चिमणी बद्दल अद्भुत माहिती Sparrow Information in Marathi

Sparrow Information in Marathi. Chimani chi mahiti. चिमणीची माहिती मराठी.

Sparrow Information in Marathi

चिमणी हा पक्षी सर्व पक्ष्यांच्या तुलनेत संख्येने जास्त आढळतो. हा पक्षी माणसाच्या जवळ राहणे पसंत करतो. चिमणी हा पक्षी शिजलेले अन्न, कीटक, व धान्य असे अन्न खातो. हा पक्षी आपले घरटे वाळलेले गवत काडी, कापूस यांपासून बनवतो. चिमणी हा पक्षी आपले घरटे घराच्या छताला, झाडांवर, वळचणीच्या ठिकाणी बांधते.

चिमणी हा पक्षी आकाराने लहान आहे. चिमनीला एक छोटी चोच, दोन पंख, दोन पाय व दोन डोळे असतात. नर चिमणीच्या कपाळाचा व शेपटीवरचा आणि पार्श्वभाग हा राखाडी रंगाचा असतो. नर चिमणीचा गळा ते छातीच्या भागावर काळ्या रंगाचा ठपका असतो. मादी चिमणीचा रंग हा मातीसारखा तपकिरी असतो. चिमणी पक्षी हा संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच भारताशेजारील नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, व भूतान यांसारख्या देशामध्ये सुद्धा आढळतो.

Sparrow Information in Marathi
Sparrow Information in Marathi. Chimani chi mahiti. चिमणीची माहिती मराठी.

वाढत्या शहरीकरणामुळे व आधुनिकीकरणामुळे चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, वीज, दूरध्वनी यांपासून तयार होणाऱ्या विद्युत् चुंबकीय लहरींमुळे चिमणीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.

चिमणी चे वजन जास्त नसते. चिमणीचे वजन 25 ते 35 ग्राम इतके असते. चिमणीच्या शरीराची लांबी ही केवळ 14 ते 16 सेंटीमिटर पर्यंत असते. चिमणीचे आयुष्य हे केवळ दोन वर्ष आहे. चिमणी पक्षी पाच ते सहा अंडी देते.

पूर्वी सारखे पाणी सध्या चिमणीसाठी उघड्यावर उपलब्ध नाही त्याचबरोबर चिमणीसाठी खाद्य सुद्धा सहजपणे उपलब्ध होत नाही. आताचे ध्यान हे जास्तकरून पॅकेट मध्ये मिळत आहे म्हणजेच पक्ष्यांच्या हक्काचे पाणी व अन्न सुद्धा पॅकेट मध्ये बंद झाले आहे. त्यामुळे चिमणीवर उपासमारीची वेळ आली  आहे. 20 मार्च हा दिवस सगळीकडे जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरी केला जाऊ लागला आहे. चिमणी हा प्राणी जास्तकरून ग्रामीण भागामध्ये आढळतो. शहरी भागांमध्ये चिमणीचे वास्तव्य खूप कमी आढळते.

Sparrow Information in Marathi/ Chimani chi mahiti

चिमणी बद्दल अशी समज आहे कि जर चिमनीला एखाद्या माणसाने हातामध्ये पकडल्यास किंवा मानवी हाताचा स्पर्श झाल्यास बाकीच्या सर्व त्या चिमनीला चोचीणे मारहाण करतात. तिला आपल्या कळपात पुन्हा मिसळून घेत नाहीत.

चिमणी या पक्ष्याचे वर्णन सर्व कथांमध्ये, कवितांमध्ये, तसेच बाल गोष्टींमध्ये आढळते. चिमणी हा पक्षी आकाराने खूप छोटा आहे, चिमणीचे इवलेसे पंख दिसायला खूप आकर्षक आहेत. चिमणी माणसाचे लक्ष आपल्या कडे सहजपणे वेधून घेते. चिमणी उड्डाण खूप मोठ्या गतीने घेते. ती एक क्षणात भुरकण उडून जाते.

चिमणी आपल्या पिल्लांना धान्य चोचीने भरवते. आपल्या पिल्लांची योग्य ती वेळेवेर काळजी घेते. चिमणी ही लोकवस्तीमध्ये राहणारा पक्षी आहे. आजच्या काळात चिमणी आपल्या मध्ये सहसा दिसत नाही कारण चिमण्यांची संख्या सध्या खूप कमी झाली आहे. पूर्वीसारखी चिमणी आपल्या अंगणामध्ये दिसत नाही.

कपडे वाळू घालायच्या दोरीवर बसणारी चिमणी, दरवाज्यावर बसणारी चिमणी, घराच्या छताला लटकणारी चिमणी आपल्या मधून गायब झाली आहे याला केवळ माणूसच जबाबदार आहे. वाढते शहरीकरण, वाढते आधुनिकीकरण, वाढते प्रदूषण, वृक्षांची हानी या सर्व मानव निर्मित समस्यांमुळे चिमणी नष्ट झाली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, कारण ही पृथ्वी केवळ मानवासाठी नाही आहे या पृथ्वीवर सर्व प्राण्यांचा अधिकार आहे.

चिमणीबद्दल चार शब्द!

माझी अंगणातली मैत्रीण दूर गेली माझ्यापासून,

तिचा चिवचिवाट, किलबिलाट आज ही आठवतो कानी,

काहीतरी बोलत होती माझ्याशी, काहीतरी सांगायच होत तिला मला.

आता करमेना मला तिच्याशिवाय,

माणूस झाला शत्रू तिचा त्यात वाटा होता माझा सुद्धा.

अंगणात दाणे पसरले आहेत तुझ्यासाठी,

वाट पाहत आहे पुन्हा तुझ्या येण्याची.

Note: If you like the information shared in post “Sparrow Information in Marathi. Chimani chi mahiti. चिमणीची माहिती मराठी.” please share this information with your friends on social media.

Leave a Comment