लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य, मुद्देसूद संपूर्ण माहिती

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य: स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक युग म्हणजे लोकमान्य टिळक होय. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही भावना टिळकांनी प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये निर्माण केली. अनेक वर्षे इंग्रजांचे गुलाम झालेल्या जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम, व स्वातंत्र्याची भावना निर्माण करण्याचे महत्वाचे काम टिळकांनी केले.

लोकमान्य टिळक हे एक प्रखर पत्रकार, थोर समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय नेता, संस्कृत भाषेचे पंडित आणि एक विद्वान शिक्षक होते. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रस्थानी होते. लोकमान्य टिळक हे जातीव्यवस्थेचे समर्थन करणारे समाजसुधारक होते. लोकमान्य टिळकांचे विचार हे जनतेद्वारा स्वीकृत होते, त्यामुळे लोक त्यांच्या नावापुढे “लोकमान्य” जोडू लागले.

वाचकांनो आज आपण या वेबपेजवर लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

टिळकांचे पूर्ण नाव

टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. केशव हे त्यांचे मूळ नाव आहे.

जन्म ठिकाण

लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै, 1856 साली झाला. त्यांचे जन्मठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखलगाव आहे.

आई वडिलांचे नाव

त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते, तर वडिलांचे नाव गंगाधरपंत असे होते.

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य

1. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 1884 मध्ये टिळकांनी रानडे, आगरकर व भांडारकर यांच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था महाराष्ट्रातील पुणे शहरात स्थित आहे.


2. फर्ग्युसन कॉलेज

पुणे येथे 2 जानेवारी 1885 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन कॉलेज स्थापन केले. या कामामध्ये त्यांना आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मदत केली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये टिळक विद्यार्थ्यांना गणित व संस्कृत विषयाचे धडे देत असतं. सध्या फर्ग्युसन महाविद्यालय पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. फर्ग्युसन कॉलेजला NAAC द्वारे A ग्रेडने मान्यता दिली आहे.


3. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना

1 जानेवारी 1880 साली लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे तसेच त्यांचे मित्र महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शिक्षण संस्थेचा उद्देश सर्व सामान्य विद्यार्थ्यांना अगदी स्वस्तात शिक्षण देण्याचा होता.


4. आर्यभूषण छापखाना

लोकमान्य टिळक व आगरकर यांनी 4 जानेवारी 1881 मध्ये “केसरी” या मराठी दैनिकाची सुरुवात. 2 जानेवारी 1881 मध्ये “मराठा” या इंग्रजी दैनिकाची सुरुवात केली. केसरी या दैनिकात समाजातील घटनांचा आढावा घेतला जात असे.


5. गणेशोत्सव सुरू केला

1893 मध्ये देशातील तरुणांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, सर्व समाज एकत्र यावा या भावनेने टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला. गणेश उत्सवाला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यात टिळकांना यश आले आहे. त्यामुळेच तर गणेश उत्सव संपूर्ण देशभर साजरी केला जातो.


6. स्वराज्याची घोषणा

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांनी ब्रिटीशांना ठणकावून सांगितले. टिळकांच्या या घोषणेमुळे स्वातंत्र्य लढ्याचे आंदोलन अधिक तीव्र झाले.


7. प्रतियोगी सहकारिते

1917 साली टिळकांनी “प्रतियोगी सहकारिते” ची संकल्पना मांडली.


8. जहालमतवादाचा काळ

1905 ते 1920 हा काळ जहालमतवादी विचार असणार्‍या लोकांचा काळ होता. 1905 ते 1920 हा काळ लोकमान्य टिळकांमुळे काँग्रेसमधील जहालमतवादाचा काळ मानला जातो. 1907 मध्ये सूरत या ठिकाणी जहालमतवादी आणि मवाळमतवादी या दोन्ही गटात फुट पडली व मवाळमतवादी नेत्यांनी जहालमतवादी विचार असलेल्या टिळकांची आणि अन्य जहालमतवादी विचारसरणीच्या लोकांना काँग्रेसमधून बाहेर हाकलले.


9. परदेशी कापडांची होळी

टिळकांचा स्वदेशी वस्तु खरेदीवर अधिक भर होता, त्यांनी चतुसूत्रीचा कार्यक्रम राबवून स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्यासाठी जनजागृती केली. 1905 मध्ये टिळकांनी शिवरामपंत यांना सोबत घेऊन परदेशी कापडांची होळी केली.


10. जहाल गटाचे नेतृत्व स्वीकारले

लोकमान्य टिळकांनी 1907 मध्ये जहाल गटाचे नेतृत्व स्वीकारले.


11. राजद्रोहाचा खटला

1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालवला गेला आणि त्यांना या खटल्यामध्ये सहा वर्षाची शिक्षा सुनावली गेली.


12. शिवजयंती सुरू केली

1895 मध्ये टिळकांनी शिवजयंती सुरू केली.


13. गीता रहस्य ग्रंथाचे लेखन

मंडाले तुरुंगात राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहला.


14. सार्वजनिक सभेवर वर्चस्व निर्माण

1895 मध्ये टिळकांनी सार्वजनिक सभेवर आपले वर्चस्व निर्माण केले.


15. काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग

1889 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग घेतला.


16. चतुसूत्रीचा कार्यक्रम

स्वदेशी-बहिष्कार-राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुसूत्रीचा कार्यक्रम राबवला.


17. होमरूल लीगची स्थापना

स्वातंत्र्य चळवळ अधिक वेगवान करण्यासाठी 1916 मध्ये बेळगाव या गावी त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली. होमरूल लीग ही एक राष्ट्रीय राजकीय संघटना होती.

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य पाहता त्यांचे प्रखर राष्ट्रप्रेम दिसून येते. त्यांची रूढी परंपरा विषयी असलेली ओढ दिसून येते. वाचक मित्रांनो या लेखामध्ये लोकमान्य टिळकांच्या सामाजिक कार्याविषयी दिलेल्या माहितीबद्दल काही सुचना असतील तर कमेन्ट मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment