गुरुपौर्णिमा मराठी निबंध | Essay on Guru Purnima in Marathi 2024.

गुरुपौर्णिमा निबंध मराठी / Essay on Guru Purnima in Marathi.

क्षेत्रातील गुरूंबद्दल आदर, प्रेम, आभार आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गुरुपोर्णिमा व व्यास पोर्णिमा असे म्हणतात. या दिवसाचे फार प्राचीन काळापासून महत्व आहेत, हा दिवस व्यास महर्षींना वंदन करण्याचा दिवस आहे.

व्यास महर्षींनी “महाभारत” हा महान ग्रंथ लिहिला, खूप तपस्वी, ज्ञानी, होते म्हणून गुर्पोर्णिमेला व्यास पोर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. गुरु म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात, जे आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करतात त्या व्यक्ती आणि पोर्णिमा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान होय.

गुरुपोर्णिमा म्हणजे तो दिवस ज्या दिवशी आपल्या गुरूंची पुजा केली जाते. ज्या व्यक्तींच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे आपण इथपर्यंत आलो, आपण जे यश मिळवल, आपणास आपल्या जीवनामध्ये योग्य दिशा मिळाली त्या सर्व व्यक्ति आपल्या आदरणीय गुरु आहेत.

Essay On Guru Purnima in Marathi
Essay on Guru Purnima in Marathi, guru purnima information in Marathi.

आपले खरे अनौपचारिक गुरु प्रथम आपले आई वडील आहेत ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, ज्यांनी आपल्याला चालायला बोलायला शिकवलं ज्यांनी आपल्याला लहानाच मोठ केल तेच खरे आपले दैवत आहेत.

शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक हे आपल्याला स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी जे आवश्यक ज्ञान असत ते देतात. समाजामध्ये एक आदर्श नागरिक बनून ताठ मानेने जगायला शिकवणारे आपले शिक्षक, शिक्षिका, वडीलधार्‍या व्यक्ती ह्या सर्व आपले आदर्श मार्गदर्शक आहेत, आपले खरे दीपक आहेत.

गुरुपोर्णिमा हा दिवस विविध क्षेत्रातील ज्ञान देणार्‍या विद्वान व्यक्तींचा सन्मान, त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे.

गुरुपोर्णिमेदिवशी गुरूंची पुजा करून गुरूला वाकून नमस्कार केला जातो आणि त्यांना अनमोल अशी गुरूदक्षिणा दिली जाते. त्यांनी आतापर्यंत आपणास दिलेल्या योग्य मार्गदर्शनाबद्दल, ज्ञानाबद्दल त्यांचे आभार मानले जातात.

Essay on Guru Purnima in Marathi

गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ति आहेत त्यांचा सन्मान करण, त्यांची आज्ञा पाळण हे आपले परम कर्तव्य आहे. एखाद्याच्या अंगी पशुत्व जरी असले तरी त्याला दैवत प्राप्त करून देण्याची ताकत गुरूमध्ये असते.

गुरु हे तेजस्वी सूर्यासमान आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये अंधार पसरेल तेव्हा तेव्हा तो अंधार आपल्या ज्ञानाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न आपले गुरु करत असतात. या जगात गुरुची महिमा थोर आहे.

मित्रांनो गुरुने आपल्या अनमोल जीवनात सुख-दु:ख, सत्य-असत्य, पाप-पुण्य या सर्व संकल्पनाचे स्पष्टीकरण केलेले असते. आपले गुरु आपल्याला सत्याच्या मार्गावर चालायला शिकवतात. समाजामध्ये वावरताना एक आदर्श व्यक्ति महणून आपले चित्र कसे रेखाटले गेले पाहिजे हे शिकवतात.

आपण आपल्या जीवनात गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, हीच खरी त्यांच्यासाठी आपल्याकडून अनमोल दक्षिणा आहे. गुरूला आपल्याकडून सोने नाणे हवे नसते तर हवे असते ते प्रेम, आपुलकी, आदर आणि आपल यशस्वी होण.

आपल्याकडून काही चूक घडल्यास कधी कधी गुरु आपल्यावर रागवतात सुद्धा, कधी आपल्याला ओरडतात सुद्धा, कारण आपण आपल्या जीवनात कोणताही वाईट मार्ग निवडू नये, कोणतेही चुकीचे गैरवर्तन करू नये म्हणून ते आपल्याला चूक झाल्यावर शिक्षा सुद्धा करतात याचा अर्थ असा नव्हे कि ते आपले शत्रू आहेत.

सूचना: जर तुम्हाला Essay on Guru Purnima in Marathi, guru purnima information in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment