Topics
Maze Gaon Nibandh In Marathi / माझे गाव या विषयावर निबंध मराठी मध्ये.
माझ्या गावामध्ये गावच्या मध्यभागी महादेवाचे मंदिर आहे माझ गाव डोंगरदऱ्यांनी सजला आहे. माझ्या गावाच्या चारी बाजूंनी वृक्ष आहेत. ती झाडे दिसावयास खूप मोहक आहेत. माझ्या गावाच्या शेजारी अनेक छोटी-मोठी गावे वसलेली आहेत. माझा गाव अतिशय सुंदर आहे. माझ्या गावामध्ये ग्रामपंचायती द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक मोठी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे.
गावचा विकास करण्यासाठी महिन्यातून एकदा माझ्या गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले जाते. माझे गाव अतिशय कष्टाळू आहे. माझ्या गावातील लोकांचा व्यवसाय प्रामुख्याने शेती आहे. आणि शेतीवर आधारित इतर जोड व्यवसाय सुद्धा केली जातात. जसे शेळी पालन, मेंढी पालन, दुग्ध व्यवसाय आणि इतर कुटिरोद्योग इत्यादी.
माझ्या गावामध्ये एकूण पाच देवांची मंदिरे आहेत. महादेवाचे मंदिर, गणपतीचे मंदिर, रामाचे मंदिर, मारुतीचे मंदिर, आणि वेताळाचे मंदिर इत्यादी. प्रत्येक मंदिरामध्ये एका पुजार्याची व्यवस्था केली गेली आहे. माझ्या गावामध्ये अनेक शिबिरे भरवली जातात. रक्तदान शिबिर, अन्नदान, आणि श्रमदान इत्यादी. माझ्या गावामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. गावच्या सार्वजनिक विकासकामांमध्ये तरुणांचा सहभाग सर्वात जास्त असतो.
रोज संध्याकाळी गावातील प्रत्येक मंदिरात भजन गायले जाते. गावातील सर्व मंडळी वर्षातील सर्व सण मोठ्या आनंदाने साजरी करतात. माझ्या गावांमध्ये मुलांसाठी खूप मोठी शाळा आहे. गावामध्ये प्राथमिक शाळा तसेच हायस्कूल पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यावेळी लहानपणी गावाकडे सुट्टीला जायचो त्यावेळी सगळे एकत्र सोबत मज्जा करायचो. माझे गाव खूप स्वच्छ व सुंदर आहे गावाकडे मित्र-मैत्रिणी खूप चांगले आहेत खुप आठवण येते त्यांची अशीच प्रेम अन मैत्री आजकालच्या मैत्रीमध्ये दिसत नाही.
माझ्या गावच्या बाजूने एक मोठी नदी वाहते, त्या नदीच्या तीरावर आम्ही सर्व मासे पकडन्यासाठी जायचो. पाण्यामध्ये उड्या मारायचो. माझ्या गावांमध्ये खूप मोठी मंदिरे आहेत. त्या सर्व मंदिरामध्ये दररोज पहाटे सकाळी पाच वाजता काकड आरती असते. माझ्या आईला देवांचे खूप वेड आहे. आमच्या गावामध्ये दररोज सकाळी गावातील सर्व माणसे गणपतीच्या दर्शनाला जातात.
Essay on my village in Marathi
सकाळी सकाळीच मंदिरातील घंट्याचा नाद घुमू लागतो. गावांमध्ये खूप मोठी यात्रा भरते. खूप मज्जा येते, देवाचे लग्न असते, हळद असते खूप भारी वाटत असत त्यावेळी आम्ही सगळे देवाचे लग्न लावताना हळद लावतो एकमेकांना हळदीने भरवतो. इकडून तिकडे नुसती पळापळ चाललेली असते. देवाच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते मंदिरामध्ये लांबलांबून माणसे आलेले असतात.
गावामध्ये खूप मोठी यात्रा असते, यात्रेवेळी पाळणे खेळणी, खाऊ विकणारे हे सर्व जन येतात. मुलींसाठी सजण्यासाठी खूप मोठी दुकाने येतात. आम्ही मित्र मैत्रिणी सोबत त्यावेळी खूप मज्जा करतो. वेगवेगळे खेळ खेळत असतो, गावाकडे खूप मजा येते, खूप मोठी फॅमिली जमा होते. काका, काकू, मामा, मामी, आजी, आजोबा व आम्ही सर्व मुले मुली मिळून आनंदाने राहतो. गावाकडच्या माणसांमध्ये खूप आपुलकी व माणुसकी असते. आम्ही गावामध्ये रानात जातो. रानामध्ये गहु, आणि ज्वारी लावतो, भाजीपाला पिकवतो.
गावाकडची ती नागमोडी वळणे, नदीचा तीर, अवतीभवतीची झाडेझुडपे, मावळणारा सूर्य, खूप छान दिसायला मनमोहक दृश्य वाटत असते. गावाकडे प्रत्येक सोमवारी बाजार भरतो, मोठी जागा असते खूप लांब लांब पर्यंत शेतकरी लोक भाजी घेऊन विकायला बसतात तेव्हा आठवड्यातून एक दिवस खूप गर्दी असते. सगळे लोक महिला भाजी मंडईत येतात.
थोडे पुढे गेले की काकांच्या वडापावचा सुंदर असा वास येतो. बाजारला गेलो की वडापाव हा खाणारच, कारण दुकानातील काकांच्या हाताला चव निराळी आहे. ओली भेळ, भजी, खारी बटर घेऊन यायची आई. तिन्हीसांजेच्या वेळी दिवाबत्ती झाली की आजोबा गोष्टी सांगायचे. माझे गाव खूप मनमोहक आहे स्वच्छ सुंदर निसर्गमय गाव आहे.
सूचना: जर तुम्हाला Essay on my village in Marathi हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.