होळी या सणावर उत्तम निबंध मराठी Holi Essay in Marathi

Holi essay in Marathi, 5 10 points lines on holi in Marathi, Maza avadta san holi essay, my favourite festival holi in marathi for students for class 1,2,3,4,5

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यामध्ये होळी हा सण खूप उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. होळी या सणाला शिमगा असेही बोलले जाते. ग्रामीण भागामध्ये शिमगा अतिशय उत्साहाने साजरी केला जातो. गावातील सर्व लोक वाळलेली लाकडे एकत्र करून गावातील मुख्य ठिकाणी संध्याकाळच्या वेळी एकत्र करून पेटवात, यालाच होली पेटवणे असे म्हणतात.

Holi essay in Marathi
Holi essay in Marathi

गावातील सर्व महिला पुरुष लहान थोर माणसे एकत्र येऊन होळीला नारळ व पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. नारळ व पुरणपोळीचा नैवैद्य दाखवल्यानंतर होळी भोवती प्रदक्षिणा घालून पैशाचे नाणे होळी मध्ये टाकतात व होळी भोवती प्रदक्षिणा घालत जोर जोराने बोंबलतात.

गावातील महिला परंपरेने होळीची पुजा करतात होळीला नैवैद्य, खोबर्‍याचा टुकडा, नाणे, हळद कुंकू वाहतात, आणि आपल्या लहान मुलांसोबत होळी समोर नतमस्तक होतात. वयस्कर मंडळी तर होळी दिवशी अगदी उत्साहाने होळी पेटवण्यासाठी होळी समोर हजर राहतात.  

होळी म्हणजेच रंगांचा सण यामध्ये विविध प्रकारचे रंग वापरले जातात. होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते, वाईट विचार खराब दृष्टी या सर्वांचा नाश करून चांगले विचार धारण करणे हा या पाठीमागचा उद्देश असतो.

Holi Essay in Marathi

त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. होळीला नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक सणाच्या पाठीमागे काहीतरी कारण असतेच तसे होळीच्या पाठीमागे सुद्धा एक इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता तो खूप अहंकारी होता. तो त्याच्या आयुष्यात देवांना सुद्धा जास्त महत्व देत नव्हता पण त्याचा मुलगा प्रल्हाद देवांचा देव विष्णू देव यांचा खूप मोठा भक्त होता, हे त्या हिरण्यकश्यपू राजाला पाहवत न्हवते.

त्याने त्याच्या मुलाला खुप सांगितले तरीही भक्त प्रल्हाद विष्णू देवाची भक्ती करत असे. वैतागून हिरण्यकश्यपू राजाने एक योजना आखली त्याने आपली बहीण होलिका हिला अग्नी वरती चालायचे वरदान होते.

Holi essay in Marathi
Holi essay in Marathi

हिरण्यकश्यपूने प्रल्हाद ला सांगितले तुझी एवढीच विष्णू वरती भक्ती आहे तर तू तुझी आत्या होलिका तिच्यासोबत अग्नी वरती बसुन दाखव असे म्हटल्यांनतर प्रल्हाद आपली विष्णु वरची भक्ति सिद्ध करण्यासाठी आपली आत्या होलिका सोबत अग्नी वरती बसला आणि नारायण नारायण असा जप करू लागला पण अचानक होलिका अग्नीमध्ये दहन होऊ लागली आणि अग्नि भक्त प्रल्हादला काहीच करू शकली नाही.

होलिका अग्नि मध्ये दहन झाली कारण तिला वरदान देत असताना देवाने सांगितले होते वरदानाचा चुकीचा वापर केल्यास तुझी अग्निपासून वाचण्याची शक्ति नाहीसी होईल आणि तसेच झाले. त्यामुळे ती दहन झाली व प्रल्हादाला काहीच झाले नाही त्यामुळे होळी या सणा दिवशी आपल्या मनातले वाईट विचार बाहेर टाकून चांगली वृत्ती धारण करावी असा यामागचा उद्देश आहे.

होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन त्यादिवशी रंगाने होळी साजरी करतात एकमेकांच्या अंगावरती पाणी टाकून रंग टाकून एकमेकांना रंगाने भरवतात. पिचकारी मध्ये रंग भरून लहान मुले तर दिवसभर आपल्या मित्र मैत्राणींच्या अंगावरती रंग टाकतात.

होळी हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. त्यादिवशी एकमेकांच्या मागे पळून रंग लावायला एक वेगळीच मजा येते. होळी आली की बाजारामध्ये अनेक प्रकारचे रंग तसेच सणाचे साहित्य विकण्यास येते. या सणाला रंगांचा सण असे म्हणतात लहान मुले तर एक आठवडाभर हा सण साजरी करतात त्यांना खूप मजा वाटत असते त्यांना पूर्ण भिजून हसत-खेळत आनंद घ्यायला खूप भारी वाटते.

होळी हा सण जवळ आला की आमच्या शाळेला सुट्टी नक्की असते. होळीच्या सुट्टी दिवशी आमच सुट्टी कशी साजरी करायची याच नियोजन अगोदरच ठरलेलं असत. मग सर्व मित्र मैत्रणी कुठे एकत्र यायचं, होळी हा सण दरवर्षी पेक्षा वेगळ्या पद्धतीने कसा साजरी करायचा याच सर्व नियोजान आम्ही करू लागतो.

होळी जवळ आली की आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो, आईच्या हातचा पुरणपोळीचा स्वयंपाक खायला मिळतो, दूध, गुलाबजाम, तसेच आळूच्या पानाच्या वड्या असे अनेक नवीन पदार्थ खायला मिळतात. होळी या सणाला आपल्या भारतीय संस्कृती मध्ये खूप महत्व आहे, दिवाळी, दसरा या सणाप्रमाणेच हा सण सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

सूचना: “Holi essay in Marathi” हा निबंध आवडल्यास आपल्या मित्रांसोबत WhatsApp व Facebook वर नक्की शेयर करा.

Leave a Comment