पोपट संपूर्ण माहिती व निबंध Parrot Information in Marathi

parrot information in Marathi, My favorite bird parrot essay in Marathi, caged parrot essay in Marathi, maza avadta pakshi popat nibandh. Popat chi mahiti.

पोपट हा पक्षी दिसायला अधिक सुंदर आहे, त्याचे शरीर त्याची लाल चोच माणसाला त्याच्याकडे पटकन आकर्षित करते पोपट हा रंगबिरंगी असल्यामुळे तो प्रत्येकाला आवडतो. पोपटाचे शरीर अतिशय सुंदर आहे. ऑस्ट्रेलियासारख्या आणि दक्षिण अमेरिका सारख्या देशात त्याच्या अनेक जाती आढळतात.

पोपटाचा रंग हा हिरवा आहे व त्याची चोच लाल रंगाची आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तो सर्वांना आवडतो. पोपट सुंदर असल्यामुळे तो पाळीव पक्षी म्हणून पाळला जाऊ लागला आहे, म्हणून तो काही पक्षी प्रेमिकांच्या घरामध्ये पिंजऱ्यामध्ये आढळतो. पोपट पक्षी झाडांच्या ढोलीत राहायला पसंत करतो.

Parrot Essay in Marathi
parrot information in Marathi. Popat chi mahiti.

उंच झुपकेदार जास्त पाने असलेल्या झाडावर त्याला रहायला आवडते. पोपटाचे मिठू मिठू बोलणे सर्वांना फार आवडते. पोपट अनेक प्रकारची गोड फळे खातो. पोपटाच्या आवडीचे फळ प्रामुख्याने कवठाचे फळ, आंबा, आणि पेरु हि आहेत. पोपट इतर पक्षांप्रमाणे दाने, बिया डाळिंब इत्यादी सुद्धा खातो. पोपट पक्षी साधारणपणे चाळीस वर्षापर्यंत जगतात.

पोपट हा पक्षी समूहाने राहतो आणि आकाशामध्ये समूहाने विहार करतो. लहान मुलांना ज्याप्रमाणे बोलायला शिकवले जाते त्याप्रमाणे पोपटाला सुद्धा घरामध्ये पाहुणे आल्यावर किंवा एखादा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला रामराम, नमस्ते असे शिष्टाचार सुद्धा शिकवले जातात. दारोदारी फिरणारे भविष्य सांगणारे लोक लोकांचे भविष्य सांगण्यासाठी पोपटाला पिंजऱ्या मध्ये अडकवुन फिरतात.

Parrot Essay in Marathi
parrot information in Marathi, My favorite bird parrot essay in Marathi. Popat chi mahiti.

लोकांचे भविष्य सांगण्यासाठी पोपटाचा उपयोग करतात. पोपट पक्षी जंगलाची शोभा वाढवणारा पक्षी आहे. पोपटाचा रंग हिरवा असल्यामुळे तो झाडांच्या झुपकेदार पानांमधून सहजासहजी दिसून येत नाही. जंगलामध्ये पोपटाला पकडण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. कारण तो घराची शोभा वाढवणारा पक्षी आहे. पोपट पक्षी घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे नमस्ते, राम राम म्हणून छान प्रकारे स्वागत करतो.

Parrot Information in Marathi/Popat chi mahiti.

20 व्या 21 व्या शतकामध्ये आपल्या भारत देशामध्ये पोपट पक्षी खूप दुर्मिळ होऊ लागला आहे. वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे अनेक जातीचे निरनिराळे पक्षी मरण पाऊ लागले आहेत. पक्षांना आकाशात विहार करण्यासाठी स्वच्छ सुंदर आकाश सुद्धा पूर्वीसारखे राहिलेले नाही. पोपटाचे मिठू मिठू बोलने सध्या पोपटाच्या जीवावर उठले आहे.

पोपट मिठू मिठू बोलतो म्हणून तो सर्वांना हवाहवासा वाटतो. मिठू मिठू बोलण्यामुळे तो लोकांना त्याच्याकडे पटकन आकर्षित करतो. लहान मुले शाळेमध्ये शिक्षकांनी आपल्या आवडत्या पक्षाचे चित्र काढायला सांगितल्यास, मुले पोपटाचे चित्र काढणे पसंत करतात व पोपटाला अतिशय छानपणे रंगवतात. पोपटाला पेरूची आणि आंब्याची फोड अतिशय आवडते. पोपट आपल्या वक्र टोकदार चोचीने तो सर्व फळ संपवतो.

पोपटाला नकला करायला खूप आवडतात. पोपट नकला अगदी हुबेहूब करतो. पोपट पक्षी बुद्धीने तल्लख आहे. पोपट हा सर्व पक्षांमध्ये अतिशय हुशार मानला जातो. पोपट हा आपल्या सर्वांचा चांगला मित्र आहे. आपण पोपटाला घरामध्ये पिंजऱ्यात बंदिस्त न ठेवता त्याला स्वतंत्रपणे आकाशात उडू दिले पाहिजे कारण ते त्याच आयुष्य आहे त्याला बंदिस्त करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.

सूचना: जर तुम्हाला parrot information in Marathi, My favorite bird parrot essay in Marathi/ Popat chi mahiti. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment