पाण्याचे महत्व मराठी उपयुक्त माहिती

पाण्याचे महत्व मराठी माहिती, Importance of water Marathi, पर्यावरणासाठी पाणी कोणती महत्त्वाची भूमिका बजावते, जलसंधारणाची गरज का वाटते, पाणी कशासाठी साठवायचे? पाण्याची साठवण करणे का आवश्यक आहे? चला जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे.

importance of water Marathi

मानवी जीवनातील पाण्याचे महत्व

पृथ्वीवरील सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो म्हणजे पाणी. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. एका व्यक्तीच्या वजनाच्या 60 टक्के पाणी त्याच्या शरीरामध्ये असते. शेती हा मानवाचा प्रमुख व्यवसाय आहे.

शेतीसाठी पाण्याची गरज असते. पृथ्वीवर सहजपणे उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे मानवाने शेती हा व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. तसेच इतर छोटे मोठे उद्योग सुरू ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्यामुळे मानवास निरोगी जीवन प्राप्त झाले आहे.

संसर्गजन्य रोगांपासून आपले शरीर सुरक्षित रहावे याकरिता मानव आपल्या शरीराची, घराची व अंगणाची वेळोवेळी स्वच्छता पाण्याच्या मदतीने करत आला आहे. मनुष्य जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपणास पाण्याचे मोठ्या प्रमाणात योगदान असलेले पहायला मिळते. आर्थिक विकास, परिवहन, ऊर्जा, उत्पादन, व कृषी अशा क्षेत्रामध्ये मानवाने पाण्याच्या मदतीने आपली प्रगती साधली आहे.

जलसंधारणाची गरज का वाटते/पाणी कशासाठी साठवायचे?/पाण्याची साठवण करणे का आवश्यक आहे?

ज्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण फार कमी असते त्या प्रदेशामध्ये शेतीसाठी, छोट्या मोठ्या उद्योगधंध्यासाठी वर्षभर पुरेसे पाणी प्राप्त होत नाही परिणामी अशा प्रदेशांमध्ये रोजगार फार कमी उपलब्ध होतो व त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास होण्यास अडथळे निर्माण होतात.

ज्या प्रदेशामध्ये पाण्याचा फार कमी साठा असतो, पावसाचे प्रमाण अत्यलप असते अशा प्रदेशातील लोक रोजगाराच्या शोधात मोठ्या शहराकडे धाव घेतात. प्रामुख्याने दुष्काळी प्रदेशामध्ये जलसंधारणाचे प्रकल्प राबवणे फार गरजेचे वाटते. जास्तीत जास्त जमीन शेती लागवडी खाली आणण्यासाठी पाणी फार गरजेचे आहे आणि त्याकरिता जलसंधारण ही काळाची गरज बनली आहे.

ओढा नद्या नाले यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात यावे, ठिकठिकाणी शेततळे बांधण्यात यावी, जेणेकरून पावसाच्या पाण्याची जास्तीत जास्त साठवणूक व्हावी. मानवनिर्मित किंवा नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत यांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्याने पावसाच्या पाण्याची जास्तीत जास्त अडवणूक होऊ शकते व ते पाणी वर्षभर पुरते. त्यामुळे आसपासच्या गावांना त्याचा जास्तीत फायदा होऊ शकतो.  

पर्यावरणातील पाण्याची भूमिका (महत्व) 

पाणी हा सजीवाच्या जीवनातील मूलभूत घटक आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. पाण्याला सजीवाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पृथ्वीवर 71 आढळते. पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम पाणी हा घटक करत असतो.

झाडे झुडपे, पशुपक्षी, जलचर, उभयचर, सरपटणारे प्राणी व जीवजंतू अशा अनेक सजीवांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. सजीवांच्या शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी पाणी शरीरामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. सजीवांची असलेली पाण्याची गरज भागवण्याचे काम पर्यावरणात उपलब्ध असलेले पाणी करते.

सजीवांना आवश्यक असलेले अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पाण्याचे महत्व खूप आहे. निसर्गातील सर्व प्राण्यांना, सजीवांना आवश्यक तेवढे पाणी मिळाल्याने अन्न मुबलक प्रमाणात उपबल्ध होते परिणामी सजीवांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते.

पर्यावरणासाठी पूरक असलेले पाणी हे नद्या नाले व आद्र प्रदेशांना मिळणार्‍या प्रवाहांना पुनरसंचयित करण्याचे काम करते. पर्यावरणातील वाहत्या पाण्यामुळे नद्या, नाले, ओढे तसेच आद्र प्रदेशांचे आरोग्य चांगले राहते. निसर्गातील पाण्यामुळे नैसर्गिक अनैसर्गिक कचरा एका ठिकाणी साचून राहत नाही.

पाण्याचा दैनंदिन वापर (महत्व) 

मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. पाण्यामुळे मानवाचे जीवन समृद्ध झाले आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत असताना आपणास पाहायला मिळतो, जसे शेतीसाठी मुबलक पाणी देणे, पशुपालन यामध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी देणे, त्यांची स्वच्छता व निगा राखण्यासाठी पाण्याचा वापर करणे, तसेच इतर छोट्या मोठ्या उद्योगांच्या निर्मितीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

प्रत्येक कुटुंबामध्ये पहाटेपासून ते झोपेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. ज्यामध्ये कपडे धुणे, भांडी घासणे, घर स्वच्छ करणे, आंघोळ करणे, वस्तूंची साफसफाई करणे व बागेमध्ये झाडेझुडपे लावणे अशा अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

खारे पाणी व गोडे पाणी

साधारणपणे पाण्याचे दोन प्रकार पडतात एक खारे पाणी आणि दुसरे गोडवे पाणी. गोडवे पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी केला जातो आणि खार्‍या पाण्यापासून समुद्रामध्ये मीठ प्राप्त केले जाते. पृथ्वीवर जर गोडे पाणी पुरेसे नसेल तर अन्न शिजवण्यापासून ते युद्धापर्यंत लोकांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही आणि लोकांचा मृत्यू दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन होईल, तसेच इतर संसर्गजन्य व भयंकर आजाराने ग्रस्त होऊन लोक मरण पावतील. यामुळे पृथ्वीवर गोड्या पाण्याचे महत्त्व आपणास कमी लेखता येणार नाही.

Leave a Comment