शेळी विषयी संपूर्ण माहिती निबंध Goat Essay in Marathi

Goat essay in Marathi, Goat information in Marathi, maza avadta paliv prani bakari.

शेळीला गरीबाची गाय असे म्हटले जाते. शेळीला एक तोंड, दोन छोटी शिंगे, दोन डोळे, चार पाय, आणि दोन कान असतात व एक छोटीशी शेपूट वरच्या बाजूला आकाराने वक्र असते. शेळीचा रंग पांढरा, काळा, करडा, आणि तपकिरी असतो. शेळी पालेभाज्या, गवत, झाडपाला, फळे, इत्यादी चारा खाते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन केले जाते.

शेळी ही शरीराने काटक व मजबूत असते. शेळी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना अतिशय उपयुक्त आहे. शेतकर्‍यांच्या, शेतमजुरांच्या उत्पन्नात भर घालणारी शेळी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी एक वरदान ठरलेली आहे. ग्रामीण भागामध्ये शेळ्यांना चारण्यासाठी शेतामध्ये तसेच जंगलामध्ये नेले जाते.

Goat Essay information in Marathi
Goat essay in Marathi, Goat information in Marathi, maza avadta paliv prani bakari.

काही ठिकाणी शेळ्यांचे बंदिस्त पालन केले जाते, त्याला बंदिस्त शेळीपालन असे म्हटले जाते. शेळीपालनाला प्रोत्साहन मिळावे जास्तीत जास्त उत्पादन व्हावे व शेळी पालकांचे जीवन समृद्ध व्हावे म्हणून सरकार द्वारे शेळीपालनासाठी कर्ज, अनुदान तसेच प्रोत्साहन दिले जाते.

आपल्या भारत देशात शासकीय तसेच खाजगी संस्था द्वारा शेळीपालनावर प्रशिक्षण केंद्र चालवले जाते तसेच प्रशिक्षण केंद्रात शेळीपालन या विषयावर अभ्यासक्रम राबवला जातो. शेळी ही शरीराने काटक तसेच कधीही आजारी न पडणारी पाळीव प्राणी आहे.

शेळी पालन करण्यासाठी खूप कमी खर्च येतो, कारण शेतामध्ये व अवतीभवती उपलब्ध असलेला चारा शेळी खाते व इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत जास्त आजारी पडत नाही. शेळी माणसांना तसेच इतर घरगुती पाळीव प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही.

Goat essay in Marathi, Goat information in Marathi

शेळीच्या नर जातीला बोकड असे म्हणतात. शेळी एकावेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. शेळीचे दूध हे अतिशय आरोग्यदायी मानले जाते. शेळी माणसाला दूध, शेतीसाठी लेंडी खत पुरवते. जास्त करून शेळीपालन मांस उत्पादनासाठी केले जाते.

आपल्या भारत देशामध्ये प्राचीन काळापासून शेळी पालन केले जात आहे. शेळी ही गाय प्रमाणे बहुउपयोगी आहे, म्हणून तिला गरीबाची गाय सुद्धा म्हटले जाते. जगातील प्रत्येक प्रदेशात शेळी सहजपणे आढळते. शेळीच्या अनेक जाती संपूर्ण भारतभर आढळतात. शेळी में… में… असा आवाज करते.

ग्रामीण भागात शेळ्यांचे जास्त प्रमाण आढळते, कारण ग्रामीण भागांमध्ये मुबलक पाणी, मुबलक चारा, मोकळी जागा, व सरकारी पशु दवाखाना आढळतात. ग्रामीण भागामध्ये डोंगर-दऱ्या ठिकाणी शेळ्या चारण्यासाठी नेल्या जातात. शेळीच्या दुधामध्ये इतर पाळीव प्राण्यांच्या दुधाच्या तुलनेत सर्वाधिक पौष्टिक गुणधर्म आढळतात. लहान मुलांना शेळीचे दूध पिण्यास दिले जाते. शेळीच्या दुधाने शारीरिक विकास होण्यास खूप मदत होते.

काही ठिकाणी शेळीच्या शिंगापासून शोभेच्या अनेक वस्तु बनवल्या जातात. तसेच काही डोंगराळ प्रदेशात शेळी ओझे वाहण्यासाठी उपयोगी पडते. एक शेळी साधारणपणे 12 ते 14 वर्षे जगते. महाराष्ट्रामध्ये शेळीच्या उस्मानाबादी शेळी संगमनेरी शेळी, सुरती, आणि कोकण कन्याल अशा प्रकारच्या जाती आढळतात.

शेळीपासून तयार होणार्‍या बोकडांना बाजारामध्ये चांगली मागणी असते. शेळीपासून तयार होणारे बोकड वजनावर विकले जाते, त्यामुळे शेतकर्‍याचा अधिक फायदा होतो. सुशिक्षित बेरोजगारांना हा व्यवसाय भरगोस उत्पन्न मिळवून देणारा ठरला आहे. शेळीपालन हा व्यवसाय बेरोजगारांना एक सुवर्णसंधी ठरलेली आहे. युवा वर्ग या व्यवसायाकडे एक चांगले करियर म्हणून पाहू लागले आहेत.

सूचना: जर तुम्हाला Goat essay in Marathi, Goat information in Marathi, maza avadta paliv prani bakari. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment