ससा संपूर्ण माहिती व निबंध Essay on Rabbit in Marathi

Essay on Rabbit in Marathi, Rabbit Information in Marathi, Majha avadta prani sasa nibandh.

ससा हा अतिशय गोंडस आणि सुंदर प्राणी आहे. ससा स्वभावाने भित्रा प्राणी आहे. सशाचे एकूण दोन प्रकार पडतात एक रानटी ससा आणि दूसरा पाळीव ससा. रानटी ससा हा रानामध्ये, जंगलामध्ये आढळतो. ससा हा सस्तन प्राणी आहे. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. ससा हा कोवळे लुसलुशीत गवत खातो.

सश्याचे खास वैष्टिये म्हणजे तो उड्या मारत वेगाने धावतो. ससा हा रंगाने पांढरा, काळा आणि तपकिरी रंगाचा असतो. सशाचे कान 4 इंच लांब तर त्याच्या जबड्यात एकूण 28 दात असतात. सश्याचे गाल मऊ व गुबगुबीत असतात. सश्याचे वजन साधारणपणे 3 ते 4 किलोपर्यंत असते.

Essay on Rabbit in Marathi

Essay on Rabbit in Marathi, Rabbit Information in Marathi

सश्याचे डोळे रंगाने लालसर असतात. दिवसातून ससा आठ ते दहा वेळा काहीशा अंतराने झोप घेतो. एकूण जगात सशाच्या एकूण 300 जाती आढळतात. बाहेरच्या देशामध्ये ससा हा मांस उत्पादन करण्यासाठी पाळला जातो. ससा हा प्रामुख्याने दहा वर्षे जगतो. मादी ससा एकावेळी 7 ते 8 पिल्लांना जन्म देते.  

ससा हा प्राणी भित्रा असल्यामुळे तो आपले प्राण वाचवण्यासाठी अतिशय वेगाने धावतो. ससा हा दाट झुडुपाच्या बुडक्यात राहतो. काही लोक ससा हा प्राणी आवडीने आपल्या घरामध्ये पाळतात. पांढर्‍या शुभ्र रंगाचा ससा शरीराने खूप आकर्षक आणि मोहक असतो. सशाचे शरीर मऊ असते. ससा अनेक प्रकारचे गवत, गाजर, मेथी, आणि कोवळी पाने हे सर्व अन्न खातो.

ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये पिकांच्या मध्यभागी कोवळे गवत खाण्यासाठी ससे येतात, आणि ही संधी पाहून शिकारी सश्यांची मोठ्या प्रमाणात शिकार करतात. ससा हा खूप संवेदनशील असतो, शिकारी जवळ आला आहे याची त्याला पटकन चाहूल लागते आणि तो काही क्षणातच तिथून वेगाने धावून दूर निघून जातो.

बोधकथा, काल्पनिक कथा, या सर्व लहान मुलांच्या गोष्टीमध्ये ससा हा हमखास असतोच. ससा गोष्टीमध्ये असल्याशिवाय गोष्ट सांगण्यात आणि गोष्ट ऐकण्यात मज्जाच येत नाही. लहान मुलांना ससा खूप आवडतो म्हणून तो ठराविक बालकथांमध्ये नक्की असतो. “ससा तो ससा कि कापूस जसा त्याने कासावाची पैज लाविली…..” हे बाल गीत तर लहान मुलांच्या ओठावर नेहमी असत.

Essay on Rabbit in Marathi

“ससा आणि कासावाची शर्यत” ही गोष्ट तर सार्‍या देशभर प्रसिद्ध आहे. लहान मुलांना त्यांची आजी आणि आजोबा “ससा आणि कासावाची शर्यत” ही गोष्ट नक्की सांगत असतात. रंगाने पांढरे शुभ्र ससे लोकांना पाळायला खूप आवडतात. ससा हा खूप भित्रा आणि नाजुक प्राणी आहे. तो अतिशय चपळ असल्यामुळे खूप वेगाने धावतो.

आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. असे म्हणतात कि ससा पाळण्याने घरामध्ये पैसा, सुख आणि समृद्धि येते आणि सर्व मानसिक त्रास नाहीसा होतो. सश्याच्या शरीराला स्पर्श केल्यावर एक कोमल, मखमली स्पर्शाचा अनुभव होतो इतके त्याचे शरीर मऊ आहे. ससा पाळण्यामागे प्रत्येकाचा वेगवेगळा हेतु आहे, कोणी ससा घरामध्ये शांतता यावी, समृद्धि यावी म्हणून ससा पाळतात तर कोणी ससा मांस उत्पादनासाठी पाळतात तर कोणी मनोरंजनासाठी ससे पाळतात.

सूचना: जर तुम्हाला Essay on Rabbit in Marathi, Rabbit Information in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा

Leave a Comment