माझा आवडता मित्र सुंदर वर्णन Essay on my Favourite Friend in Marathi

Essay on my Favourite Friend in Marathi, maza avdata mitra Marathi nibandh.

माझा मित्र सर्वसाधारण कुटुंबातला आहे पण तो माझ्यासारख्या गरीब मित्राची कधीही मैत्री विसरत नाही. माझा मित्र मला शाळेत अभ्यासात खूप मदत करतो. काही गणितातील उदाहरणे न समजल्यास तो मला उदाहरण अगदी खूप सोप्या पद्धतीने समजवून सांगतो.

माझा मित्र आणि मी तर रोज संध्याकाळी मैदानांवर विविध खेळ खेळतो. त्याचा आणि माझा खेळ खेळताना विविध प्रकारचा शारीरिक व्यायाम होतो. आम्ही रोज रविवारी शहरात फिरायला दोघे सोबत जातो. माझ्या मित्राने मी ज्यावेळी आजारी पडलो होतो तेव्हा त्याने मला खूप मदत केली होती. माझ्या प्रत्येक चुकीला त्यांने माफ केले होते.

माझ्या मित्राचे नाव करण आहे. तो दिसायला खूप सुंदर दिसतो. माझ्या मित्राने मला पोहायला व सायकल चालवणे शिकवले आहे. माझा मित्र मला लहानपणापासून ओळखतो.

Essay on My Favorite friend in Marathi
Essay on my Favourite Friend in Marathi

माझ्या मित्राला त्याच्या आयुष्यात पोलिस व्हायच आहे. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही लांब गावी फिरायला जात असत. जाताना माझा मित्र मला खाऊ घेत, मला त्याचा स्वभाव खूप आवडतो. माझा मित्र इतर मुलांसारखा वाईट मित्र नाही तो पण खूप चांगल्या स्वभावाचा आहे. प्रत्येक वेळी तो कोणतेही काम पूर्ण इमानदारीने करतो.

माझा माझ्या मित्रावर पूर्ण विश्वास आहे. दररोज सकाळी माझा मित्र मला व्यायाम करायला घेऊन जातो. आम्ही दोघे दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. दररोज तो आणि मी एकाच बाकावर बसतो. शिक्षकांनी त्याची आणि माझी जागा ठरवून दिलेली आहे. माझा मित्र दर परीक्षेला वर्गात पहिल्या नंबरने पास होतो. तो मला पेपर च्या वेळेस पेपरही दाखवतो.

Essay on my Favourite Friend in Marathi

त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडते.  तो दरवर्षी माझ्या वाढदिवसाला वेगवेगळे प्रकारचे वस्तू, कपडे इत्यादी गोष्टी भेट म्हणून आणतो. आम्ही दररोज संध्याकाळी सोसायटीतील बगिच्यात खेळायला जातो. तो गोरगरिबांना खूप मदत करतो.

प्रत्येकाच्या जीवनात मित्र असणे खूप गरजेचे आहे तसेच माझ्या आयुष्यात ही एक चांगला मित्र आहे. माझा मित्र खूप छान आहे तो बुद्धीने हुशार व खूप चंचल आहे, तो मला खूप मदत करतो मला माझ्या मित्राचा स्वभाव खूप आवडतो. माझ्या मित्राचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक आहे.

तो स्वतःचे स्वतः करतो जसे कपडे धुणे, नियमित अभ्यास करणे, वेळेवर व्यायाम करणे, घरामध्ये आईच्या कामांमध्ये मदत करणे, आजी-आजोबांना दवाखान्यात घेऊन जाणे, त्यांना औषध नियमित देणे, वडीलधाऱ्या लोकांची आज्ञा पाळणे इत्यादी. माझा मित्र स्वभावाने प्रेमळ व शांत आहे.

आई-बाबा रागावले तर त्यांना कधीच उलट प्रश्न विचारत नाही, तो त्याच्या आई-बाबांसोबत केव्हाच हट्ट करत नाही. माझ्या मित्राचे राहणीमान खूप साधे आहे पण तो त्यांच्या भवितव्यासाठी खूप प्रामाणिक आणि कटिबद्ध आहे.

Essay on my Favourite Friend in Marathi, maza avdata mitra Marathi nibandh.

माझ्या मित्राला कोणतीही वाईट व्यसन कोणताही वाईट संगत नाही माझ्या मित्राला खोटे बोललेले आवडत नाही. माझा मित्र नेहमी खरं बोलतो. तो शाळेतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात आवर्जून भाग घेतो.

जसे भाषण स्पर्धा, चित्रकला, नाटक, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, तसेच अनेक मैदानी खेळात ही भाग घेतो. माझ्या मित्राचे शरीर सदृढ आणि बुद्धी तल्लख आहे. माझा मित्र त्याच्या नम्र स्वभावामुळे तो त्याच्या शाळेतील सर्व शिक्षकांचा, मित्रांचा व घरातील लहान थोरांचा लाडका बनला आहे.

माझ्या मित्राचे वृक्षावर, फुलांवर, पक्षांवर, फळझाडांवर, पाळीव प्राण्यावर खूप प्रेम आहे. माझ्या मित्राला निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्यायला खूप आवडते. कुत्रा मांजर हे पाळीव प्राणी त्याचे चांगले मित्र बनले आहेत.

प्रत्येक वर्षी येणाऱ्या दिवाळी-दसरा, रक्षाबंधन या सणाला तो अतिशय महत्त्व देतो. तो हे सर्व सण आनंदाने साजरा करतो अशा प्रकारे माझा मित्र माझ्यासाठी एक मित्रच नव्हे तर प्रत्येक माझ्या मार्गातील प्रकाश दिवा आहे.

सूचना: जर तुम्हाला Essay on my Favourite Friend in Marathi, maza avdata mitra Marathi nibandh. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा

Leave a Comment