म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात नेमकं? चला जाणून घेऊया

चला तर माझ्या बालमित्रांनो आज आपण पाहूया कि म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात नेमक? आपण सर्वांनी म्हैस तर प्रत्यक्षात पाहिलीच असेल आणि ज्यांना प्रत्यक्षात म्हैस पाहता आली नसेल त्यांनी तर यूट्यूब वर नक्की पाहिली असेल.

कदाचित शहरामध्ये राहणार्‍या लोकांना म्हैस प्रत्यक्षात पाहण्याची संधि येत नाही त्यामुळे त्यांना म्हैशीच्या पिल्लाला काय म्हणतात हे तर माहीतच नसणार त्यामुळे आज आम्ही या पोस्टमध्ये म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात? या प्रश्नाच उत्तर पाहणार आहोत.

म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हटले जाते. (यामध्ये नर मादी दोन्ही येतात.)

म्हशीच्या मादी पिल्लाला रेडी म्हणतात तर म्हशीच्या नर पिल्लाला रेडा म्हणतात.

मित्रांनो म्हैस तर आपण सर्वांनी पाहिली असेलच, प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये आपल्याला म्हैस पाहायला मिळते. म्हैस हा एक पाळीव प्राणी आहे. म्हैस हा पाळीव प्राणी मादी आहे तर नर या पाळीव प्राण्याला रेडा असे म्हटले जाते. म्हैस पालन हे केवळ दूध व शेतीसाठी खत मिळवण्याकरिता केले जाते.

इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत म्हैशीचे दूध खूप पौष्टिक असते. म्हैशीच्या दुधामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला सर्वजण आपल्याला देतात.

म्हैस या पाळीव प्राण्याला मोठी शिंगे असतात. म्हशीचा रंग हा जास्तकरून महाराष्ट्रामध्ये काळाच आढळतो. म्हैस ही गुरांच्या सर्वात प्रसिद्ध जातींपैकी एक आहे. म्हशीचे डोके आणि शिंगे मोठे असतात. म्हशीचे वास्तव्य हे गवताळ प्रदेशात किंवा खुल्या मैदानात आढळते. म्हैस हा आकाराने मोठा व वजनदार प्राणी आहे.

म्हैस हा शाकाहारी प्राणी आहे,  याचा अर्थ ती फक्त वनस्पती, गवत व शेतातील चारा खाते. म्हैस हा एक मोठा “बोवाइन” प्राणी आहे जो मूळ आफ्रिका आणि आशियातील आहे. म्हशींचे मूळ आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिका आहे.

म्हैस बहुतेकदा कामाचा प्राणी म्हणून उपयोगात आणले जातात कारण ते मजबूत असतात आणि जड भार वाहून नेऊ शकतात त्यामुळे काही प्रदेशांमध्ये म्हैस या पाळीव प्राण्याचा वापर ओझे वाहून नेन्याकरिता सुद्धा केला जातो.

Leave a Comment