तंतू वाद्यांची नावे व तंतुवाद्य माहिती Tantu Vadya Names

खास संगीत प्रिय रसिकांच्या माहितीकरिता tantu vadya information in marathi, तंतुवाद्यची नावे, तंतुवाद्य माहिती व तंतू वाद्यांची नावे पाहूया.

महाराष्ट्राच्या लोकसंगीतात तंतुवाद्यांना खूप महत्त्व आहे. लोकसंगीतामध्ये तंतुवाद्य आपली वेगळी ओळख निर्माण करून आहेत. आज या लेखामध्ये आपण संगीत क्षेत्रामध्ये लोकप्रिय असलेल्या महत्त्वाच्या तंतुवाद्याची ओळख करून घेणार आहोत.

तंतुवाद्य म्हणजे काय?

ज्या वाद्याची नाद निर्मिती त्यावर ताणून बसवलेल्या तारेमुळे होते त्याला तंतुवाद्य म्हणजेच कंपित तंत्री वाद्य असे म्हणतात. इंग्रजीमध्ये तंतुवाद्याला कार्डोफोन असे संबोधले जाते.

वारकरी विना:

हे तंतुवाद्य महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय समुदायांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हे तंतुवाद्य ग्रंथ पारायण, 

घांगळी:

हे तंतुवाद्य आदिवासी जमातीतील लोक आपल्या लोक संगीतामध्ये वापरतात. सामुदायिक नृत्य करत असताना घांगळी तंतुवाद्याचा उपयोग नाद निर्मिती करण्याकरिता केला जातो.

एकतारी:

नाथ संप्रदाय व दत्त संप्रदाय समुदायातील भक्तगण एकतारी या तंतुवाद्याचा वापर भक्तीगीते व भजन यांसारख्या भक्ती कार्यक्रमांमध्ये करतात.

चौंडक:

जागृत देवी माता यल्लमाच्या भक्तीगीतांमध्ये आरती व पूजेच्या वेळी या तंतुवाद्याचा उपयोग नाद निर्मिती करिता केला जातो.

किंगरी:

महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील ग्रामीण भागांमध्ये या तंतुवाद्याचा उपयोग नाद निर्मिती करता केला जातो. अनेक लोक गीतांमध्ये किंगरी तंतुवाद्यांचा वापर तसेच या वाद्याचे वर्णन आढळते.

Leave a Comment