Topics
रक्षाबंधन निबंध मराठी / Raksha Bandhan Nibandh Marathi.
वर्षभरामध्ये येणार्या प्रत्येक सणापैकी रक्षाबंधन या सणाला खूप महत्व आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे सुंदर प्रतीक आहे. आपल्या भारत देशामध्ये श्रावण पोर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरी केला जातो.
या सणादिवशी बहीण भावाच्या हातामध्ये सुंदर रेशीमी धाग्यांची राखी बांधते, आणि भावाला ओवाळून गोड मिठाईचा घास त्याला भरवते व भावाला उदंड आयुष्याचे वरदान मिळावे म्हणून देवाकडे प्रार्थना करते.
रक्षाबंधन हा सण भावाने त्याच्या आयुष्यामध्ये आपल्या बहिणीला जपावे आपल्या बहिणीची प्रत्येक संकटामध्ये रक्षा करावी या उद्देशाने रक्षाबंधन हा सण साजरी केला जातो. रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण संरक्षण, आणि बंधन या शब्दाचा अर्थ नाते, वचन असा होतो म्हणजे भावाने बहिणीला तिची रक्षा करण्याचे वचन या दिवशी बहिणीला द्यायचे असते म्हणून या सणाला रक्षाबंधन असे म्हणतात. रक्षाबंधन या सणाला राखीचा सण असे सुद्धा म्हणतात.
रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक सुद्धा आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण या दोघांच्या नात्यांची आठवण करून देणारा सण आहे. रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो. सोने, चांदी, रेशीमी धागा, अशा अनेक प्रकारच्या राख्या बाजारामध्ये विकण्यास येतात.
काही बहिणी आपल्या भावाला आपली आठवण कायम रहावी म्हणून सोन्याची व चांदीची राखी भेट म्हणून देतात. रक्षाबंधन या सणादिवशी राखी खरेदी मध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. राखी बनवणार्या हजारो लोकांनी या दिवशी एक उत्तम रोजगार उपलब्ध होतो.
रक्षाबंधन जवळ येताच जे भाऊ आपल्या बहीणींपासून दूर गावी कामानिम्मीत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या बहिणी पोस्टाने राखी व मिठाई पाठवतात. रक्षाबंधन हा सण जवळ येताच बहीण भावाला तिच्या आवडीचे गिफ्ट मिळवण्यासाठी भावाकडे हट्ट करते.
ग्रामीण भागामध्ये रक्षाबंधन या सणाला अतिशय महत्व दिले जाते. ग्रामीण भागामध्ये हा सण अतिशय उत्साहाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केला जातो.
Raksha Bandhan Nibandh Marathi
रक्षाबंधन या सणा पाठीमागे एक इतिहास आहे, महाभारतामध्ये युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाची करंगळी जखमी झाली होती त्यावेळी द्रौपदी ने आपल्या साडीच्या पदराचे कापड फाडून श्रीकृष्णाच्या जखमी झालेल्या करंगळी वर बांधले तेव्हा ते बहिणीने भावाला बांधलेले एक बंधन असे समजले गेले.
द्रौपदी वर येणार्या प्रत्येक संकटातून श्रीकृष्णाने द्रौपदीचे संरक्षण केले आहे. हिंदू धर्मातील इतर सणाप्रमाणेच रक्षाबंधन या सणाला महत्व आहे. रक्षाबंधनादिवशी महादेव आणि श्रीकृष्णाची विधिवत पुजा केली जाते. रक्षाबंधन या सणादिवशी प्रत्येक घरी पूरण पोळीचा स्वयंपाक केला जातो. घरातील कुलदैवताला, आणि गावातीला ग्राम दैवताला पूरण पोळीचा गोड नैवद्य दाखवला जातो.
रक्षाबंधन या दिवशी घरातील लहान मुले खूप आनंदी असतात. लहान मुलांना नवीन कपडे, खाऊ, मिठाई इत्यादि वस्तु व पदार्थ दिले जातात. रक्षाबंधना दिवशी वडिलांची बहीण एक दिवस अगोदरच घरी येते. आई रक्षाबंधनादिवशी माहेरी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी एक दिवस अगोदरच जाते.
बाहेर गावी शिक्षणासाठी गेलेल्या मोठ्या बहिणी आपल्या लहान भावांना राखी बांधण्यासाठी घरी येतात. इतर सणां प्रमाणेच रक्षाबंधना दिवशी आमच्या शाळेला सुट्टी दिली जाते आणि शाळा दुसर्या दिवशी भरल्यानंतर वर्गामध्ये आम्ही सर्व मुले मुली रक्षाबंधन हा सण साजरी करतो. वर्गातील सर्व मुली सर्व मुलांना राखी बांधतात आणि आम्ही सर्व मुले त्यांना एक छानशी भेटवस्तू देतो.
रक्षाबंधन हा सण आला की सणाच्या दोन दिवस अगोदर मी नेहमी माझ्या आईसोबत मामाच्या गावाला जात असे. रक्षाबंधनादिवशी मामा आईला छानसी पैठणी साडी खरेदी करत आणि आई मामाला एक सुंदर रेशमी धाग्यांनी विणलेली राखी मामाच्या मनगटावर बांधत असे.
मामाला ओवाळताना आई मिठाईचा गोड घास मामाला भरवत असे. मामाच्या गावी गेल्यानंतर मामा सुद्धा माझा खूप लाड करत असे आई बरोबर मला सुद्धा नवीन कपडे मामा विकत घेत असत आणि हा रक्षाबंधन सण आखीनच आनंदी आणि उत्साही होऊन जात असे.
सूचना: जर तुम्हाला Raksha Bandhan Nibandh Marathi, Raksha bandhan essay in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.