नवनाथांची नावे, 84 सिद्ध नावे Navnath Name List in Marathi

Navnath Name List in Marathi: मित्रांनो नाथ या शब्दाचा अर्थ स्वामी असा होतो. भारत देशामध्ये नाथ योगींची परंपरा ही खूप प्राचीन आहे. ज्यांनी आपल्या तपस्येच्या जोरावर जन कल्याण केले व लोकांना सत्कर्माचा मार्ग दाखवला. नाथ समाज हा हिंदू समाजाचा महत्वपूर्ण अंग आहे. सर्व नाथांचा रहिवास हा हिमाचल प्रदेशातील गुंफा मध्ये आढळतो.

आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे नाथांनी अशा गुंफामध्ये तपस्या व साधनेत व्यतीत केली आहेत. नवनाथांचा जन्म हा मातेच्या गर्भातून झाला नाही. असे सांगितले जाते कि श्री कृष्णाच्या सांगण्यावरून नव नारायनांनी ज्ञान, साधना, वैराग्य व योग मार्गाची स्थापना करण्यासाठी कलियुगात अवतार धारण केला होता. भाविकांनो आज आपण या ठिकाणी Navnath Name List in Marathi (मराठीत नवनाथ नावांची यादी) पाहणार आहोत.

Navnath Name List in Marathi

Navnath Name List in Marathi
नवनाथ नावे      समाधीस्थळजन्म कसा झाला
मच्छिंद्रनाथसावरगांव, तालुका आष्टी, जिल्हा बीडजन्म माशाच्या पोटी झाला म्हणून त्यांचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेवले गेले.
गोरक्षनाथमांजरसुंभा  तालुका जिल्हा अहमदनगरगोरक्षनाथ यांचा जन्म उकिरड्या मध्ये झाला.
गहिनींनाथचिंचोली, तालुका आष्टी, जिल्हा बीडमातीच्या पुतळ्यातून गहिनींनाथ यांचा जन्म झाला.
जालिंधरनाथयावलवाडी तालुका शिरूर, जिल्हा बीडजालिंधरनाथ यांचा जन्म यज्ञ कुंडातून झाला.
कानिफनाथमढी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगरकानिफनाथ यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला.
भर्तरीनाथहरंगुळ, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणीउर्वशीचे सौंदर्य पाहून सूर्य देवतेचा वीर्यपात झाला आणि त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला व त्या पात्रातून भर्तरीनाथ यांचा जन्म झाला.
रेवननाथविटेगांव, तालुका खानापूर, जिल्हा सांगलीब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले आणि त्यातून रेवननाथ यांचा जन्म झाला.
वटसिद्धनागनाथ वडवळ, तालुका चाकूर, जिल्हा-लातूरवडाच्या झाडाच्या डोलीत राहणार्‍या सापाच्या अंड्यातून यांचा जन्म झाला म्हणून त्यांना वटसिद्ध नागनाथ असे म्हटले जाते.
चरपटीनाथ गुप्तरित्या आजही भ्रमन चालू आहे.भागीरथी नदीच्या किनार्‍यावर यांचा जन्म झाला.

84 सिद्ध नाथांची नावे

ज्वालेन्द्रनाथ, श्रीमञ्जुनाथ, शाबरनाथ, प्रभुदेवना, कपिलनाथ, भद्रनाथ, दरियावनाथ, नारदेवनाथ, विचारनाथ, गोरक्षनाथ, सिद्धबुधनाथ, टिण्टिणिना, बालगुंदईनाथ, वीरनाथ, कायनाथ, पिप्पलनाथ, कानीपानाथ, चर्पटनाथ, एकनाथ, याज्ञवल्क्यनाथ, श्रृंगेरीपानाथ, चक्रनाथ, शीलनाथ, सुरतना, रत्ननाथ, वक्रनाथ, दयानाथ, पूज्यपादना, श्रीमहासिद्धमस्तनाथ, प्रोढ़नाथ, नरमाईनाथ, पारश्वनाथ, धर्मनाथ(धोरम), सिद्धासननाथ, भगाईनाथ, वरदना‍थ, चन्द्रनाथ, माणिकनाथ, ब्रह्माईनाथ, घोड़ाचोलीनाथ, शुकदेवनाथ, लोकनाथ, श्रुताईनाथ, हवाईनाथ, खेचरनाथ, पाणिनाथ, मनसाईनाथ, औघड़नाथ, भुचरनाथ, तारानाथ, कणकाईनाथ, गंगानाथ, गौरवनाथ, भुसकाईनाथ, गेहरावलनाथ, गोरनाथ, मीननाथ, लंकानाथ, कालनाथ, बालकनाथ, रघुनाथ, मल्लिकानाथ, कोरंटकनाथ, सनकनाथ, मारकण्डेयनाथ, सुरानन्दनाथ, सनातननाथ, ज्ञानेश्वरनाथ, निरंजननाथ, सनन्दननाथ, निवृत्निनाथ, सिद्धनादनाथ, नागार्जुननाथ, गहनीनाथ, चौरंगीनाथ, सनत्कुमारनाथ, मेरूनाथ, सारस्वताईनाथ, वीरबंकनाथ, विरूपाक्षनाथ, काकचण्डीनाथ, धुन्धुकारनाथ, बिलेशयनाथ, अल्लामनाथ.

मित्रांनो भगवान शंकराला आदिनाथ तर श्री दत्तात्रयांना आदि गुरु मानले जाते. नाथ संप्रदायामध्ये शिव शंकर व श्री दत्ताचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिव शंकर आणि श्री दत्त हे नाथ संप्रदायातील प्रमुख देवता मानले जातात. श्री दत्ताची कृपा नवनाथांची पुजा करणार्‍यांवर अपार असते.

जे भाविक नवनाथांची पुजा मनोभावे करतात त्यांच्यावर श्री दत्त सदैव प्रस्सन असतात. आपल्या भक्तांवर येणार्‍या प्रत्येक संकटाला दूर करतात. लेखक कविराज मालु नरहरी यांनी १८१९ मध्ये नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ लिहला. या ग्रंथात ४० अध्याय व ७६०० ओव्या आहेत. महाराष्ट्रातील भाविक नवनाथ पारायणाची सुरुवात शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावर, गुरवार किंवा शुक्रवार या दिवशी करतात.

भाविकांनो या “Navnath Name List in Marathi” लेखामध्ये अपलोड केली गेलेली माहिती ही अगदी बरोबर आहे व ही माहिती इंटरनेट वरून अचूक घेतलेली आहे. जर तुमच्या काही सूचना व प्रतिक्रिया असतील तर कमेन्टमध्ये नक्की कळवा आपण यावर नक्की विचार करू.

Leave a Comment