A to Z मेकअप साहित्य ची नावे Makeup Saman List in Marathi

मेकअप साहित्य ची नावे: काही वर्षांपूर्वी फार कमी मेकअपचे साहित्य उपलब्ध असायचे परंतु आज मार्केट मध्ये मेकअप साहित्यात रोज नव्याने भर पडत आहे. रोज नवीन मेकअपची उत्पादने बाजारात येत आहेत. हल्ली अनेक महिला स्वत:ला अधिक सुंदर बनवण्यासाठी ब्युटि पार्लरमध्ये जातात व हवा तसा लुक आपल्या चेहर्‍याला देतात.

परंतु सध्या ब्युटि पार्लर मधील दर खूप वाढले आहेत, त्यामुळे ब्युटि पार्लरमध्ये खास चेहर्‍याचा मेकअप करायला जाणे काही महिलांना परवडत नाही त्यामुळे काही काटकसर करणार्‍या महिला ब्युटि पार्लरमध्ये न जाता घरीच मेकअप करणे जास्त पसंत करतात.

घरी मेकअप करणार्‍या महिलांसाठी किंवा स्वत:च ब्युटि पार्लर सुरू करणार्‍या महिलांना सर्व मेकअप साहित्य ची नावे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही खास मेकअपची आवड असणार्‍या महिलांसाठी मेकअप साहित्य ची नावे यादी अपलोड केली आहे.

मेकअप साहित्य ची नावे

moisturizer (मॉइश्चरायझर)त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरले जाते.
concealer (कन्सिलर)त्वचेवर moisturizer cream  वापरल्यानंतर त्वचेवरचे काळे डाग लपवण्यासाठी वापरली जाते.
foundation (फाऊंडेशन)हे चेहर्‍याची व मानेची त्वचा एक सारखी दिसण्यासाठी लावले जाते.
face powder (फेस पाऊडर)ही त्वचा ऑइल फ्री करण्यासाठी लावली जाते. चेहर्‍याच्या त्वचेवरचा तेलकट पणा दूर करण्यासाठी लावली जाते.
blush (ब्लश)हे गाल लाल व गुलाबी बनवण्यासाठी वापरले जाते.
eye shadow (आय शाडो)हे डोळ्याच्या पापण्यांवरचा भाग रंगीत व आकर्षक करण्यासाठी वापरले जाते. हे प्रॉडक्ट कपड्यांना मॅच होणारे वापरले जाते.
eyeliner pencil (आय लायनर)डोळ्यांच्या कॉर्नरवर लावली जाते. डोळ्यांचे सौन्दर्य वाढवण्यासाठी वापरले जाते.
false eye lashes (फॉल्स आय लॅशेस) यांचा उपयोग पापण्या मोठ्या करण्यासाठी केला जातो.
mascara (मस्करा)याचा उपयोग डोळ्याच्या पापण्या घनदाट व मोठ्या करण्यासाठी केला जातो.
lip liner pencil (लिप लायनर पेन्सिल)याचा उपयोग ओठांच्या चारी बाजूने लाइन मारण्यासाठी केला जातो. याने ओठांची आउटलाइन तयार केली जाते.
lipstick (लिपस्टिक)लिपस्टिक हे महिलांचे सर्वात आवडते कॉस्मेटिक आहे. लिपस्टिक ही वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असते. ओठांना आकर्षक व रंगीत करण्यासाठी लिपस्टिकचा वापर केला जातो.
cuticle pusher and trimmer (क्यूटिकल पुशर अँड ट्रिमर)हाताच्या बोटांची नखे व पायाच्या बोटांची नखे ट्रिम करण्यासाठी याचा वापर केला जातो.
wooden manicure sticks (वूडन मॅनिक्युर स्टीक्स)नखांच्या आतील घाण काढण्यासाठी याचा वापर केला जातो.
makeup kit (मेकअप किट)मेकअप किटमध्ये मेकअपचे सर्व साहित्य ठेवलेले असते. मेकअप किट ला मेकअप बॉक्स असे सुद्धा म्हटले जाते.
lip gloss (लिप ग्लॉस)लिप ग्लॉसचा वापर ओठांना चमकदार आणि चपखल फिनिशिंग देण्यासाठी केला जातो.
eye brightener (आय ब्राइटनर)आय ब्राइटनरचा उपयोग डोळ्यांच्या भोवतीचे काळी वर्तुळे लपवण्यासाठी केला जातो.
nail polish (नेल पॉलिश)ही नखांना लावली जाते. नखे रंगीत व आकर्षक बनवण्यासाठी नेल पॉलिशचा वापर केला जातो.
mirror (मिरर)आरसा, मेकअप कसा झाला आहे हे पाहाण्यासाठी मिररचा वापर केला जातो.
toner (टोनर)चेहरा धुतल्यानंतर चेहर्‍याच्या छोट्या छोट्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण काढण्याचे काम टोनर करते.
bronzer (ब्रोंझर)उजळ चेहरा असणार्‍या महिलांसाठी bronzer वापरले जाते. चेहर्‍यावर warmth आणण्यासाठी ब्रोंझरचा उपयोग केला जातो.
face wash (फेस वॉश)चेहरा स्वच्छ धुण्यासाठी फेस क्रिमचा वापर केला जातो. फेस वॉशने चेहरा धुतल्यास चेहर्‍यावरील मातीचे कण, धूळ, निघून जाते.
face cream (फेस क्रीम)चेहरा उजळ करण्यासाठी फेस क्रीमचा वापर केला जातो. 
tanning lotion (टॅनिंग लोशन)त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी टॅनिंग लोशनचा वापर केला जातो.
cleanser (क्लीनझर)चेहर्‍यावरच्या त्वचेतील मृत पेशी, घाण, तेलकटपणा काढून टाकते व चेहर्‍यावरची छिद्रे स्वच्छ ठेवते.
primer (प्रायमर)चेहर्‍यावरची छोटी छिद्रे झाकते, व दिवसभर येणारा त्वचेचा तेलकटपणा कमी करते.
face toner (फेस टोनर)चेहर्‍यावरचे दाग लपवण्यासाठी फेस टोनरचा वापर केला जातो.

वर दिलेल्या मेकअप साहित्य ची नावे यादी मध्ये जर एखादे मेकअप साहित्याचे नाव लिहायचे राहीले असेल तर कमेन्ट मध्ये नक्की पाठवा.

Leave a Comment