कावळा पक्षी माहिती मराठीत | Crow Information in Marathi

Crow Information in Marathi. कावळा मराठी माहिती. 10 lines/Few lines on crow in Marathi. kavla chi mahiti.

कावळा हा पक्षी सर्वाना परिचित आहे. कावळा हा रंगाने काळा असतो, त्याच्या मानेवारील भाग राखाडी रंगाचा असतो व बाकी सर्व भाग काळा असतो. जो कावळा संपूर्ण काळ्या रंगाचा असतो तो डोम कावळा म्हणून ओळखला जातो. कावळा हा प्राणी शाकाहारी व मांसाहारी आहे तो लहान पक्षी, त्यांची अंडी, मृत जनावरे धान्य, शिजलेले अन्न व उंदीर खातो.

Crow information in Marathi
Crow Information in Marathi. कावळा मराठी माहिती. 10 lines/Few lines on crow in Marathi. kavla chi mahiti.

कावळ्याला काळ्या रंगाची एक चोच, दोन डोळे व दोन पाय असतात. कावळा हा पक्षी मनुष्य वस्ती जवळ आढळतो पण तो जास्त लोकांच्या जवळ जात नाही. कावळा हा प्राणी हुशार समजला जातो. कावळा मानवी चेहरे ओळखण्यात हुशार आहे. त्याची नजर सारखी खाद्यावर असते. कुठे काही खायला मिळेल या शोधात तो नेहमी असतो.  

कावळा हा प्राणी संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच तो इतर भारताच्या शेजारील नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, आणि मालदीव सारख्या देशांमध्ये सुद्धा आढळतो. कावळा हा पक्षी वाळलेल गवत, काडी यांपासून उंच झाडावर आपले घरटे बनवतात. हिंदू संस्कृति मध्ये कावळ्याला खूप महत्व आहे.

Crow information in Marathi/Kavla chi mahiti

माणसाच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशी कावळ्याला विधी प्रमाणे जेवण दिले जाते. कावळ्याचे वर्णन  अनेक लोककथेमध्ये, काल्पनिक गोष्टींमध्ये, बोधकथेमध्ये आढळते. चिमणी आणि कावळा यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. लहानमुलांना कावळ्याच्या अनेक गोष्टी आवडतात. कावळा म्हंटल कि सर्वाना त्याची घृणा येते. कारण हा पक्षी सर्वांचा न आवडता पक्षी आहे.

कावळ्याचे घराच्या छतावर बसने लोकांना अजिबात आवडत नाही. कावळा हा लोकांचा न आवडता प्राणी आहे. हिंदू संस्कृतिमध्ये कावळ्याला अशुभ समजले जाते. कावळ्याच्या ओरडण्यापाठीमागे विशेष संकेत समजले जातात. कावळा हा माणसाला चकमा देण्यात पटाईत आहे.

एखादा कावळा मेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व कावळे जमा होतात आणि त्या ठिकाणाची न्याहळणी करतात, कारण भविष्यात अशा संकटापासून वाचता यावे म्हणून. कावळा हा बुद्धीने तलक आहे. कावळा हा क्षणात उड्डाण घेतो आणि आपले ठिकाण लगेच बदलतो.

कावळा हा झाडांवर, वीज खांबांच्या तारेवर, घराच्या छतावर जास्त बसतो. कावळा जमिनीवर तुरू तुरू गतीने चालतो. मेलेले प्राणी हे त्याचे आवडते अन्न आहे. मेलेले प्राणी खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम कावळा करतो. त्यामुळे कावळ्याला सामाजिक प्राणी सुद्धा म्हटले जाते. कावळ्याचे वैज्ञानिक नाव Corvus Brachyrhynchos असे आहे.

सूचना: जर तुम्हाला “Crow Information in Marathi. कावळा मराठी माहिती. 10 lines/Few lines on crow in Marathi. kavla chi mahiti.” या लेखामध्ये दिलेली कावळयाविषयी सखोल माहिती महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर शेअर करा.

Leave a Comment