Eagle Information in Marathi. गरुड पक्षी विषयी माहिती. 10 lines/Few lines on eagle in Marathi. garud pakshi mahiti.
मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये गरुड या पक्षाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सर्व पक्षांमध्ये सामर्थ्यवान समजला जाणारा पक्षी म्हणजे गरुड पक्षी होय. गरुड पक्षी हा पक्षांचा राजा आहे. गरुड पक्षी हा शिकारी पक्षी आहे, त्याची नजर खूप तीक्ष्ण आहे. गरुड पक्षी खूप उंचावरून आपल्या शिकारीची टेहळणी करतो, आणि संधी मिळताच आपल्या शिकारीवर झडप घालतो. गरुड पक्षी हा खूप चालाक आणि चपळ आहे.
हा पक्षी अनेक पक्ष्यांच्या तुलनेत आकाराने मोठा पक्षी आहे. गरुड हा रॅप्टर्स या प्रकारात मोडतो. गरुड पक्षी साप, छोटे मोठे सस्तन प्राणी, मासे अशा प्रकारचे अन्न खातो. गरुडाचे डोके हे इतर पक्षांच्या तुलेनेत मोठे असते. तीक्ष्ण नजरेमुळे गरुड आपली शिकार सहजपणे नजरेत टिपतो. गरुडांची दृष्टी कोणत्याही प्राण्यांपेक्षा वेगवान असते.
गरुडाच्या डोळ्याची बाहुली खूप मोठी असल्यामुळे समोरून येणारा प्रकाश सहज त्याच्या डोळ्याना स्पर्श करू शकत नाही, त्यामुळे त्याला त्याचे भक्ष्य दुरून सहजपणे दिसते. गरुडाच्या घरट्याला इंग्रजीत eyries असे म्हणतात. बहुतेक गरुड प्रजाती एकाच वेळी फक्त दोन अंडी देतात.
Eagle information in Marathi गरुड पक्षी विषयी माहिती
गरुडाच्या काही उपजाती आपणास खालील प्रमाणे पहायास मिळतात.
पांढऱ्या शेपटीचा काळा गरुड, समुद्र गरुड, सुपर्ण सोनेरी गरुड, हार्पी गरुड, तुरेवाला सर्प गरुड, आफ्रिकी मत्स्य गरुड, नेपाळी गरुड, पहाडी गरुड, टकला गरुड, ठिपक्यांचा पाणगरुड, गरुड, मत्स्य गरुड, राखी डोक्याचा मत्स्य गरुड, इत्यादि.
गरुडाची चोच ही शिकारी पक्ष्यांसारखी मजबूत असते. त्याच्या चोचीचा आकार बाकदार असल्यामुळे त्याला शिकार आपल्या चोचीमध्ये पकडणे सहज सोपे जाते.
गरुड पक्षी आपले घरटे हे उंच डोंगराच्या कड्यावर किंवा उंच अशा झाडांवर बांधतात. गरुड पक्ष्याची घरटी ही वाळलेल्या काट्याकुट्यांपासून बनलेली असतात. आकाशात उंच भरारणाऱ्या गरुडांचे पंख मात्र मोठे असतात व शेपटी छोटी असते.
जंगलामध्ये राहणाऱ्या गरुड पक्ष्याचे पंख हे खूप छोटे असतात त्यामुळे ते उंच हवेत अगदी सहजपणे कलाटणी घेतात आणि ते अति वेगाने उडतात. गरुडाची नजर ही माणसाच्या नजरेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. गरुड पक्षाला एक चोच, दोन पाय, दोन पंख व दोन डोळे असतात.
हिंदू धर्म ग्रंथामध्ये गरुड पक्षी हे विष्णूचे वाहन आहे. गरुड हा कश्यप व त्याची पत्नी विनता यांचा मुलगा आहे. हिंदू धर्मामध्ये गरुड पुराण नावाचा प्राचीन ग्रंथ सुद्धा आहे.
सूचना: जर तुम्हाला “Eagle Information in Marathi. गरुड पक्षी विषयी माहिती. 10 lines/Few lines on eagle in Marathi. garud pakshi mahiti.” या लेखामध्ये दिलेली गरुड पक्षी विषयी माहिती महत्वपूर्ण वाटत असल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर शेअर करा.