{Best} प्लास्टिक बंदी निबंध मराठी Plastic Bandi in Marathi Essay

प्लास्टिक बंदी निबंध मराठी, प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी.

plastic che dushparinam in Marathi, plastic bandi in Marathi, plastic bandi in Marathi essay, plastic pradushan Marathi, plastic pollution essay in Marathi language, plastic bandi mahiti.

Plastic Bandi in Marathi Essay

प्लास्टिक हे नाव ऐकले तरी चीड निर्माण होऊ लागली आहे वजनाने हलके टिकाऊ आणि प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे हे प्लास्टिक आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहे. प्रत्येकाच्या घरात रस्त्यावर ऑफिसात कार्यालयात  शाळा याठिकाणी प्लास्टिकचा वापर सर्रासपणे होत आहे,

 पण ही झाली नाण्याची पहिली बाजू प्लास्टिकचे जेवढे फायदे आहेत त्याच्या लाख पटीने त्याचे तोटे आहेत. एका आकडेवारीनुसार पृथ्वीवरील सर्व जीवांचे वस्तुमान सुमारे 4  गिगाटन आहे परंतु पृथ्वीवरील आतापर्यंत साचलेल्या प्लास्टिकचे वजन अंदाजे 8 गिगाटन झाले आहे.

तसेच भारतात दररोज सुमारे 26 हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो आणि यातील बहुतांश कचरा प्लास्टिकमुळे होतो, जसे की पाण्याच्या बॉटल, स्ट्रॉ, हॅन्डबॅग, खाद्यपदार्थांची वेष्टणे इत्यादी आणि महत्त्वाचे म्हणजे हा कचरा जातो कुठे? उत्तर आहे कुठेच नाही कारण नैसर्गिकरित्या या पदार्थाचे विघटन होण्यासाठी हजारो वर्षे लागतात.

प्लास्टिक बंदी निबंध मराठी, प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी.

मग यासाठी पर्यायी उपाय शोधले जातात, जसे की एखाद्या मोकळ्या मैदानात या घाणीचे मोठाले डोंगर उभारायचे  किंवा हा कचरा समुद्रात फेकून द्यायचा. पावसाळ्याच्या दिवसात या प्लास्टिक मुळे नदी-नाले गटारी तुंबून बसतात आणि मग आपल्याला मुंबईमधील महापुरासारख्या घटनांना सामोरे जावे लागते.

अनेक गुरे वासरे हे रस्त्यावरील प्लास्टिक खाऊन मृत्युमुखी पडत आहेत. संपूर्ण जलसृष्टी या प्लास्टिक मुळे धोक्यात आली आहे. प्लास्टिक व त्यात असलेल्या विषारी रसायनांमुळे समुद्री जीव गुदमरून जात आहेत, आणि काही संशोधनामुळे हे पण सिद्ध झाले आहे की प्लास्टिकचे सुक्षम बारीक बारीक कण आपल्या पिण्याच्या पाण्यात व अन्न पदार्थात मिसळू लागले आहेत.

हे प्लास्टिकचे प्रदूषण रोखले नाही गेले तर मानवी जीवनातस खूप मोठा धोका आहे. आज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी ही काळाची गरज बनली आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे या सजीवसृष्टीचा त्रास होऊ लागला आहे.  

सरकारने पर्यावरण संरक्षण अधिनियम 1966 अन्वये 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली आहे, पण आज आपण पाहतो की कुठेही या नियमांचे पालन होताना दिसत नाही. यासाठी शासनाने प्लास्टिकच्या  वापरावर निर्बंध घातले पाहिजेत.

Plastic Bandi in Marathi Essay
प्लास्टिक बंदी निबंध मराठी, प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी, Plastic Bandi in Marathi Essay.

जनतेच्या मनात प्लास्टिकच्या हानीकारक वाईट परिणामांबद्दल जनजागृती निर्माण केली पाहिजे. जेणेकरून लोक प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न करतील, अनेक शास्त्रज्ञांचा प्लास्टिकचा पर्यायी शोध सुरू आहे, आणि काही जण त्यात यशस्वी पण झाले आहेत. काही जण प्लास्टिकच्या पुनर्वापरावर काम करत आहेत, जसे की टाकाऊ प्लास्टिक पासून घर बांधण्यासाठी विटा तयार करणे, टाकाऊ कचऱ्यापासून रस्ते तयार करणे इत्यादी.  

अशा प्रयत्नांना शासनाने पाठबळ दिले पाहिजे, त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, जेणेकरून त्यांचे मनोबल उंचावेल व ते अधिक जोमाने काम करतील. कापडी पिशव्या, प्लास्टीक पिशव्यासाठी खूप मोठा पर्याय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण टाळता येईल.

कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करील हा निसर्गाचा होणारा विनाश थांबवण्याची कुठेतरी आपली पण एक जबाबदारी आहे, त्यामुळे सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. शक्य तेवढे प्लास्टिक टाळावे आणि त्याचा योग्य तो पुनर्वापर करावा. यातून एक खूप मोठा बदल घडेल नाही तर तो दिवस लांब नसेल तेव्हा प्लास्टिक वापरण्यासाठी पृथ्वीवरती ही माणूस नसेल.  

चला तर मग एक निर्धार करूया, स्वच्छ भारताचा! प्लास्टिक मुक्त भारताचा!

सूचना: मित्रांनो “प्लास्टिक बंदी निबंध मराठी, प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी, Plastic Bandi in Marathi Essay” या पोस्टमध्ये दिलेली माहिती आपणास जनजागृतीच्या हेतूने योग्य वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

Leave a Comment