. त्यांना गावाकडून पाहुणे येतात खूप मजा येते दिवाळी मध्ये सगळ्यांना नवीन कपडे घेतले जातात.

Essay on Diwali in Marathi
Essay on Diwali in Marathi

दिवाळी हा सण खूप आनंद देणारा आहे दिवाळी दिवशी बाहेर गावी गेलेले सर्व नातेवाईक घरातील सर्व मंडळी एकत्र येतात. दिवाळी दिवशी सर्व आनंदाने बागडत असतात दिवाळी सण नात्यांमधील प्रेम वाढवणारा सण आहे. गोड फराळ, गोड बोलणं, गोड मैत्री, आणि आपल्या लोकांच्या प्रेमाचा संगम आहे.

Essay on Diwali in Marathi

दिवाळी जवळ येताच लोकांच्या आनंदाला हर्षाला सीमा राहत नाही, नवी दोन चाकी, नवी चार चाकी गाडी, ट्रॅक्टर शेती विषयक अवजारे नवीन जमीन खरेदी, दुकानाचे उद्घाटन, भूमिपूजन ही सर्व शुभकार्ये दिवाळी दिवशी आटोपली जातात, कारण वर्षातून एकदा येणारा दिवाळीचा सण हा जणू एक शुभमुहूर्त असतो.

सोनेखरेदी घरातीलएखादी महत्वपूर्ण काम हाती घेणे ही सर्व कामे सुद्धा दिवाळी दिवशीच पार पाडली जातात. बाजारामध्ये लोकांची खरेदी करण्यास गर्दी होऊ लागते, फटाके खरेदी करणे, नवीन कपडे खरेदी करणे, संसार उपयोगी नवीन साहित्य खरेदी करणे, घराला तोरण खरेदी करणे, फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन इत्यादी सर्व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी सुद्धा दिवाळी दिवशी केली जाते.

तसे पाहिले तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत पण सर्वात जास्त महत्त्व दिवाळी या सणालाच दिले जाते, जितका आनंद दिवाळी या सणाला होतो तितका आनंद दुसऱ्या कोणत्याच सणाला होत नाही. घरामध्ये जर कोणी लहान असतील तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. कारण घरातील मोठी व्यक्ती भाऊ वडील मम्मी ताई या त्यांच्यासाठी त्यांना कपडे भेटवस्तू फटाके विकत घेणार असतात.

दिवाळीचा आनंद जवळजवळ आठवडाभर उतरत नाही आणि दिवाळी दिवशी बनवलेला फराळ तर महिनाभर संपत नाही, इतके गोड तिखट पदार्थ दिवाळीला बनवले जातात म्हणून दिवाळी हा सण आम्हा घरातील सर्व लहानथोरांना सर्वात जास्त आवडतो.

घरातले सगळे आनंदित असतात नवीन गोष्टी विकत घेतल्या जातात. शोपीस लावले जातात, घरामध्ये दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा सगळे सोबत असतात गप्पागोष्टी रंगलेले असतात लहान मुलांचे खेळणे चालु असते फटाके वाजवत असतात मला खूप भारी वाटत असते नंतर तिसरा दिवस म्हणजे भाऊबीज या दिवशी भावाला उटणे लावून अंघोळ घातली जाते नंतर ओवाळले जाते.

Essay on Diwali in Marathi
Essay on Diwali in Marathi

भावाकडून गिफ्ट भेटते म्हणून खूप आनंद होतो. आई मामाकडे घेऊन जाते भाऊबीजेला आनंद आनंदी वाटत असते. सगळ्यांच्या घरोघरी पदार्थ खायला भेटतात, जणूकाही मेजवानी असल्यासारखे वाटते, अशा प्रकारे दिवाळी हा सण खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आपल्या भारत देशामध्ये दिवाळी हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो. नातेवाईक व शेजारी लोकांना फराळाला बोलवले जाते, त्यामुळे मला दिवाळी सण खूप आवडतो.

Note: मित्रांनो जर तुम्हाला “Essay on Diwali in Marathi” हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.

Leave a Comment