२०+ कोणी कोणाच नसतं स्टेट्स Koni Konach Nast Status in Marathi

Koni Konach Nast Status in Marathi. कोणी कोणाच नसतं स्टेट्स मराठी मध्ये.

कोणीच कोणाच नसतं, नात हे स्वार्थासाठी जपलेलं असतं आणि जे नातं स्वार्थासाठी जपलेल असतं ते एक दिवस नक्की सोडून जात.

हे मात्र अगदी खरं आहे नवीन नात असत त्यावेळी लोक बोलण्यासाठी कारण शोधत असतात. पण तेच नातं ज्यावेळी जुनं होतं त्यावेळी लोक दूर जाण्यासाठी कारण शोधत असतात.

काही नाती भाड्याच्या खोलीसारखी असतात. तुम्ही त्या खोलीला कितीही सजवा पण ती तुमची कधीच होऊ शकत नाहीत.

विश्वास ही एक अशी चीज आहे जी हृदय तुटण्याच्या अगोदर तुटते आणि नात ही एक अशी गोष्ट आहे जी स्वार्थ पूर्ण झाल्यावर आपोआप तुटतं.

लोकांवर तुम्ही शंभर वेळा जरी जीव लावला आणि फक्त एकदा तुम्ही जीव लावण्यास विसरला तर लोक शंभर वेळा जीव लावल्याची जाण कधीच ठेवत नाहीत.

भेटत रहा कोणत्या ना कोणत्या बहान्याने, नाती मजबूत होतात एक दोन क्षण सोबत घालवण्याने.

विश्वास का ठेवायचा इतरांवर शेवटी चालायचंच आपल्याला आपल्या पायांवर.

बोलणं सांगून जातं स्वभाव कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे आणि वेळ सांगून जाते नातेवाईक कसे आहेत.

ज्यावेळी जगाचा तुमच्यावर विश्वास नसतो ना, त्यावेळी स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे.

माणसे बदलत नाहीत त्यांच्या आयुष्यात तुमच्यापेक्षा बेहतर कोणीतरी आलेलं असतं.

त्यावेळी खूप दुःख होते, ज्यावेळी आपण एखाद्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो, आणि लोक तो विश्वास सहजपणे तोडतात.

Koni Konach Nast Status in Marathi

आजच्या काळात नाती ही केवळ स्वार्थासाठी जोडली जाऊ लागली आहेत. फक्त स्वतःचे काम करून घेण्यासाठी लोक तोंडावर गोड बोलू लागले आहेत आणि पाठीमागे इतरांसमोर आपली निंदा करू लागले आहेत. आपण अशा लोकांपासून नेहमी सावध राहिले पाहिजे. अशा लोकांना दूर ठेवल पाहिजे. अशा लोकांना वेळीच ओळखून अशा लोकांपासून चार हात लांब राहिलेलच बर आहे.

तुम्ही लोकांवर कितीही जीव लावा ते एक दिवस तुम्हाला नक्की धोका देतील. तुमचं मन तोडतील. तुम्ही अशा लोकांशी कितीही गोड बोला पण ते तुमची किंमत करत नाहीत. कारण त्यांच्या स्वभावातच दगाबाजी असते. पण अशी माणसे सुरुवातीला त्यांचा स्वभाव कधीच दाखवत नाहीत. त्यांचा स्वार्थ संपल्यावर, गरज संपल्यावर हळूहळू त्यांचा खरा स्वभाव, खरे रूप बाहेर काढतात.

Koni Konach Nast Status in Marathi

आपण लोकांना शंभर वेळा जरी मदत केली. जीव लावला आणि एकदा काही कारणामुळे आपणास त्यांची मदत करणे अशक्य झाल्यास ती माणसे आपल्यावर नाराज होतात, आपली लायकी काढतात आणि आपल्या पासून दूर जायला पाहतात. म्हणजे त्यांना या अगोदर शंभर वेळा केलेल्या मदतीला काहीच अर्थ उरत नाही. आपले काम झाल्यावर आपल्याला दुर्लक्ष करायला पाहतात.

अगदी फुलासारखं नातं तोडतात. खरी नाती, खरी माणसे तीच असतात जी संकटामध्ये आपली साथ देतात. आपल्याला जवळ करून आधार देतात. आपल्यावर वेळ आल्यावर आपली मदत करतात. आपल्याला समजून घेतात आपल्याकडून काही चूक झाल्यास पटकन नातं तोडतात. मोठ्या मनाने आपल्याला माफ करतात. आपल्याकडून त्यांचे एखादं काम न झाल्यास आपल्यावर नाराज होत  नाहीत.

Koni Konach Nast Status in Marathi

अशी माणसे आपल्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून असावीत. तुम्हाला जर या जगात अगदी आनंदाने जगायचे असेल तर आपण प्रथम माणसे ओळखायला शिकले पाहिजे. त्यांचा स्वभाव, त्यांचे बोलणे, वागणे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. माणसे ओळखण्याची कला जर आपण शिकलो तर या जगात आपल्याला कोणीही फसवू शकणार नाही आणि जरी कोणी फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण या कलेमुळे माणसं ओळखण्याच्या ज्ञानामुळे लवकर सावध होऊ आणि होणाऱ्या मानसिक त्रासापासून दूर राहू.

सूचना: जर तुम्हाला Koni Konach Nast Status in Marathi या पोस्टमध्ये दिलेले स्टेट्स आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेयर करा.

Leave a Comment