माझे आजोबा भावनिक निबंध मराठी Essay on Grandfather in Marathi

Essay on Grandfather in Marathi, Maze ajoba Marathi nibandh.

आई वडिलांनंतर आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ति कोण असेल तर ते म्हणजे आपले आजोबा. माझे आजोबा माझ्यावर खूप प्रेम करतात. मी माझ्या आयुष्यात खूप मोठा व्यक्ति व्हावं अशी माझ्या आजोबांची इच्छा आहे.

मी माझ्या आयुष्यात मोठा पोलिस ऑफिसर व्हावं अशी माझ्या आजोबांची इच्छा आहे. माझ्या आजोबा दररोज सकाळी पहाटे लवकर उठतात आणि सूर्यनमस्कार घालतात आणि थंड पाण्यांनी आंघोळ करून देवाला नमस्कार करतात.

Essay on Grandfather in Marathi
Essay on Grandfather in Marathi, Maze ajoba Marathi nibandh.

माझे आजोबा हे शिस्त प्रिय व्यक्ति आहेत. माझ्या आजोबांना खोट बोललेल अजिबात आवडत नाही. माझे आजोबा अतिशय प्रामाणिक आहेत. शेजारी एखादे भांडण झाल्यास ते दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून सांगत आणि चांगला सत्याचा मार्ग दाखवत असत.

माझे आजोबा अतिशय प्रेमळ स्वभावाचे आहेत मुक्या प्राण्यांवरती त्याचे खूप प्रेम आहे. गोठयातील पाळीव प्राण्यांना ते वेळेवर चारा पाणी देतात. एखादे जनावर आजारी पडल्यास डॉक्टरांना बोलावून औषध पानी करत असत.

आजोबा या शब्दाचा अर्थ हा खूप सुंदर आहे, आजोबा म्हणजे आईचे वडील किंवा वडिलांचे वडील. माझे आजोबा माझा खुप लाड करतात, ते मला कुठेही बाहेर फिरायला जाताना मलाही घेउन जातात. ते मला दररोज शाळेत सोडायला आणायला येतात. ते माझी आई व माझ्या वडिलांनासारखीच माझी ही खूप काळजी घेतात.

Essay on Grandfather in Marathi

ते मला शाळेत जाताना दररोज खाऊ घेऊन देतात. दररोज शाळेतून घरी आल्यावर आजोबा मला आमच्या सोसायटीच्या बागेत खेळायला घेऊन जातात व तिथून आल्यावर ते माझा अभ्यास करून घेतात. जी गोष्ट मला येत नसेल ती मला अति उत्तम पद्धतीने समजावून सांगतात. आई-वडील काही गोष्टींनी माझ्यावर रागावले तर माझे बाबा माझी बाजू घेतात.

ते मला दररोज संध्याकाळी पौरानिक, बोधकथा व राजा-महाराजांच्या काही गोष्टी सांगतात, व ते मला काही गाणी ही बोलून दाखवतात, उन्हाळ्यात ते मला दरवर्षी गावाला जाताना सोबत फिरायलाही घेऊन जातात.

बाहेरगावी जाण्यासाठी माझे आजोबा मला दरवर्षी विचारतात कि तुला यायचं आहे का नाही मी गावाला गेल्यावर मला ते पोहायला व झाडावर चढायला शिकवतात, व सायकल ही चालायला शिकवतात, ते माझा खुप लाड करतात, त्यांनी मला विशाल समुद्र सुद्धा मुंबईला दाखवला आहे. मी त्यांच्या सोबत खूप फिरलो.

त्यांनी माझी आजपर्यंत बाहेरगावी जाताना खूप काळजी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मला थंडी ताप असल्याने दवाखान्यात भरती केले गेले होते त्यावेळी आजोबांनी सर्व गोळ्या औषधे, तसेच वेळेवर जेवण आणि वेळवर डॉक्टर कर्मचाऱ्यांनाही वेळवर बोलावून त्यांनी माझी खूप काळजी घेतली. माझ्या आजोबामुळे मी खूप लवकर बरा झालो.

बरा झाल्यावर त्यांनी मला घरी आराम करण्यासाठी सांगितले. माझे आजोबा मला दर दिवाळीला नवीन कपडे घेतात यावर्षी तर त्यांनी मला सलवार-कुर्ता घेतला. ते मला तर आठवडी बाजाराला घरगुती लागणाऱ्या सामान आणण्यासाठी ते मला सोबत घेऊन नेहमी जात. गावात होणार्‍या दरवर्षीच्या देवीच्या यात्रेत ते मला सर्वात पहिल्यांदा यात्री देवी दर्शनासाठी घेऊन जात.

काही वेळेस ते मला यात्रेतील आकाश पाळण्यात बसवत व मला माझे आजोबा सोबत असताना कोणत्याही गोष्टीची कमी वाटत नाही. ते मला सर्व काही घेऊन देत. मला हव्या त्या गोष्टीला कधीच नकार देत नाहीत. ते मला दररोज सकाळी लवकर उठवत. मला दररोज त्यांच्यासोबत सूर्यनमस्कार घालण्यास सांगत.

मी त्यांच्यासोबत व्यायाम करत असे. त्यांनी मला आजपर्यंत खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. आम्हाला शाळेतील होणाऱ्या स्पर्धेत भाग घेण्यास कधीच नकार दिला नाही. माझ्यासाठी माझे आजोबा खूप छान आहेत. त्यांनी मला आजपर्यंत कोणतेही मदतीसाठी नकार केला नाही.

माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी मदत करत. माझे आजोबा हे माझ्या आई-वडिलांना प्रमाणेच आहेत. मला माझ्या पूर्ण कुटुंबावर प्रेम आहे, आणि आजोबांवर तर जिवापाड प्रेम आहे.

सूचना: जर तुम्हाला Essay on Grandfather in Marathi, Maze ajoba Marathi nibandh. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा

Leave a Comment