एमबीए फूल फॉर्म व कोर्सची माहिती MBA Full Form In Marathi

Mba Full Form In Marathi, Mba Meaning In Marathi, Mba Course Information In Marathi.

MBA ही पदवी शैक्षणिक क्षेत्रात मानाची पदवी मानली जाते. MBA ची पदवी घेतलेल्या व्यक्तीला ओव्हर क्वालिफाईड समजले जाते. पदवी परीक्षा उत्तीर्ण होताच विद्यार्थ्यांना MBA पदवी घेण्याचे, MBA अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे वेध लागतात.

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर करण्यात येणारा एमबीए हा पूर्णवेळ दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे त्यामुळे एमबीए ग्रॅज्युएशन नंतर घेतली जाणारी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे.

MBA Full Form In Marathi
Mba Full Form In Marathi, Mba Meaning In Marathi.

एमबीएचा फूल फॉर्म: master of business administration असा आहे. (मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन) 

एमबीए अभ्यासक्रम:

हा अनेक क्षेत्रात उपलब्ध असतो. Banking, finance, foreign culture, marketing, human resources(HR) इत्यादी तुम्ही तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार/तुमच्या आवडीनुसार/कौशल्यानुसार कोणत्याही विषयामधून एमबीए करू शकता.

एमबीए हा कोर्स कोणी करावा:

काही लोकांचा समज आहे कि एमबीए हा कोर्स फक्त व्यवसायाशी निगडित असलेले लोकांनीच करायचा असतो किंवा पुढे जाऊन ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे अशा लोकांनी हा कोर्स करायचा असतो पण हे पूर्णतः चुकीचे आहे. एमबीए हा कोर्स कोणतीही पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले व्यक्ती करू शकते. ज्यांना एमबीए  हे व्यवसाय करण्याकरिता करायचे आहे किंवा ज्यांना एखाद्या कंपनीमध्ये मानाची नोकरी करायची आहे अशा व्यक्ती सुद्धा एमबीए करू शकतात.

ही पदवी तुम्हाला दोन्ही मार्गांनी मिळवता येते. पहिला मार्ग बारावी पूर्ण झाल्यावर तुम्ही बीबीए ला प्रवेश घेऊ शकता. बीबीए म्हणजे bachelor of business administration (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) बीबीए ही बारावीनंतर घेतली जाणारी बिझनेस क्षेत्रातील बॅचलर पदवी आहे. बीबीए पूर्ण होताच तुम्हाला पुढे एमबीएला प्रवेश घेता येतो. दुसरा मार्ग ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तुम्ही दोन वर्षाच्या एमबीए कोर्सला/अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता.

एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असणारी पात्रता:

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून/महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. शाखेची अट नाही. कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी परीक्षेमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहेत.

प्रवेश परीक्षा: प्रवेश घेण्यासाठी एमबीएची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

एमबीएची पूर्व परीक्षा Director of technical education Maharashtra (DTE Maha) द्वारा conduct केली जाते. प्रवेश परीक्षा ही एकूण २०० गुणांकरिता असते.

Mba Full Form In Marathi

पूर्व परीक्षा पॅटर्न:

१) Quantitative aptitude: ५० प्रश्न

२)Verbal Ability and Reasoning Comprehension: ५० प्रश्न

३) Logical Reasoning: ७५ प्रश्न

४) Abstract Visual Reasoning:   २५ प्रश्न

अभ्यासक्रम शुल्क(fees):

Fees एक लाख रुपये पासून दहा ते बारा लाख रुपयांपर्यंत असू शकते. Fees तुम्ही कोणते महाविद्यालय निवडत आहात यावर अवलंबून आहे. प्रत्येक कॉलेजची फी त्या कॉलेजच्या मॅनेजमेंट विभागने निर्धारित केलेली असते.

MBA Full Form In Marathi

नामांकित एमबीए इन्स्टिट्यूटची नावे:

१. IIM Ahmadabad (आयआयएम अहमदाबाद)

२. IIM Bangalore (आयआयएम बंगळुरू)

३. IIM Calcutta (आयआयएम कलकत्ता)

४. XLRI Xavier School of Management (एक्सएलआरआय झेविअर स्कूल ऑफ मॅनेजमेंट. जमशेदपूर)

५. Indian School of Business (ISB) (इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस (आयएसबी) हैदराबाद)

वेतन:

तुमचे वेतन हे तुमच्या कौशल्यावर तुमच्या निवडलेल्या विषयांमध्ये तुम्हाला किती सखोल ज्ञान आहे, तुमचा कामा संबंधित किती वर्षाचा अनुभव आहे व तुमचे कंपनीच्या प्रगतीमध्ये किती योगदान आहे, या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. जर तुमची निवड एखाद्या नामांकित कंपनीमध्ये झाली असेल तर तुम्हाला अशा मोठ्या कंपनीमध्ये चांगला पगार मिळू शकतो.

एमबीए केल्यानंतर नोकरी कशा प्रकारची  असते:

एमबीए करताना तुम्ही कोणता विषय निवडला होता यावर तुमची कंपनीतील भूमिका/काम ठरते. जसे

Human Resources(HR) (ह्यूमन रिसोर्सेस): एच.आर. या विभागामध्ये उमेदवाराला कर्मचाऱ्यांची भरती, कर्मचाऱ्यांचे वेतन, कर्मचारी कपात, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या, सवलती, व भत्ते या विषयांशी निगडित कामे पार पाडावी लागतात.

Banking: बँकेमध्ये जर तुम्हाला मानाचे पद हवे असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम असू शकतो. या क्षेत्रामध्ये बँकेच्या व्यवहाराशी निगडीत सर्व कामे पार पाडावी लागतात.

Finance: या विभागामध्ये नोकरीच्या  अनेक संधी उपलब्ध आहेत. आपणास कोणत्याही नामांकित कंपनीमध्ये फायनान्स विभागामध्ये चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळते व सोबत पगार सुद्धा चांगला मिळतो.

Marketing: या विभागामध्ये सुद्धा नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनीमध्ये एक Marketing Department नक्की असते. कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरिता या विभागाची निर्मिती करण्यात आलेली असते.

या विभागामध्ये आपणास मार्केटिंग मॅनेजर या पदावर काम करण्याची संधी मिळते. यामध्ये तुम्हाला कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासंबंधित महत्त्वाची कामे तुमच्या हाता खालच्या लोकांकडून करून घ्यावी लागतात.तुमचे संभाषण कौशल्य, प्रेझेंटेशन चांगले  असेल तर तुम्हाला हे क्षेत्र फायद्याचे ठरू शकते. तुम्ही या विभागामध्ये लवकर प्रगती करू शकता व आपले प्रमोशन सुद्धा करू शकता.

जर तुम्हाला “Mba Full Form In Marathi, Mba Meaning In Marathi” या पोस्टमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

Leave a Comment