आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे [100 पेक्षा जास्त नावे]

हल्ली आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे ठेवणे हा ट्रेंड खूप वाढला आहे. एक दहावर्षापूर्वी मुलांना खूप साधी सरळ नावे ठेवली जात असत. आजीच्या आजोबांच्या, आत्याच्या, जावेच्या आवडीची नावे मुलांना ठेवली जात असत.

पण अलीकडे जसा काळ बदलत गेला तशी मुलांची मॉडर्न नावे सुद्धा आली. काही पालक आपल्या बाळांना दोन अक्षरी नावे ठेवतात, तर काही तीन अक्षरी ठेवतात, व काहीजण आईचे व वडिलांचे नाव एकत्र करून एक सयुंक्त नाव तयार करतात.

आई वडिलांच्या नावाला मिळते जुळते नाव ठेवणे खूप सोपे आहे परंतु आई वडिलांच्या नावावरून एक नवे नाव तयार करणे खूप अवघड आहे.

आई वडिलांच्या नावावरून मुलासाठी व मुलीसाठी नाव कसे तयार करावे.

आई वडिलांच्या नावावरून मुलांचे नाव तयार करण्यासाठी तुम्हाला कागदावर आईचे व वडिलांचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर दोन्ही नावातून नवीन नाव तयार करण्यासाठी अक्षरांची जुळवा जुळव करायची आहे. नवे नाव तयार करण्यासाठी तुम्हाला एक एक अक्षर जुळवून पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागेल. जर एखादे सुंदर नाव तयार झाले तर ते मित्र मैत्रिणींना दाखवून निवडावे. अशा पद्धतीने तुम्ही आई वडिलांच्या नावावरून एक नवे नाव तयार करू शकता.

मित्रांनो तुम्ही जर अशीच आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे शोधत असाल तर आम्ही खाली काही निवडक नावे दिली आहेत.

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे

विजय + सूचित्रा = सुजय, यश

नंदन + स्वाती = स्वानंद

अनिल + सलोनी = सनील, नील

निलेश + स्वाती = स्वप्नील, स्वनील

प्रदीप + कोमल = प्रेम, कुलदीप

निकेश + रिना = राकेश

मोनाली + राजेश = मोनिश, रुनाली

सुजाता + पराग = सारंग, सारा

अनुष्का + विराट = अविरा, अन्वी

अक्षय + वैष्णवी = अंशवी, अनिष्का

सोपान + साक्षी = सोनाक्षी, सपना

राहुल + प्रीती = इरा, रितू,

सुजीत + राजश्री = सुरश्री, सारा, श्री

मिलिंद + पूनम = नमामी, मिलीना

विशाल + स्नेहल = सान्वी

संतोष + अश्विनी = तनुश, आशितोश

नवनाथ + विद्या = विनय, नयन

रूपाली + दीपक = रूपेश

सरिता + मनोज = मानस

विराट + अनुष्का = विरूष्का 

मोहन + पूजा = पूजन, अनजन

अमोल + मोनाली = अमोली

चंद्र्कांत + गायत्री = चित्रा

अनिल + कावेरी = अनिका

माधव + राधिका = मधुरा

स्वप्नील + गार्गी = स्वरांगी

आशीष + नीता = निशा, अनिशा

आरूण + रोहिणी = आरोही

महेंद्र + रेणुका = महेक, माहिका

रवी + माया = मायरा

सूरज + निकिता = निरजा, नायरा, नितारा  

आदित्य + रानी = आदिरा, आरणा

नेहा + राकेश = निहारिका

अभिजीत + जयश्री = अभिश्री

अविनाश + नीता = अवनी

विकास + भारती = भाविका

जीवन + कविता = जीविका

मयूर + राधा = मयूरा

संजय + अनिता = संजीता

तेजस + अंजली = सेजल  

अजय + प्रिया = जय, विजय

अंश + स्वरा = स्वरांश, स्वरांत

कुणाल + सुनीता = संकुल, संकल्प

शरद + प्रियंका = प्रियांश, प्रांश, रियांश

संजय + शोभा = सुयश, जयश

अनिल + शितल = अतिश, निलेश

संदीप + रीना = सरीनु, सीनू, 

पांडुरंग + मीनाक्षी = प्रेम, पवन

पराग + सुजाता = सारंग, स्वराज

पुजा + केतन = तनुज, जतीन

गणेश + आरती = अंश

सचिन + कविता = कविश, तनिष्क, संकल्प

संभाजी + रूपाली = सारांश

तुम्हाला जर आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे तयार करण्यासाठी अडचण येत असेल तर कमेंट मध्ये आईचे नाव + वडिलांचे नाव = मुलगा/मुलगी अशी कमेंट करा आम्ही तुम्हाला नाव तयार करून देऊ.

2 thoughts on “आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे [100 पेक्षा जास्त नावे]”

Leave a Comment