पु ल देशपांडे यांची नाटकांची नावे Pu La Deshpande Natak List

पु ल देशपांडे यांची नाटकांची नावे: महाराष्ट्रातील लाडके व प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून पु ल देशपांडे यांची ओळख आहे. पु ल देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ मध्ये मुंबईतील गावदेवी या ठिकाणी झाला. पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे आहे. त्यांचे बालपण हे जोगेश्वरी येथे गेले. त्यांच्या वडिलांचे नाव त्र्यंबक देशपांडे व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. साहित्य क्षेत्रातील आदर्श व्यक्ति महणून ते जगभर प्रसिद्ध आहेत.

पु ल देशपांडे हे एक प्रसिद्ध लेखक, नाटककार, कथाकार, प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायक होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय कथा, पुस्तके, व नाटके लिहली जी मराठी साहित्यात अजरामर झाली. महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक असल्यामुळे ते महाराष्ट्रभर पु. ल. या आद्याक्षराने ओळखले जातात.

ही झाली पु ल देशपांडे यांची थोडक्यात ओळख तर खाली आपण पु ल देशपांडे यांची नाटकांची नावे (pu la deshpande natak list) पाहणार आहोत.

पु ल देशपांडे यांची नाटकांची नावे

पु ल देशपांडे यांची नाटकांची नावे
नाटकवर्षमूळ लेखक
नवे गोकुळ—–—————-
एक झुंज वाऱ्याशी१९९४—————-
तीन पैशाचा तमाशा१९७८बेर्टोल्ट ब्रेख्त
पहिला राजा/आधे अधुरे१९७६जगदीशचंद्र माथुर
पुढारी पाहिजे (एकांकिका)—–—————-
भाग्यवान१९५३—————-
राजा ईडिपस (राजा ओयादिपौस)१९७९सोफोक्लीझ
वटवट वटवट१९९९—————-
सुंदर मी होणार१९५८—————-
अंमलदार१९५२निकोलाय गोगोल
ती फुलराणी१९७४जॉर्ज बर्नार्ड शॉ) (मूळ नाटक – पिग्मॅलियन)
तुका म्हणे आता१९४८—————-
तुझे आहे तुजपाशी१९५७—————-

पु ल देशपांडे यांनी चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. त्यांच्या पुस्तकांची अनेक भाषेत भाषांतरे सुद्धा झाली. दूरदर्शनसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेणारे ते पहिले मुलाखतकार होते. सार्वजनिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल टपाल खात्याद्वारे त्यांच्या नावाचा स्टॅम्प काढण्यात आला.

परदेशात प्रवासा दरम्यान आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीशीर पद्धतीने आपल्या प्रवासवर्णामध्ये मांडलेले आहे. पूर्वरंग, अपूर्वाई, जावे त्यांच्या देशा व व्यंगचित्रे ही काही त्यांची प्रसिद्ध प्रवासवर्णने आहेत. त्यांची साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरी पाहता भारत सरकारने त्यांना १९६६ मध्ये पद्मश्री तर १९९० मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

Leave a Comment