लाडक्या गणपती बाप्पा वर निबंध Essay on Ganesh Chaturthi in Marathi

Essay on ganesh chaturthi in Marathi, avadta san ganesh utsav in Marathi.

सर्व देवामध्ये सर्वात महान असा देव महादेव आहे आणि त्या महादेवाचे पुत्र श्री गणेश आहेत. गणेशजीच्या मातेचे नाव पार्वती आहे. माता पार्वती ने आपल्या अंगाच्या मळापासून श्री गणेशाची निर्मिती केली आहे असा उल्लेख पुराण शास्त्रामध्ये आहे. श्री गणेश हे सर्व लोकी प्रसिद्ध आणि पूजनीय आहेत.

श्री गणेशाची अनेक नावे आहेत त्यापैकी काही प्रसिद्ध नावे खालीलप्रमाणे आहेत. गजानन, गणपती, मोरया, मोरेश्वर, गणेश, एकदंत, विनायक, सुमुख, भालचंद्र, लांबोदर इत्यादि. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची आराधना पुजा केली जाते. श्री गणेशाला विधिवत वंदन पूजन केले जाते. सर्व देवी देवतांमध्ये गणेशजी सर्वांचे लाडके आहेत.

स्वातंत्र्य लढ्यातील थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव या उत्सवाची सुरुवात समाजामध्ये करून दिली. प्रत्येक वर्षी वर्षातून एखादा गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी केला जातो. गणेश उत्सव हा एकूण दहा दिवसाचा असतो.

Essay on ganesh chaturthi in Marathi, avadta san ganesh utsav in Marathi.

अकराव्या दिवशी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी श्री गणेशाच्या जाण्याची त्याला निरोप देण्याची तयारी सुरू असते. ज्याप्रमाणे श्री गणेशाचे आगमन मोठ्या धूम धाम मध्ये असते त्या ही पेक्षा श्री गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी मोठा जलोष असतो.

लहान मुलांना गणपती बाप्पा खूप आवडतात. गणेशाला मोदक, लाडू, पेढे खूप आवडतात म्हणून आवडीने गणेशाच्या आरती दिवशी मोदक, लाडू यांचा गोड प्रसाद वाटला जातो.

संपूर्ण भारत देशामध्ये सर्व सण खूप हा गणेश उत्सव हा सण मोठया उत्साहाने, आनंदाने साजरा करतात. आपल्या देशात विविध सण आहेत त्यामध्ये गणेश उत्सव हा सर्वांचा सर्वात आवडता उत्सव आहे. गणपतीचे आगमन थाटामाटात असते.

Essay on ganesh chaturthi in Marathi

गणपती यायच्या आधीच एक महिना पूर्ण तयारी केली जाते. गणपती साठी घरामध्ये छान डेकोरेशन, लाइटिंग वेगवेगळे मोहक, सुंदर, आणि गोड पदार्थ बनवले जातात. सगळीकडे गाण्यांचा मोठा आवाज असतो, आपल्या घरामध्ये सुद्धा गणपतीचे आगमन मोठया थाटामाटात होते. आपल्या बाप्पासाठी मोदक बनवले जातात बाप्पाची स्थापना केली जाते.

हा दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा असतो. आमच्या गावामध्ये लहान गणपतीचे मंडळ आहे, आम्ही सर्वजण तेथे गणपती बसवतो व पाहायला जातो. बाप्पाची स्थापना केली जाते, खूप आनंद असतो. आमच्या गावामध्ये लहान गणपतीचे मंडळ आहे, आम्ही सर्वजण तिथे गणपती पाहायला जातो. खूप भारी सजावट केली जाते. मंडळाचा गणपतीला खूप मोठा सांस्कृतिक कार्यक्रम असतो दररोज आम्ही गणपतीच्या आरतीला जातो.

मोठया श्रद्धेने गणपतीला नमन करतो आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपतीला साकडे घालतो नवस बोलतो आणि तो नवस पूर्ण झाला की पुढच्या वेळी तो नवस पूर्ण करतो. मंडळाच्या गणपतीला खूप गर्दी असते दररोज लोक दर्शनाला येतात. दर्शनाला तिथे दररोज महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.

लहान मुलांच्या स्पर्धा असतात, जसे की वक्तृत्व, चित्रकला, संगीत खुर्ची, डान्स, आणि गीतगायन इत्यादि हे सर्व पाहण्यासाठी खूप मजा येत असते. लहान मुले खूप आनंद घेत असतात, त्यांना बक्षीसे पण दिली जातात. दररोज प्रसाद दिला जातो. हा सर्व आनंद साजरी करत असताना कसे अकरा दिवस जातात कळतच नाही.

अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते खूप वाजत-गाजत थाटामाटात गणपती येतात आणि कधी जातात कळत पण नाही. रात्रीची मिरवणूक कधीच काढली जाते, मुले मुली नाचत असतात, खूप मजा येते गणपतीची आरती करून सर्वांना जेवण दिले जाते आणि शेवटी आपले बाप्पा आपल्याला सोडून जातात.

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” असे मोठ्या आवाजामध्ये मुले बोलत असतात. हा जल्लोष खूप आनंददायी असतो त्यामुळे मला गणेशोत्सव खूप आवडतो.

सूचना: जर तुम्हाला Essay on ganesh chaturthi in Marathi, avadta san ganesh utsav in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा

Leave a Comment