101+बुद्धीमान कोडी Intelligent Marathi Puzzles With Answers

मित्रांनो कोडे हा एक असा खेळ आहे, एक असा प्रश्न आहे ज्याद्वारे माणसाची बुद्धिमता, चातुर्य व ज्ञान तपासता येते. मित्रांनो आज आपण या ब्लॉग पेजवर काही महत्वपूर्ण Intelligent Marathi Puzzles With Answers पाहणार आहोत.

Intelligent Marathi Puzzles With Answers

खाली चार्ट मध्ये बुद्धीमान कोडी संग्रह दिला आहे, या चार्टमध्ये दिलेली कोडी ही विचार करायला लावणारी कोडी आहेत. या कोड्यांचे उत्तर हुशार लोकांना सुद्धा सहजा सहजी देता येणार नाही.

Intelligent Marathi Puzzles With Answers
Marathi PuzzlesAnswers
एवढस कार्टं घर कसं राखतं.कुलूप
इथेच आहे पण दिसत नाही.वारा
दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मांतरी.डोळे
प्रश्न असा आहे कि उत्तर काय आहे.दिशा
पांढर पातेल पिवळा भात.अंड
तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला.लवंग
सुपभर लाह्या त्यात एक रुपया.चंद्र आणि चांदण्या
पाय नाही चाक नाही तरीही चालतो खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागतो.पेन
एका म्हातार्‍याला बारा मुलं काही लहान काही मोठी काही तापलेली काही थंड.वर्ष
भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात, पांढऱ्या मातीत लाल ढेकळ त्यावर पेरल्या काळ्या बिया, खाल्लं तर मिळेल थंडावा अशी ह्या फळाची किमया. ओळखा पाहू कोण. टरबूज
एका महालात 32 खोल्या त्यात राहते एकच राणी, सारखं सारखं मागे पाणी ओळखा पाहू मी कोण.जीभ
देवबाप्पा जेव्हा छोटा होता तेव्हा तो ही शाळेत जात होता, एकदा काय गंमत झाली त्याची रंग पेटी पडली, खाली रंग सारे सांडून गेले, ढगांनी ते पटकन गोळा केले, ओळखा बर ते रंग कोणाला दिले, कोण मग आकाशात सप्तरंगी झाले.इंद्रधंनुष्य
बकरी सारखे केस, गाई सारखं डोकं, घोड्यासारखे शेपूट असलेला, अस्वला सारखा आवाज, हजार किलो वजनाचा हा शाकाहारी प्राणी थंड प्रदेशातील गाय असे म्हणतात कोण ओळखा पाहू.याक
हवेत सोडत काळ्या रेघा, गावोगावी जाते राणी, लोखंडाचा रस्ता हीचा, सांगा हिला ओळखलं कोणी.आगगाडी
अशा एका सजीवाचे नाव सांगा त्याला डोळे नसतात.गांडूळ
असा कोण आहे जो बिना पायाचा धावतो आणि कधीच परत येत नाही.वेळ
अशी कोणती गोष्ट आहे जी खाली तर येते पण कधीच वर जात नाही.पाऊस
मी तुम्हाला नेहमी खाली खेचतो पण स्वतः कधी वर जात नाही सांगा पाहू मी कोण आहेगुरुत्वाकर्षण
एका राजाची एक अद्भुत राणी, जी दमा दमाने पिते पाणी. सांगा पाहू मी कोण.दिवा
इवलशी नन्नूबाय सार्‍या वाटण गीत गाय,शिटी
पाणी नाही पाऊस नाही तरी रान कस हिरवं, कात नाही चुना नाही तरी तोंड कसं लाल. पोपट
कोकणातन आला रंगू कोळी, त्यांन आणली भिंगू चोळी, शिंपी म्हणते शिवू कशी, परटीन म्हणते धुवू कशी आणि राणी म्हणते घालू कशी.कागद
डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही. सांगा पाहू कोण आहे.बाहुली
अशी कोणती वस्तू आहे जिला कापल्यावर सर्वजण गाणे म्हणू लागतात.केक
रस्ता आहे पण वाहने नाहीत घरे आहेत पण माणसे नाहीत.नकाशा
दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मांतरी.डोळे
हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली.भेंडी
खडक फोडला चांदणी चमकली, चांदीच्या विहिरीत मिळते पाणी, आम्ही म्हणतो देवाची हीच करणी. नारळ
जर तुम्ही तिला पकडलात तर तिला तुम्ही मारून टाकता आणि जर नाही पकडला तर तिला तुम्ही सोबत ठेवता. ओळखा पाहू कोण.ऊवा
दिसत नाही कधी कोणाला, पिंजऱ्यामध्ये लपून असतो, भीती वाटली किंवा धावले की जोराने मी धडधडतो. ओळखा पाहू मी कोण.हृदय
झाडा झाडांवरून फिरतो, सरसर नाहीसा होतो, नानाविध रंग बदलतो, किडे खाऊन पोट भरतो, जीभ याची लांब असते, कुंपणापर्यंतच धाव असते. ओळखा कोण.सरडा
असे काय आहे जे तुम्हाला प्रश्न विचारत नाही तरीसुद्धा तुम्ही त्याला उत्तर देता.फोन कॉल
लांब आहे पण साप नाही, बांधतात पण दोरी नाही, ओळखा पाहू मी कोण.वेणी
कोकणातन आली सखी, तिच्या मानंवर दिली बुक्की, तिच्या घरभर लेकी.लसूण
आठ तोंड पण जीभ नाही तरी शब्दांची गोडी मधापेक्षा कमी नाही.बासरी
तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला.लवंग
दोन भाऊ जुळे एका रंगाचे, एका उंचीचे एक हरवता काय काम दुसऱ्याचे.चप्पल
हिरवा पिवळा रंग, आंबट गोड चव, “क” जीवनसत्वाने भरपूर, माझा गाव नागपूर ओळखा पाहू मी कोण.साबण
काळा घोडा पांढरी सवारी एक उतरला तर दुसऱ्याची बारी.तवा आणि भाकरी
अशी कोणती गोष्ट आहे जी गर्मी असो की थंडी असो नेहमी थंड राहते.बर्फ
अशी कोणती गोष्ट आहे जी एक मुलगी लग्नाआधी घालू शकत नाही.मंगळसूत्र
एका महालात 32 खोल्या त्यात राहते एक राणी सारखं सारखं मागे पाणी सांगा पाहू मी कोण.जीभ
कुट कुट काडी पोटात नाडी, राम जन्मला हात जोडी, कृष्ण जन्मला हात जोडी.मंदिरातील घंटा
अशी कोणती गोष्ट आहे जी आजारी पडत नाही तरी गोळी घ्यावी लागते.बंदूक
असे काय आहे जे लोक म्हणतात वाईट आहे पण तरीसुद्धा ते प्यायला सांगतात. सांगा पाहू कोण आहे.राग
पाणी नाही, पाऊस नाही रान हिरवे गार, कात नाही चुना नाही तोंड लालेलाल. सांगा पाहू मी कोण.
पोपट
दुःखात आणि सुखात बरसणाऱ्या पावसाचे नाव काय.अश्रु
तीन पायांची तिपाई त्यावर बसला शिपाई.चूल आणि तवा
तीन जण वाढायला बारा जण जेवायला.घड्याळ
पाटील बुवा राम राम दाढी-मिशा लांब लांब.कणीस
पांढरं पातेल पिवळा भात न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ.अंड
असे काय आहे जे तुम्ही परत बघू शकत नाही.कालचा दिवस
लाल सुरी मातीत पुरी, वरती झेंडा गंमत करी.गाजर
हजार येती हजार जाती, हजार बसती पारावर, अशी नार ती जोराची हजार घेती उरावर.ट्रेन किंवा बस
सगळे गेले रानात आणि झिपरी पोरगी घरात. केरसुणी
घंटा आहे पण मंदिर नाही पैसे मागतो पण भिकारी नाही.कंडक्टर
प्रत्येकाच्या सोबत मी असते तुम्ही जिथे जाता तिथे मी येते.सावली

कोड्यांचे काही प्रकार

शाब्दिक कोडी (Word puzzles), संख्या कोडे (Number puzzles), तर्कशास्त्र कोडे (Logic puzzles), तुकड्यांचे कोडे (Jigsaw puzzles) व कोडे खेळ ( Puzzle games) इत्यादि.

कोडे सोडवण्याचे फायदे

कोडे सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मेंदूचा चांगला व्यायाम(workout) होतो. विचार करण्याची, तर्क करण्याची क्षमता वाढते.

कोडे सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे बौदधिक पातळी(IQ) वाढते. शिवाय कोडे सोडवल्यामुळे डिमेंशिया आणि अल्झायमर (स्मृतिभ्रंश/अल्झायमर) यांसारखा आजार लवकर जडत नाही.

मित्रांनो या ब्लॉग पेजवर शेअर केलेले Intelligent Marathi Puzzles With Answers तुम्हाला आवडले कि नाही हे कमेन्ट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे आणखी काही puzzles असतील तर आम्हाला नक्की सेंड करा.

Leave a Comment