{सर्व शंका दूर होतील} Mpsc Exam Information in Marathi

Mpsc Exam Information in Marathi. MPSC परीक्षा पदे, पात्रता, अभ्यासक्रम, निवड, व मुलाखत संपूर्ण माहिती मराठी मध्ये

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) भरली जाणारी पदे:

क्लास वन अधिकारी पदे:

उपजिल्हाधिकारी

पोलिस उपअधीक्षक

सहाय्यक आयुक्त विक्री कर

उपनिबंधक सहकारी संस्था

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग

गट विकास अधिकारी – अ

वित्त लेखा परिक्षण आणि खाते सेवा – गट अ

मुख्य अधिकारी नगर पालिका/नगर परिषद

तहसीलदार

क्लास टू अधिकारी:

गट विकास अधिकारी – ब

मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपरिषद – ब

मंत्रालय विभाग अधिकारी

उपनिबंधक सहकारी संस्था

भूमी अभिलेखांचे तालुका निरीक्षक

उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग

वित्त लेखा परिक्षण आणि खाते सेवा – गट ब

सहायक क्षेत्रीय परिवहन अधिकारी

नायब तहसीलदार

Mpsc Exam Information in Marathi
Mpsc Exam Information in Marathi

एम.पी.एस.सी. (MPSC) परीक्षा नमुना

MPSC परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत.

उमेदवाराला पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी एक टप्पा पूर्ण करावा लागतो तेव्हा तो पुढचा टप्पा पूर्ण करण्यास पात्र ठरतो.

१) पूर्व परीक्षा –    Prelims

२) मुख्य परीक्षा – Mains

३) मुलाखत – Interview

पूर्व परीक्षा ही एकूण 400 गुणांची असते. मुख्य परीक्षा ही एकूण 800 गुणांची असते. मुलाखत ही 100 गुणांची असते.

१) पूर्व परीक्षा –    Prelims

पूर्व परीक्षेच्या पेपरचे स्वरूप:

पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतात. पेपर १ व पेपर २.  

पेपर मध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातात. हा पेपर एकूण २०० गुणांकरिता विचारला जातो, म्हणजे एक प्रश्न हा २ गुणांकरिता असतो.

परीक्षेचे स्वरूप:  वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी म्हणजे objective असते.

पेपर २ मध्ये एकूण ८० प्रश्न विचारले जातात. हा पेपर एकूण २०० गुणांकरिता असतो म्हणजे एक प्रश्न २.५ (अडीज) गुणांकरिता असतो.

Mpsc Exam Information in Marathi

पूर्व परीक्षेबद्दल महत्त्वाच्या गोष्टी:

१) पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला निगेटिव्ह मार्किंगची पद्धत आहे. निगेटिव्ह मार्किंग पद्धत १/३ (वन थर्ड) अशी आहे, म्हणजे तुमचे तीन प्रश्न चुकल्यास एका बरोबर प्रश्नाचे गुण जातील.

२) पूर्वपरीक्षेत मिळवलेले गुण मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी गृहीत धरले जात नाहीत.

मुख्य परीक्षा:

मुख्य परीक्षेत सहा अनिवार्य पेपर असतात.  

मुख्य परीक्षा ही एकूण ८०० गुणांची असते. मुख्य परीक्षेमध्ये एकूण सहा पेपर असतात.

महत्वाचे: पेपर १, व २ हे भाषाविषयक पेपर आहेत तर बाकीचे पेपर ३,४,५, व ६ हे general studies(सामान्य अध्ययन) चे पेपर आहेत.

पेपर १ हा १०० गुणांचा असतो. हा पेपर पारंपारिक/वर्णनात्मक पद्धतीचा असतो. एकूण वेळ ३ तास

पेपर हा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी(MCQ) पद्धतीचा असतो. हा पेपर दोन सेक्शन मध्ये विभागला गेला आहे, त्यामध्ये एक सेक्शन मराठी माध्यम असलेला मराठीचा पेपर एकूण ५० गुणांकरिता विचारला जातो, तर दुसरा सेक्शन हा इंग्रजी माध्यम असलेला इंग्रजीचा पेपर एकूण ५० गुणांकरिता विचारला जातो, असे मराठी व इंग्रजी विभाग मिळून एकूण १०० गुणांचा हा पेपर होतो. एकूण वेळ १ तास

पेपर २ ला निगेटिव्ह मार्किंगची पद्धत(नकारात्मक गुणपद्धती) आहे. ही निगेटिव्ह मार्किंगची पद्धत १/४ (वन फोर्थ) अशी आहे, म्हणजे तुमचे चार प्रश्न चुकल्यास एका बरोबर प्रश्नाचे गुण जातील.

पेपर ३ हा एकूण १५० गुणांचा आहे. हा पेपर एकूण २ तासांचा असतो. या पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी(MCQ) असे आहे. या पेपरला १/३ (वन थर्ड) निगेटिव्ह मार्किंग पद्धत आहे. म्हणजे तुमचे तीन प्रश्न चुकल्यास एका बरोबर प्रश्नाचे गुण जातील.

पेपर ४ हा एकूण १५० गुणांचा पेपर आहे. हा पेपर एकूण २ तासांचा आहे. या पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी(MCQ) आहे. या पेपरला १/३ (वन थर्ड) निगेटिव्ह मार्किंग(नकारात्मक गुणपद्धती) पद्धत आहे. तुमचे तीन प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे गुण जातील.

पेपर ५ हा एकूण १५० गुणांचा पेपर आहे. हा पेपर एकूण २ तासांचा आहे. या पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी(MCQ) आहे. या पेपरला १/३ (वन थर्ड) निगेटिव्ह मार्किंग(नकारात्मक गुणपद्धती) पद्धत आहे. तुमचे तीन प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे गुण जातील.

पेपर ६ हा एकूण १५० गुणांचा पेपर आहे. हा पेपर एकूण २ तासांचा आहे. या पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी(MCQ) आहे. या पेपरला १/३ (वन थर्ड) निगेटिव्ह मार्किंग(नकारात्मक गुणपद्धती) पद्धत आहे. तुमचे तीन प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे गुण जातील.

Mpsc Exam Information in Marathi
Mpsc Exam Information in Marathi

मुलाखत: मुलाखत हा MPSC परीक्षेमधील शेवटचा व महत्त्वाचा टप्पा आहे. मुलाखत ही एकूण शंभर गुणांची असते. ज्यावेळी तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात तेव्हा तुमची मुलाखती करिता निवड केली जाते. मुलाखतीमध्ये मिळालेले गुण मुख्य परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांमध्ये अधिक  करून मेरिट लिस्ट (गुणवत्ता यादी) तयार केली जाते.

मुलाखत घेणाऱ्या पॅनल मध्ये एकूण तीन ते चार सदस्य असतात, त्यामध्ये एक चेअर पर्सन असतो तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सदस्य असतो. तसेच मुलाखत घेणाऱ्या तज्ञांमध्ये एक मनोविश्लेषक (psychoanalyst) एका कोपऱ्यामध्ये बसलेले असतात ते तुमचा आत्मविश्वास, तुम्ही किती खर बोलता, किती खोट बोलता हे सर्व ते तपासतात.

Mpsc Exam Information in Marathi

मुलाखतीमध्ये तुमच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न, तुमचे छंद, चालू घडामोडी संबंधित प्रश्न, तसेच देशातील किंवा राज्यातील एखाद्या चालू राजकीय, आर्थिक, व सामाजिक घटना/प्रसंग या विषयी तुमचे विचार, मतभेद काय आहेत हे जाणून घेतात, अशा वेळी आपल चालू घडामोडी विषयी असलेल ज्ञान महत्वाच ठरत.

जर तुम्हाला “Mpsc Exam Information in Marathi” या पोस्टमध्ये दिलेली MPSC विषयी माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेयर करा.

Leave a Comment