Mazi Shala Marathi Nibandh, Essay on my school in Marathi. माझी शाळा वर माहितीपूर्ण निबंध अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये, परीक्षेत उत्तम गुण मिळवून देणारा निबंध.
माझी शाळा फार सुंदर आहे. माझ्या शाळेची इमारत खूप मोठी आहे. माझ्या शाळेची इमारत दोन मजली आहे. माझ्या शाळेत एकूण दहा खोल्या आहेत. माझ्या शाळेच्या बाजूला छोटसं ऑफिस आहे तिथे शाळेचे मुख्याध्यापक बसतात. माझ्या शाळेत एकूण 4 शिपाई आहेत.
माझ्या शाळेत इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. माझ्या शाळेत 2 क्लर्क आहेत. माझ्या शाळेसमोर एक सुंदर रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ मोठी हिरवीगार झाडे आहेत. माझ्या शाळेसमोर एक सुंदर बाग आहे. त्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगबेरंगी फुले आहेत.
माझ्या शाळेच्या पाठीमागे एक खूप मोठे खेळाचे मैदान आहे आम्ही सर्व मुले शाळेच्या त्या सुंदर मैदानावर वेगवेगळे खेळ खेळत असतो, जसे कबड्डी, खो खो, क्रिकेट, लांब उडी, उंच उडी, धावण्याच्या शर्यती इत्यादि, माझ्या शाळेतील सर्व शिक्षक स्वभावाने प्रेमळ आहेत.
माझ्या शाळेतील सर्व शिक्षक सर्व विषय समजेपर्यंत शिकवून सांगतात आणि व्यवहारातील उदाहरणे देऊन प्रत्येक वाक्य धडा पटवून देतात. माझी शाळा रोज सकाळी 11 वाजता भरते आणि संध्याकाळी 5:30 वाजता सुटते. माझ्या शाळेत दुपारी जेवणासाठी ब्रेक दिला जातो आणि संध्याकाळी 4 वाजता मैदानी खेळ खेळण्यासाठी ब्रेक दिला जातो.
माझ्या शाळेला खूप मोठ्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांतून स्वच्छ सुंदर हवा येते. माझ्या शाळेतील प्रत्येक क्लास मध्ये एक खूप मोठा काळ्या रंगाचा फळा बसवला आहे तसेच मुलांना बसण्यासाठी खुर्च्या, बेंचेस, आहेत. माझ्या शाळेच्या समोर झेंडावंदन, प्रजासत्ताक दिन, साजरा करण्यासाठी एक उंच खांब रोवण्यात आला आहे.
माझ्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, न्यायमूर्ती रानडे, पू.ल. देशपांडे, राजाराम मोहन रॉय, सुभाषचंद्र बोस, जगदीशचंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील, अशा अनेक थोर नेत्यांची जयंती साजरी केली जाते. प्रत्येक सणादिवशी, माझ्या शाळेला सुट्टी दिली जाते.
Mazi Shala Marathi Nibandh
सहा महिन्यातून एकदा शाळेची सहल बाहेरगावी निसर्ग रम्य ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणी तसेच धार्मिक ठिकाणी जाते. माझ्या शाळेला प्रत्येक वर्षी नवीन रंग दिला जातो, माझी शाळा दिसायला खूप सुंदर आहे. माझ्या शाळेतील व्हरांड्यात प्रत्येक वर्गाच्या खोल्या समोर एक सुंदर फलक लावण्यात आला आहे. त्या फलकावर सुंदर सुविचार दररोज लिहले जातात. त्यामुळे शाळेच्या व्हरांड्यात येताच आम्हाला ते सुविचार वाचल्यानंतर एक नवी प्रेरणा मिळते.
माझी शाळा माझ्यासाठी एक मंदिर आहे आणि त्या शाळेत रुपी मंदिरातील शिक्षक माझ्यासाठी देव आहेत. मित्रांनो आयुष्यात जर शाळा नसती तर आपलं संपूर्ण जीवन अंधारमय होऊन बसलं असतं, आपल्या जीवनात काहीच अर्थ उरला नसता. जर शाळा नसती आणि शिक्षण नसतं तर आपण इतरांचे गुलाम झालो असतो आपल्या शाळेचे आपल्या आयुष्यात खूप मोठे योगदान आहे.
शाळेने आणि शाळेतील शिक्षकांनी आपल्या आयुष्यात खूप मोठे उपकार केले आहेत आणि आपल्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत. ते आयुष्यभर न संपणारे आहेत एक चांगला माणूस म्हणून जगण्याचे सामर्थ्य एका शाळेने आपल्या जीवनामध्ये उतरवले आहेत.
माझी शाळा ही एक आदर्श शाळा आहे माझ्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात जसे कब्बडी, खो-खो, क्रिकेट, कॅरम इत्यादी माझ्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा भरले जातात. माझ्या शाळेत विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था आहे. माझ्या शाळेच्या समोर एक खूप मोठे खाऊचे दुकान आहे.
शाळेच्या मधल्या सुट्टीत आम्ही शाळेसमोरील खाऊच्या दुकानातून खाऊ विकत घेऊन खातो. माझ्या शाळेच्या समोर फेरीवाल्यांची खूप गर्दी असते. जसे आईस्क्रीम वाला, पाणीपुरीवाला, समोसे वाला इत्यादी माझ्या शाळेमध्ये मुलांना संगणक शिकण्यासाठी एक प्रशस्त डिजिटल रूम आहे.
माझ्या शाळेमध्ये मुलांना शारीरिक कसरती करण्यासाठी व्यायामाचे साहित्य आहे. माझ्या शाळेत रोज शाळेची साफसफाई केली जाते. माझ्या शाळेला वर्षातून एकदा रंग दिला जातो आणि शाळेच्या बाहेरील भिंती वर छान छान सुविचार लिहिले जातात, अशी माझी शाळा माझ्यासाठी ज्ञान मंदिर आहे.
सूचना: जर तुम्हाला “Mazi Shala Marathi Nibandh, Essay on my school in Marathi” हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.