आवडता छंद वाचन उत्कृष्ट निबंध Maza Avadta Chand Vachan in Marathi

Maza Avadta Chand Vachan in Marathi, my hobby essay in Marathi Reading, खास शाळेतील उतार्‍यासाठी आणि परीक्षेसाठी उपयुक्त निबंध.

प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळे वैशिष्ट्ये असतात जसे की चित्रकला, भाषण, वाचन, नृत्य, आणि कलाकृती अशा बऱ्याच गोष्टी असतात पण मला वाचन ही कला खूप आवडते. वाचन हा माझा आवडता छंद आहे.

वाचन माणसाला कमी वेळेत आणि कमी वयातच खूप ज्ञानी बनवते. नियमित वाचन केल्याने बुद्धीमतेचा विकास झपाट्याने होतो. मानसिक बळ वाढते त्याचबरोबर ज्ञान वाढल्याने आत्मविश्वास सुद्धा वाढतो.

Maza Avadta Chand Vachan in Marathi
Maza Avadta Chand Vachan in Marathi

जर तुमचे वाचन अफाट असेल तर त्यातून मिळालेल्या ज्ञानातून तुम्ही तुमच्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक अडचणींवर अगदी सहजपणे उपाय शोधून त्यावर मात करू शकता. माझ्या बाबांना सुद्धा वाचनाची खूप आवड आहे.

ज्यावेळी बाबा वाचन करत असत त्यावेळी मी त्यांच्या शेजारी जाऊन बसत असे आणि बाबा काय वाचत आहेत हे पाहत असे आणि सोपे शब्द वाचण्याचा प्रयत्न करत असे आणि जे जोड शब्द वाचण्यास कठीण वाटतात असे शब्द मी माझ्या बाबांकडून वाचून घेत असे.

मला वाचनाची आवड आहे हे बाबांना समजताच बाबांनी मला माझ्या वाढदिवसादिवशी खूप छान छान पुस्तके भेट म्हणून दिली आणि तेव्हापासून माझ्या वाचन या छंदास खरा प्रारंभ झाला.  

प्रत्येक माणसामध्ये काही ना काही एक तरी गुण वैशिष्ट्य असते आपल्याला ते ओळखावे लागते असा एक तरी गुण असतोच त्याला आपण छंद असे म्हणतो. माझा छंद म्हणजे मला वाचन करायला खूप आवडते.

Maza Avadta Chand Vachan in Marathi

लहानपणापासून मला गोष्टींची पुस्तके वाचनाची आवड आहे आजीने पण मला खूप कथा सांगितल्या रामायण-महाभारत या महान ग्रंथातील, मी आतापर्यंत सगळे ग्रंथही वाचले आहेत आणि आजीला वाचून सांगितले आहेत. मी नियमितपणे रोज पाढे वाचते.

शाळेमध्ये शिकवण्याच्या आधीच माझे धडे वाचून झालेले असायचे, बर्‍याच वर्षापासून आमच्या घरामध्ये दररोज नियमितपणे पेपर येतो तो मी दररोज नियमितपणे पेपर वाचते. पेपर वाचण्याचा एक फायदा आहे तो म्हणजे आपल्याला जगात काय चालले आहे ते समजते.

Maza Avadta Chand Vachan in Marathi
Maza Avadta Chand Vachan in Marathi

पूर्ण जगात काय काय चालू आहे हे सर्व मला पेपरमधून कळते, जसे मोठे होत गेले तसे मी ग्रंथालय मधील पुस्तके घेऊन वाचन करू लागले आहे. मी आतापर्यंत इतिहास, भूगोल, विज्ञान, कथा, कादंबर्‍या, काल्पनिक कथा, सत्य घटनेवर आधारित कथा, फिल्म स्टोरीज, बोधकथा, छान छान गोष्टी, परींच्या गोष्टी, तेनाली रामाच्या कथा, बिरबलाच्या कथा, महाभारतातील आणि रामायनातील अशा अनेक कथा वाचल्या आहेत.

त्याचबरोबर अनेक महापुरुषांचा इतिहास वाचला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आहे तसेच अग्निपंख, ययाती,  अशा अनेक इतिहासावर आधारित कादंबर्‍या लेख, आणि कथा वाचल्या आहेत. तुम्ही जर पुढे जाऊन मोठे प्रशासकीय अधिकारी होणार असाल जसे आय.पी.एस., डी.वाय.एसपी., पी.एस.आय., इन्कम टॅक्स ऑफिसर होणार असाल तर तुमचे अहवांतर वाचणं असण खूप गरजेचं आहे.

वाचन हा छंद इतर छंदापेक्षा खूप चांगला, आणि ज्ञान देणारा छंद आहे इतर छंद सुद्धा तसे खूप चांगले आहेत पण हा छंद तुमच्या बुद्धीचा विकास लवकर करतो. इतर मैदानी खेळ तुमचा शारीरिक विकास लवकर करतात असे छंद जोपासल्याने तुमच्या शरीराची वाढ झपाट्याने होते. अहवांतर वाचनाने तुमचे असणारे अज्ञान दूर होते.

एखाद्या विषयावर जर तुम्हाला भरपुर ज्ञान असेल तर तुमची त्या क्षेत्रात कोणीच बरोबरी करू शकत नाही. उलट लोकांकडून तुम्हाला चांगला मानसन्मान मिळेल. आणि तुम्ही त्या क्षेत्रात एक हुशार व्यक्ति, एक विद्वान व्यक्ति म्हणून ओळखले जाल.

Maza Avadta Chand Vachan in Marathi
Maza Avadta Chand Vachan in Marathi

तसे पाहिले तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान असणे गरजेचं आहे. नाहीतर या जगातील लोक तुम्हाला फसवल्या शिवाय राहणार नाहीत, तुमचा गैरफायदा अशी माणसे नक्की घेतील कारण त्यांना माहीत असते की तुम्हाला या गोष्टीतील काहीच माहीत नाही, म्हणून जितके शक्य होईल तितके ज्ञान आणि माहिती आपण मिळविली पाहिजे.

प्रत्येक माणसाचे छंद वेगवेगळे असतात. आणि आयुष्यात एक तरी छंद असणं किंवा एखाद्या गोष्टीची आवड असण अत्यंत गरजेचं आहे. छंद आयुष्यातील खरी मज्जा दाखवून देतात. एक चांगला छंद माणसाला जगायला शिकवतो.

छंद दोन प्रकारचे आहेत एक आउटडोअर (गेम्स) छंद आणि दूसरा इनडोअर (गेम्स) छंद आउटडोअर (गेम्स) छंदा मध्ये जसे मैदानावर खेळ खेळणे, क्रिकेट, फूटबॉल, हॉली बॉल, कबड्डी, खो-खो, इत्यादि आणि आउटडोअर (गेम्स) छंदामध्ये कॅरम, बुद्धिबळ, लुडो, वाचन, सापशिडी, स्टॅम्प पेपर साठवणे, पैसे सठवणे, जुनी नाणे साठवणे इत्यादी.

Note: जर तुम्हाला “Maza Avadta Chand Vachan in Marathi” ” My Hobby Essay In Marathi Reading हा निबंध हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेयर करा.

Leave a Comment